Yajurveda Marathi Bhashya (Mata Savita Joshi)

Yajurveda Adhyay 40 / Mantra 17

17 Mantra
40/17
Devata- आत्मा देवता Rishi- दीर्घतमा ऋषिः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
हि॒र॒ण्मये॑न॒ पात्रे॑ण स॒त्यस्यापि॑हितं॒ मुखम्।यो॒ऽसावा॑दि॒त्ये पु॑रुषः॒ सोऽसाव॒हम्। ओ३म् खं ब्रह्म॑॥१७॥

हि॒र॒ण्मये॑न॒। पात्रे॑ण। स॒त्यस्य॑। अपि॑हित॒मित्यपि॑ऽहितम्। मुख॑म् ॥ यः। अ॒सौ। आ॒दि॒त्ये। पुरु॑षः। सः। अ॒सौ। अ॒हम्। ओ३म्। खम्। ब्रह्म॑ ॥१७ ॥

Mantra without Swara
हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम् । यो सावादित्ये पुरुषः सो सावहम् । ओ३म् खं ब्रह्म ॥

हिरण्मयेन। पात्रेण। सत्यस्य। अपिहितमित्यपिऽहितम्। मुखम्॥ यः। असौ। आदित्ये। पुरुषः। सः। असौ। अहम्। ओ३म्। खम्। ब्रह्म॥१७॥

Yajurveda Marathi Bhashya (Mata Savita Joshi)

मराठी
Yajurveda Marathi Bhashya (Mata Savita Joshi) - मराठी
Essence
सर्व माणसांना ईश्वर उपदेश करतो की, हे माणसांनो ! मी येथे सूर्यलोकात व त्याबाहेर इतर सूर्य लोकातही आहे व आकाशाप्रमाणे सर्वत्र व्यापक आहे. माझ्यापेक्षा कोणी मोठा नाही. मीच सर्वांत मोठा आहे. सुलक्षणी पुत्राप्रमाणे माझे प्रिय नाव ओ३म् आहे. जो माझी भक्ती करतो व सत्याचरण करून शरण येतो. त्याच्या अविद्येचा नाश करून मी अंतर्यामी रूपाने त्याच्या आत्म्यात प्रकाश पाडतो. त्याला शुभ, गुण, कर्म स्वभावाचा बनवितो व सत्यस्वरूपाचे आवरण स्थिर करून योगाच्या साह्याने विज्ञानयुक्त बनवून त्याची सर्व दुःखातून सुटका करतो आणि मोक्ष सुख प्राप्त करून देतो.