Yajurveda Marathi Bhashya (Mata Savita Joshi)

Yajurveda Adhyay 3 / Mantra 62

63 Mantra
3/62
Devata- रुद्रो देवता Rishi- नारायण ऋषिः Chhand- उष्णिक् Swara- ऋषभः
Mantra with Swara
त्र्या॒यु॒षं ज॒म॑दग्नेः क॒श्यप॑स्य त्र्यायु॒षम्। यद्दे॒वेषु॑ त्र्यायु॒षं तन्नो॑ऽअस्तु त्र्यायु॒षम्॥६२॥

त्र्या॒यु॒षमिति॑ त्रिऽआयु॒षम्। ज॒मद॑ग्नेरिति॑ ज॒मत्ऽअ॑ग्नेः। क॒श्यप॑स्य। त्र्या॒यु॒षमिति॑ त्रिऽआयु॒षम्। यत्। दे॒वेषु॑। त्र्या॒यु॒षमिति॑ त्रिऽआयु॒षम्। तत्। नः॒। अ॒स्तु॒। त्र्या॒यु॒षमिति॑ त्रिऽआयु॒षम् ॥६२॥

Mantra without Swara
त्र्यायुषञ्जमदग्नेः कश्यपस्य त्र्यायुषम् । यद्देवेषु त्र्यायुषन्तन्नो अस्तु त्र्यायुषम् ॥

त्र्यायुषमिति त्रिऽआयुषम्। जमदग्नेरिति जमत्ऽअग्नेः। कश्यपस्य। त्र्यायुषमिति त्रिऽआयुषम्। यत्। देवेषु। त्र्यायुषमिति त्रिऽआयुषम्। तत्। नः। अस्तु। त्र्यायुषमिति त्रिऽआयुषम्॥६२॥

Yajurveda Marathi Bhashya (Mata Savita Joshi)

मराठी
Yajurveda Marathi Bhashya (Mata Savita Joshi) - मराठी
Essence
या मंत्रात सर्व इंद्रियांमध्ये चक्षू उत्तम असतात व सर्व निर्मितीकारांमध्ये परमेश्वर उत्तम आहे, असे म्हटले असून, सर्वांनी ते जाणावे, असा उद्देश आहे. ‘त्र्यायुषम्’ या पदाची चार वेळा आवृत्ती झाल्यामुळे तीनशे ते चारशे वर्षांपर्यंतचे आयुष्य असा अर्थ घेतला पाहिजे व असे आयुष्य प्राप्त होण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना करून पुरुषार्थ केला पाहिजे. त्यामुळे ही प्रार्थना म्हणावयास हवी - हे जगदीश्वरा ! तुझ्या कृपेने ज्याप्रमाणे विद्वान लोक विद्या, धर्म जाणून व परोपकारी बनून तीनशे वर्षांपर्यंत आनंदाने आयुष्य भोगतात. त्याप्रमाणेच आम्ही त्रिविध तापांपासून सुटका करणारी, शरीर, मन, बुद्धी, चित्त, अहंकाररूपी अंतःकरण, इंद्रिये, प्राण इत्यादींना सुख देणारी विज्ञानयुक्त विद्या जाणून तीनशे ते चारशे वर्षांपर्यंत आयुष्य भोगावे.