Yajurveda Marathi Bhashya (Mata Savita Joshi)

Yajurveda Adhyay 1 / Mantra 11

31 Mantra
1/11
Devata- अग्निर्देवता Rishi- परमेष्ठी प्रजापतिर्ऋषिः Chhand- स्वराट् जगती, Swara- निषादः
Mantra with Swara
भू॒ताय॑ त्वा॒ नारा॑तये॒ स्वरभि॒विख्ये॑षं॒ दृꣳह॑न्तां॒ दुर्याः॑ पृथि॒व्यामु॒र्वन्तरि॑क्ष॒मन्वे॑मि। पृ॒थि॒व्यास्त्वा॒ नाभौ॑ सादया॒म्यदि॑त्याऽउ॒पस्थेऽग्ने॑ ह॒व्यꣳ र॑क्ष॥११॥

भू॒ताय॑। त्वा॒। न। अरा॑तये। स्वः॑। अ॒भि॒विख्ये॑ष॒मित्य॑भि॒ऽविख्ये॑षम्। दृꣳह॑न्ताम्। दुर्य्याः॑। पृ॒थि॒व्याम्। उ॒रु। अ॒न्तरि॑क्षम्। अनु। ए॒मि॒। पृ॒थि॒व्याः। त्वा॒। नाभौ॑। सा॒द॒या॒मि॒। अदि॑त्याः। उ॒पस्थ॒ इत्यु॒पऽस्थे॑। अग्ने॑। ह॒व्यम् र॒क्ष॒ ॥११॥

Mantra without Swara
भूताय त्वा नारातये । स्वरभिवि ख्येषम् । दृँहन्तां दुर्याः पृथिव्याम् । उर्वन्तरिक्षमन्वेमि । पृथिव्यास्त्वा नाभौ सादयाम्यदित्या उपस्थे ग्ने हव्यँ रक्ष ॥

भूताय। त्वा। न। अरातये। स्वः। अभिविख्येषमित्यभिऽविख्येषम्। दृꣳहन्ताम्। दुर्य्याः। पृथिव्याम्। उरु। अन्तरिक्षम्। अनु। एमि। पृथिव्याः। त्वा। नाभौ। सादयामि। अदित्याः। उपस्थ इत्युपऽस्थे। अग्ने। हव्यम् रक्ष॥११॥

Yajurveda Marathi Bhashya (Mata Savita Joshi)

मराठी
Yajurveda Marathi Bhashya (Mata Savita Joshi) - मराठी
Essence
या मंत्रात श्लेषालंकार आहे. ईश्वराने आज्ञा केलेली आहे की, हे माणसांनो, मी तुमचे रक्षण यासाठी करतो की तुम्ही सर्व प्राण्यांना सुख द्यावे. वेदविद्या, धर्माचे अनुष्ठान करून आपल्या पुरुषार्थाने विविध प्रकारचे सुख नेहमी वाढवावे. सर्व अनुष्ठान करून आपल्या पुरुषार्थाने विविध प्रकारचे सुख नेहमी वाढवावे. सर्व ऋतूंमध्ये सुखदायक होतील अशी सुंदर घरे तयार करून त्यात सुखाने राहावे. मी (परमेश्वराने) निर्माण केलेल्या सृष्टीतील सर्व पदार्थांचे गुणधर्म जाणून अनेक विद्या प्रकट कराव्यात. त्यांचा जगात प्रसार करून सर्व माणसांचे सुख वाढवावे. मी (परमेश्वर) सर्वत्र व्याप्त, सर्वांचा साक्षी व मित्र आहे. सर्व सुख वाढविणारा व उपासना करण्यायोग्य आहे. तसेच सर्वशक्तिमान आहे, हे जाणावे. सर्वांवर उपकार करावा. विविध प्रकारची विद्या वाढवावी. अधर्मापासून निवृत्त होऊन धर्मात प्रवृत्त व्हावे. तसेच क्रियाकौशल्य सिद्ध करून यज्ञाचे अनुष्ठानही करावे.