Yajurveda Marathi Bhashya (Mata Savita Joshi)

Yajurveda Adhyay 1 / Mantra 5

31 Mantra
1/5
Devata- अग्निर्देवता Rishi- परमेष्ठी प्रजापतिर्ऋषिः Chhand- आर्ची त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
अग्ने॑ व्रतपते व्र॒तं च॑रिष्यामि॒ तच्छ॑केयं॒ तन्मे॑ राध्यताम्।इ॒दम॒हमनृ॑तात् स॒त्यमुपै॑मि॥५॥

अग्ने॑। व्र॒त॒प॒त॒ इति॑ व्रतऽपते। व्र॒तं। च॒रि॒ष्या॒मि॒। तत्। श॒के॒यं॒। तत्। मे॒। रा॒ध्यता॒म्। इ॒दं। अ॒हं। अनृ॑तात्। स॒त्यं। उप॑ ए॒मि॒ ॥५॥

Mantra without Swara
अग्ने व्रतपते व्रतं चरिष्यामि तच्छकेयं तन्मे राध्यताम् । इदमहमनृतात्सत्यमुपैमि ॥

अग्ने। व्रतपत इति व्रतऽपते। व्रतं। चरिष्यामि। तत्। शकेयं। तत्। मे। राध्यताम्। इदं। अहं। अनृतात्। सत्यं। उप एमि॥५॥

Yajurveda Marathi Bhashya (Mata Savita Joshi)

मराठी
Yajurveda Marathi Bhashya (Mata Savita Joshi) - मराठी
Essence
सर्व माणसांनी आचरणात आणावा अशा वेद धर्माचा उपदेश परमेश्वराने केलेला आहे. तो सत्य लक्षणांनी युक्त व न्यायपूर्ण असा आहे. तो सर्वांचे हित करणारा असून, इहलोक व परलोकाच्या सुखाचा हेतू आहे. सर्वांनी आचरणात आणावा असा तो योग्य धर्म आहे. या विरुद्ध जे आचरण असेल तो अधर्म होय. कारण तो स्वीकारण्यायोग्य नसतो त्यासाठी अधर्माचा सर्वकाळी, सर्वस्थळी त्याग केला पाहिजे व ही शपथ घेतली पाहिजे की, हे परमेश्वरा, आमच्यावर अशी कृपा कर की तू प्रकट केलेल्या (वेदातील) सत्यधर्माचा स्वीकार करून आम्ही त्याच सत्यधर्माचे पालन करावे. त्यामुळे आम्हाला अर्थ, काम, मोक्षरूपी फळ सहज प्राप्त व्हावे. जसा तू सत्यव्रती आहेस प्राप्त व्हावे. जसा तू सत्यव्रती आहेस त्याप्रमाणेच आमच्या सामर्थ्यानुसार आम्हीही सत्यव्रती बनावे व धर्मपालनाच्या इच्छेने सत्कर्म करून सुख प्राप्त करावे. सर्व प्राण्यांना सुखी करावे, अशी इच्छा सर्व माणसांनी बाळगावी.