Yajurveda Marathi Bhashya (Mata Savita Joshi)

Yajurveda Adhyay 39 / Mantra 1

13 Mantra
39/1
Devata- अग्निर्देवता Rishi- दीर्घतमा ऋषिः Chhand- पङ्क्तिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
स्वाहा॑ प्रा॒णेभ्यः॒ साधि॑पतिकेभ्यः। पृ॒थि॒व्यै स्वाहा॒ऽग्नये॒ स्वाहा॒ऽन्तरि॑क्षाय॒ स्वाहा॑ वा॒यवे॒ स्वाहा॑। दि॒वे स्वाहा॒। सूर्या॑य॒ स्वाहा॑॥१॥

स्वाहा॑। प्रा॒णेभ्यः॑। साधि॑पतिकेभ्य॒ इति॒ साधि॑ऽपतिकेभ्यः ॥ पृ॒थि॒व्यै। स्वाहा॑। अग्नये॑। स्वाहा॑। अ॒न्तरि॑क्षाय। स्वाहा॑। वायवे॑। स्वाहा॑। दि॒वे। स्वाहा॑। सूर्य्या॑य। स्वाहा॑ ॥१ ॥

Mantra without Swara
स्वाहाप्राणेभ्यः साधिपतिकेभ्यः पृथिव्यै स्वाहेग्नये स्वाहेन्तरिक्षाय स्वाहा वायवे स्वाहा । दिवे स्वाहा । सूर्याय स्वाहा ॥

स्वाहा। प्राणेभ्यः। साधिपतिकेभ्य इति साधिऽपतिकेभ्यः॥ पृथिव्यै। स्वाहा। अग्नये। स्वाहा। अन्तरिक्षाय। स्वाहा। वायवे। स्वाहा। दिवे। स्वाहा। सूर्य्याय। स्वाहा॥१॥

Yajurveda Marathi Bhashya (Mata Savita Joshi)

मराठी
Yajurveda Marathi Bhashya (Mata Savita Joshi) - मराठी
Essence
या अध्यायात अन्त्येष्टिकर्म अर्थात ज्याला नरमेध पुरुषमेध किंवा दाहकर्म म्हटले जाते त्याचे वर्णन आहे. जेव्हा एखाद्या माणसाचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या शरीराच्या वजनाइतके तूप घेऊन त्यात प्रत्येक शेराला एक गुंज कस्तुरी, एक मासा केशर व चंदन इत्यादींसह काष्ठ यथायोग्यरीत्या घेऊन जसा पुरुष असेल तितकी लांब, साडेतीन हात रुंद, तितकीच खोल वेदी बनवून त्यात खालून वरपर्यंत समिधा ठेवाव्या व त्यावर प्रेत ठेवावे. प्रेताच्या इकडेतिकडे, वर सगळीकडे समिधा ठेऊन छातीवर कापूर ठेऊन अग्नी प्रज्वलित करावा व चिता पेटवावी. जेव्हा अग्नी जळू लागेल तेव्हा या अध्यायातील स्वाहांत मंत्रांची वारंवार आवृत्ती करावी व तूपाने प्रेत जाळावे. या प्रकारे दाहकर्म करणाऱ्यांना यज्ञकर्माच्या फळाची प्राप्ती होते. प्रेताचे भूमीत दफन कधीही करू नये. प्रेत वनात सोडू नये किंवा पाण्यात बुडवू नये. दाह न केल्यास संबंधित लोकांना महापाप लागते. कारण मृत शरीरापासून अधिक दुर्गंध वाढल्यास पूर्ण जगात असंख्य रोगांची उत्पत्ती होते. म्हणून पूर्वोक्त विधीनुसार प्रेताचा दाहसंस्कार केल्याने कल्याण होते. अन्यथा कल्याण होत नाही.