Yajurveda Marathi Bhashya (Mata Savita Joshi)

Yajurveda Adhyay 3 / Mantra 29

63 Mantra
3/29
Devata- बृहस्पतिर्देवता Rishi- मेधातिथिर्ऋषिः Chhand- गायत्री, Swara- षड्जः
Mantra with Swara
यो रे॒वान् योऽअ॑मीव॒हा व॑सु॒वित् पु॑ष्टि॒वर्द्ध॑नः। स नः॑ सिषक्तु॒ यस्तु॒रः॥२९॥

यः। रे॒वान्। यः। अ॒मी॒व॒हेत्य॑मीऽव॒हा। व॒सु॒विदिति॑ वसु॒ऽवित्। पु॒ष्टि॒वर्द्ध॑न॒ इति॑ पुष्टि॒ऽवर्द्ध॑नः। सः। नः॒। सि॒ष॒क्त्विति सिषक्तुः। यः। तु॒रः ॥२९॥

Mantra without Swara
यो रेवान्यो अमीवहा वसुवित्पुष्टिवर्धनः । स नः सिषक्तु यस्तुरः ॥

यः। रेवान्। यः। अमीवहेत्यमीऽवहा। वसुविदिति वसुऽवित्। पुष्टिवर्द्धन इति पुष्टिऽवर्द्धनः। सः। नः। सिषक्त्विति सिषक्तुः। यः। तुरः॥२९॥

Yajurveda Marathi Bhashya (Mata Savita Joshi)

मराठी
Yajurveda Marathi Bhashya (Mata Savita Joshi) - मराठी
Essence
या जगात जी संपत्ती आहे ती सर्व ईश्वराची आहे. माणसांनी परमेश्वराची जशी प्रार्थना केली पाहिजे. तसाच पुरुषार्थही केला पाहिजे. परमेश्वर विद्या इत्यादींनी ऐश्वर्यवान आहे हे केवळ ऐकून किंवा म्हणून कोणी विद्वान किंवा धनवान होऊ शकत नाही. त्यासाठी पुरुषार्थानेच विद्या इत्यादी धनाची वृद्धी व रक्षण केले पाहिजे. परमेश्वर जसा अविद्या वगैरे रोगांना दूर करणारा आहे तसेच माणसांनीही अविद्या इत्यादी रोगांपासून दूर राहावे. जसा परमेश्वर सर्व पदार्थांना यथायोग्य जाणतो तसेच सर्व माणसांनी सर्व पदार्थविद्या आपल्या सामर्थ्यानुसार यथायोग्यरीत्या जाणावी. जसा तो सर्वांना बलवान करतो तसेच माणसांनी सर्वांना बलवान करावे. जसे तो चांगले कार्य लवकर करतो तसेच सर्व माणसांनी लवकरात लवकर उत्तम कार्य करावे. आपण जसे उत्तम कर्म करताना परमेश्वराची प्रार्थना करतो तसेच परमेश्वरानेही सर्व माणसांना उत्तम पुरुषार्थाने उत्तम गुण व कर्माचे आचरण करण्यासाठी प्रेरित करावे (ही प्रार्थना होय) .