Yajurveda Marathi Bhashya (Mata Savita Joshi)

Yajurveda Adhyay 1 / Mantra 4

31 Mantra
1/4
Devata- विष्णुर्देवता Rishi- परमेष्ठी प्रजापतिर्ऋषिः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
सा वि॒श्वायुः॒ सा वि॒श्वक॑र्मा॒ सा वि॒श्वधा॑याः। इन्द्र॑स्य त्वा भा॒गꣳ सोमे॒नात॑नच्मि॒ विष्णो॑ ह॒व्यꣳर॑क्ष॥४॥

सा। वि॒श्वायु॒रिति॑ वि॒श्वऽआ॑युः। सा। वि॒श्वक॒र्मेति॑ वि॒श्वऽक॑र्मा। सा। विश्वधा॑या॒ इति॑ वि॒श्वऽधा॑याः। इन्द्र॑स्य। त्वा॒। भा॒गं। सोमे॑न। आ। त॒न॒च्मि॒। विष्णो॒ इति॒ वि॒ष्णो॑। ह॒व्यं। र॒क्ष॒ ॥४॥

Mantra without Swara
सा विश्वायुः सा विश्वकर्मा सा विश्वधायाः । इन्द्रस्य त्वा भागँ सोमेना तनच्मि विष्णो हव्यँ रक्ष ॥

सा। विश्वायुरिति विश्वऽआयुः। सा। विश्वकर्मेति विश्वऽकर्मा। सा। विश्वधाया इति विश्वऽधायाः। इन्द्रस्य। त्वा। भागं। सोमेन। आ। तनच्मि। विष्णो इति विष्णो। हव्यं। रक्ष॥४॥

Yajurveda Marathi Bhashya (Mata Savita Joshi)

मराठी
Yajurveda Marathi Bhashya (Mata Savita Joshi) - मराठी
Essence
वाणी ही तीन प्रकारची असते. प्रथम वाणी अर्थात ब्रह्मचर्यपूर्वक पूर्णविद्या प्राप्त करून दीर्घायू बनण्यासाठी स्वीकारली जाते ती. दुसरी वाणी म्हणजे गृहस्थाश्रमात विविध प्रकारची कामे करून सुख मिळवण्यासाठी विस्तारपूर्वक प्रकट केली जाते ती व तिसरी वाणी म्हणजे ईश्वराला जाणण्यासाठी वानप्रस्थ व संन्यासी विद्वान ज्या वाणीचा उपदेश करतात ती. (ज्यामुळे या जगातील सर्व माणसांची शरीरे व आत्मे यांचे सुख वाढते. ) या तिन्ही प्रकारच्या वाणीशिवाय कुणालाही सुख मिळू शकत नाही त्यामुळे याद्वारेच पूर्वोक्त यज्ञ व सर्वव्यापक ईश्वराची स्तुती, प्रार्थना व उपासना करणे योग्य आहे. ईश्वराची अशी आज्ञा आहे की, या नियमानुसार केलेल्या यज्ञाने जगात माणसांचे रक्षण होते. प्रेमाने व सत्याने प्रार्थना केल्यामुळे ईश्वर विद्वानांचे रक्षण करतो कारण तोच सर्वांच्या मुख्य अधिष्ठाता आहे; पण जी माणसे कर्मकुशल, धार्मिक व परोपकारी असतात तीच ईश्वर व धर्म यांना जाणून सम्यक साधनांनी मोक्षप्राप्ती करून इहलोक व परलोकाचे सुख प्राप्त करतात.