Yajurveda Marathi Bhashya (Mata Savita Joshi)

Yajurveda Adhyay 8 / Mantra 1

63 Mantra
8/1
Devata- बृहस्पतिस्सोमो देवता Rishi- आङ्गिरस ऋषिः Chhand- आर्ची पङ्क्तिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
उ॒प॒या॒मगृ॑हीतोऽस्यादि॒त्येभ्य॑स्त्वा। विष्ण॑ऽउरुगायै॒ष ते॒ सोम॒स्तꣳ र॑क्षस्व॒ मा त्वा॑ दभन्॥१॥

उ॒प॒या॒मगृ॑हीत॒ इत्यु॑पया॒मऽगृ॑हीतः। अ॒सि॒। आ॒दि॒त्येभ्यः॑। त्वा॒। विष्णो॒ऽइति॒ विष्णो॒। उ॒रु॒गा॒येत्यु॑रुऽगाय। ए॒षः। ते॒। सोमः॑। तम्। र॒क्ष॒स्व॒। मा। त्वा॒। द॒भ॒न् ॥१॥

Mantra without Swara
उपयामगृहीतोस्यादित्येभ्यस्त्वा । विष्णऽउरुगायैष ते सोमस्तँ रक्षस्व मा त्वा दभन् ॥

उपयामगृहीत इत्युपयामऽगृहीतः। असि। आदित्येभ्यः। त्वा। विष्णोऽइति विष्णो। उरुगायेत्युरुऽगाय। एषः। ते। सोमः। तम्। रक्षस्व। मा। त्वा। दभन्॥१॥

Yajurveda Marathi Bhashya (Mata Savita Joshi)

मराठी
Yajurveda Marathi Bhashya (Mata Savita Joshi) - मराठी
Essence
सर्व ब्रह्मचारिणी कन्यांनी अशी अपेक्षा बाळगावी की, आपले रूप, गुण, कर्म, स्वभाव जसा असेल त्याप्रमाणे विद्वान, बलवान व अंतःकरणापासून ज्याच्याबद्दल प्रीती वाटेल असा इच्छित पती स्वयंवर पद्धतीने निवडावा व त्याची सेवा करावी. तसेच ब्रह्मचारी युवकांनी आपल्यासारख्याच युवतीबरोबर विवाह करावा. त्याप्रमाणे स्त्री-पुरुषांनी सनातन गृहस्थ धर्माचे पालन करावे व विषयलंपट न बनता वीर्याचे रक्षण करावे. सदैव ऋतुगामी असावे. (इच्छा असेल तर) दहा संतानांना जन्म द्यावा, त्यांना चांगले शिक्षण देऊन ऐश्वर्य वाढवून जीवन प्रीतिपूर्वक घालवावे. एकमेकांचा वियोग घडू नये, अप्रीती निर्माण होता कामा नये व व्यभिचार करू नये. याप्रमाणे वर्तन ठेवावे व सर्वकाळी सर्व प्रकारे परस्परांचे रक्षण करावे.