Yajurveda Marathi Bhashya (Mata Savita Joshi)

Yajurveda Adhyay 40 / Mantra 12

17 Mantra
40/12
Devata- आत्मा देवता Rishi- दीर्घतमा ऋषिः Chhand- निचृदनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
अ॒न्धन्तमः॒ प्र वि॑शन्ति॒ येऽवि॑द्यामु॒पास॑ते।ततो॒ भूय॑ऽइव॒ ते तमो॒ यऽउ॑ वि॒द्याया॑ र॒ताः॥१२॥

अ॒न्धम्। तमः॑। प्र। वि॒श॒न्ति॒। ये। अवि॑द्याम्। उ॒पास॑त॒ इत्यु॑प॒ऽआस॑ते ॥ ततः॑। भूय॑ऽइ॒वेति॒ भूयः॑ऽइव। ते। तमः॑। ये। ऊँ॒ऽइत्यूँ॑। वि॒द्याया॑म्। र॒ताः ॥१२ ॥

Mantra without Swara
अन्धन्तमः प्रविशन्ति येविद्यामुपासते । ततो भूयऽइव ते तमो यऽउ विद्यायाँ रताः ॥

अन्धम्। तमः। प्र। विशन्ति। ये। अविद्याम्। उपासत इत्युपऽआसते॥ ततः। भूयऽइवेति भूयःऽइव। ते। तमः। ये। ऊँऽइत्यूँ। विद्यायाम्। रताः॥१२॥

Yajurveda Marathi Bhashya (Mata Savita Joshi)

मराठी
Yajurveda Marathi Bhashya (Mata Savita Joshi) - मराठी
Essence
या मंत्रात उपमालंकार आहे. जी जी चेतन ज्ञान व गुणयुक्त वस्तू आहे ती ज्ञाता व जी अविद्यारूपी वस्तू असते ती जाणण्यायोग्य असते व जे चेतन ब्रह्म आहे ते उपासना करण्यायोग्य आहे. यापेक्षा जे भिन्न असते ते उपास्य नसून त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. जी माणसे अविद्या, अस्मिता, राग, द्वेश व अभिनिवेश नामक क्लेशांनी युक्त आहेत ती परमेश्वराला सोडून त्यापेक्षा भिन्न जड वस्तूची उपासना करून महान दुःख सागरात बुडतात व जे संस्कृत शब्द अर्थ अन्वय जाणून स्वतःला पंडित मानणारे असून, सत्य भाषण, पक्षापातरहित न्यायाचा आचरणरूपी धर्म स्वीकारीत नाहीत आणि अभिमानी बनून विद्येचा तिरस्कार करून अविद्येलाच मानतात ते अत्यंत तमोगुणरूपी दुःखसागराने निरंतर पीडित होतात.