Yajurveda Marathi Bhashya (Mata Savita Joshi)

Yajurveda Adhyay 1 / Mantra 6

31 Mantra
1/6
Devata- प्रजापतिर्देवता Rishi- परमेष्ठी प्रजापतिर्ऋषिः Chhand- आर्ची पङ्क्तिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
कस्त्वा॑ युनक्ति॒ स त्वा॑ युनक्ति॒ कस्मै॑ त्वा युनक्ति॒ तस्मै॑ त्वा युनक्ति। कर्म॑णे वां॒ वेषा॑य वाम्॥६॥

कः। त्वा॒। यु॒न॒क्ति॒। सः। त्वा॒। यु॒न॒क्ति॒। कस्मै॑। त्वा॒। यु॒न॒क्ति॒। तस्मै॑। त्वा॒। यु॒न॒क्ति॒। कर्म्म॑णे। वां॒। वेषा॑य। वा॒म् ॥६॥

Mantra without Swara
कस्त्वा युनक्ति स त्वा युनक्ति कस्मै त्वा युनक्ति तस्मै त्वा युनक्ति । कर्मणे वाँवेषाय वाम् ॥

कः। त्वा। युनक्ति। सः। त्वा। युनक्ति। कस्मै। त्वा। युनक्ति। तस्मै। त्वा। युनक्ति। कर्म्मणे। वां। वेषाय। वाम्॥६॥

Yajurveda Marathi Bhashya (Mata Savita Joshi)

मराठी
Yajurveda Marathi Bhashya (Mata Savita Joshi) - मराठी
Essence
या मंत्रात ईश्वराने प्रश्नोत्तर रूपाने जीवाला उपदेश केलेला आहे. जर एखाद्याने प्रश्न विचारला की, मला सत्याने वागण्यास कोण प्रवृत्त करते? तर त्याने उत्तर दिले पाहिजे की, अर्थात प्रजापती परमेश्वर वेदांद्वारे उपदेश करून पुरुषार्थाने सत्यकर्म करण्याची प्रेरणा देतो. याचप्रकारे एखाद्या विद्यार्थ्याने एखाद्या विद्वानास विचारावे की माझ्या आत्म्यामध्ये सत्याचा प्रकाश कोण करतो? तर त्याने उत्तर द्यावे की सर्वव्यापक ईश्वरच अन्तःकरणात प्रकाश पाडतो. पुन्हा त्याने प्रश्न विचारावा की तो आम्हाला कोणकोणत्या उद्दिष्टांसाठी उपदेश करतो व आज्ञा देतो? तर असे उत्तर दिले पाहिजे की, सुखासाठी व सुखस्वरूप परमेश्वराची प्राप्ती, सत्यविद्या व धर्मप्रचार यासाठी. आपल्या दोघांना (प्रश्नोत्तर करणाऱ्यांना) कोणकोणते कार्य करण्यासाठी ईश्वर उपदेश करतो? तर त्याचे असे उत्तर द्यावे की सत्याचरणरूपी यज्ञ करण्यासाठी व विद्या प्राप्त करण्यासाठी आणि त्यांचा प्रसार व्हावा यासाठी. माणसांसमोर दोन उद्दिष्टे हवीत. एक असा की अत्यंत पुरुषार्थाने व निरोगी शरीराने चक्रवर्ती राज्याची प्राप्ती करणे आणि दुसरा उद्देश असा की सर्व विद्या चांगल्या प्रकारे शिकून त्यांचा प्रचार व प्रसार करणे. कोणत्याही माणसाने पुरुषार्थ सोडून आळशी राहता कामा नये.