Yajurveda Marathi Bhashya (Mata Savita Joshi)

Yajurveda Adhyay 2 / Mantra 31

34 Mantra
2/31
Devata- पितरो देवताः Rishi- वामदेव ऋषिः Chhand- बृहती, Swara- मध्यमः
Mantra with Swara
अत्र॑ पितरो मादयध्वं यथाभा॒गमावृ॑षायध्वम्। अमी॑मदन्त पि॒तरो॑ यथाभा॒गमावृ॑षायिषत॥३१॥

अत्र॑। पि॒त॒रः॒। मा॒द॒य॒ध्व॒म्। य॒था॒भा॒गमिति॑ यथाऽभा॒गम्। आ। वृ॒षा॒य॒ध्व॒म्। वृ॒षा॒य॒ध्व॒मिति॑ वृषऽयध्वम्। अमी॑मदन्त। पि॒तरः॑। य॒था॒भा॒गमिति॑ यथाऽभा॒गम्। आ। अ॒वृ॒षा॒यि॒ष॒त॒ ॥३१॥

Mantra without Swara
अत्र पितरो मादयध्वँयथाभागमा वृषायध्वम् । अमीमदन्त पितरो यथाभागमा वृषायिषत ॥

अत्र। पितरः। मादयध्वम्। यथाभागमिति यथाऽभागम्। आ। वृषायध्वम्। वृषायध्वमिति वृषऽयध्वम्। अमीमदन्त। पितरः। यथाभागमिति यथाऽभागम्। आ। अवृषायिषत॥३१॥

Yajurveda Marathi Bhashya (Mata Savita Joshi)

मराठी
Yajurveda Marathi Bhashya (Mata Savita Joshi) - मराठी
Essence
ईश्वराज्ञा अशी आहे की, माणसांनी माता, पिता व धार्मिक सज्जन विद्वानांची सेवा करावी व त्यांना विनंती करावी, हे पितरांनो ! आमच्या उत्तम दैवामुळे तुमचे आगमन होणे म्हणजे आमचे अहोभाग्य होय. त्यासाठी आसन व भोग्य पदार्थ वगैरे देऊन आम्ही तुमचा योग्य सत्कार करतो. त्यामुळे तुम्हाला सुख मिळेल. तुम्हाला जे पदार्थ आवडतात ते देण्याचा प्रयत्न करू तशी आज्ञा करा, कारण तुमचा सत्कार झाल्यावर तुम्ही प्रश्नोत्तररूपाने स्थूल व सूक्ष्म विद्या व धर्म यांची वाढ व्हावी, असा उपदेश करा. अशा प्रकारे उन्नती झाल्यानंतर आम्ही चांगले कार्य करू व इतरांनाही चांगले कार्य करण्यास उद्युक्त करू. याप्रमाणे सर्वांना सुखी करून सदैव विद्येची वृद्धी करू.