Yajurveda Marathi Bhashya (Mata Savita Joshi)

Yajurveda Adhyay 7 / Mantra 48

48 Mantra
7/48
Devata- आत्मा देवता Rishi- आङ्गिरस ऋषिः Chhand- आर्षी उष्णिक् Swara- ऋषभः
Mantra with Swara
को॑ऽदा॒त् कस्मा॑ऽअदा॒त् कामो॑ऽदा॒त् कामा॑यादात्। कामो॑ दा॒ता कामः॑ प्रतिग्रही॒ता कामै॒तत्ते॑॥४८॥

कः। अ॒दा॒त्। कस्मै॑। अ॒दा॒त्। कामः॑। अ॒दा॒त्। कामा॑य। अ॒दा॒त्। कामः॑। दा॒ता। कामः॑। प्र॒ति॒ग्र॒ही॒तेति॑ प्रतिऽग्रही॒ता। काम॑। ए॑तत्। ते॒ ॥४८॥

Mantra without Swara
को दात्कस्मा ऽअदात्कामो दात्कामायादात् । कामो दाता कामः प्रतिग्रहीता कामैतत्ते ॥

कः। अदात्। कस्मै। अदात्। कामः। अदात्। कामाय। अदात्। कामः। दाता। कामः। प्रतिग्रहीतेति प्रतिऽग्रहीता। काम। एतत्। ते॥४८॥

Yajurveda Marathi Bhashya (Mata Savita Joshi)

मराठी
Yajurveda Marathi Bhashya (Mata Savita Joshi) - मराठी
Essence
या जगात जीव हा कर्म करणारा व ईश्वर (कर्माचे) फळ देणारा आहे. इच्छेशिवाय कोणी डोळ्याची पापणीही हलवू शकत नाही. त्यासाठी जीवाने धर्माची इच्छा बाळगावी, अधर्माची इच्छा बाळगू नये, हे सर्वांनी जाणले पाहिजे. याबाबत मनूने जे सांगितले आहे, ते वेदानुकूल आहे, याची निश्चयपूर्वक जाण हवी. या जगात अत्यंत कामना ही जशी प्रशंसनीय नसते, तसेच कामनेखेरीज कोणतेही कार्य सिद्ध होऊ शकत नाही, हेही तितकेच खरे होय. त्यासाठी धर्माची कामना केली पाहिजे, अधर्माची नव्हे. त्याचे कारण असे की वेदाचे अध्ययन, अध्यापन, वेदोक्त धर्माचे आचरण कामनेखेरीज सिद्ध होऊ शकत नाही. या जगात इच्छेशिवाय तिन्ही काळीही कोणतेच कर्म घडू शकत नाही. मनुष्य जे जे कर्म करतो तो तो इच्छेचा व्यापारच असतो. त्यासाठी श्रेष्ठ अशा वेदोक्त कर्माची इच्छा धरावी, दुष्ट कर्माची नव्हे.