Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 9 / Mantra 8

40 Mantra
9/8
Devata- प्रजापतिर्देवता Rishi- बृहस्पतिर्ऋषिः Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
वात॑रꣳहा भव वाजिन् यु॒ज्यमा॑न॒ऽइन्द्र॑स्येव॒ दक्षि॑णः श्रि॒यैधि॑। यु॒ञ्जन्तु॑ त्वा म॒रुतो॑ वि॒श्ववे॑दस॒ऽआ ते॒ त्वष्टा॑ प॒त्सु ज॒वं द॑धातु॥८॥

वात॑रꣳहा॒ इति वात॑ऽरꣳहाः। भ॒व॒। वाजि॑न्। युज्यमा॑नः। इन्द्र॑स्ये॒वेतीन्द्र॑स्यऽइव। दक्षि॑णः। श्रि॒या। ए॒धि॒। यु॒ञ्जन्तु॑। त्वा॒। म॒रुतः॑। वि॒श्ववे॑दस॒ इति॑ वि॒श्वऽवे॑दसः। आ। ते॒। त्वष्टा॑। प॒त्स्विति॑ प॒त्ऽसु। ज॒वम्। द॒धा॒तु॒ ॥८॥

Mantra without Swara
वातरँहा भव वाजिन्युज्यमान इन्द्रस्येव दक्षिणः श्रियैधि । युञ्जन्तु त्वा मरुतो विश्ववेदस आ ते त्वष्टा पत्सु जवन्दधातु ॥

वातरꣳहा इति वातऽरꣳहाः। भव। वाजिन्। युज्यमानः। इन्द्रस्येवेतीन्द्रस्यऽइव। दक्षिणः। श्रिया। एधि। युञ्जन्तु। त्वा। मरुतः। विश्ववेदस इति विश्वऽवेदसः। आ। ते। त्वष्टा। पत्स्विति पत्ऽसु। जवम्। दधातु॥८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (वाजिन्) शास्त्रोक्त क्रिया - कौशल्याने (वैज्ञानिक प्रयोग, शोध आदीद्वारे) ज्ञात अशा उपयुक्त ज्ञानाने संपन्न हे वाजा, (त्वा) आपणाला (विश्वेवदस:) सर्व विद्या जाणणार्‍या (मरूत:) विद्वानांनी (वैज्ञानिकांनी) राज्य-शासन आणि शिल्पविद्येच्या कामीं (युज्जुतु) संयुक्त करावे. तसेच (त्वष्टा) वेगगामी यान साधनांचे ज्ञाता वैज्ञानिकांनी (ते) तुमच्या (पत्यु) पायांमधे (जवम्) वेग (आदधातु) आणावा (तुमच्या गमन, आक्रमण, प्रगती आदी कार्यात वेग वा शीघ्रत्व कसे येईल, हे तुम्हांस सांगावे) (अशा विद्वानांच्या साहाय्याने) आपण (वातरंश:) वायूच्या वेगाप्रमाणे शीघ्रगामी (भव) व्हा. (यज्यमान) नेहमी सावध राहून (दक्षिण:) प्रशंसित धर्माप्रमाणे वागण्याचे बळ प्राप्त करा आणि (इन्द्रस्थेव) परमैश्वर्यशाली राजाप्रमाणे (श्रिया) सौन्दर्य आणि राज्यसंपदेसह अतवा आपल्या राणीसह (एधि) वर्धमान, प्रगतिशील व्हा ॥8॥
Essence
भावार्थ - या मंत्रात उपमा अलंकार आहे. कार्याशी संबंधित असणार्‍या हे स्त्री-पुरुषहो, आपण अहंकार आणि मात्सर्यभावाचा त्याग करून इतर जनांची उन्नती पाहून आनंदित होणारे व्हा आणि विद्वज्जनांसह राजधर्माचे पालन करा. तसेच विमान आदी यानांमध्ये बसून इच्छित देशांना जा- जितेंद्रिय व्हा आणि प्रजेला निरंतर आनंदीत ठेऊन स्वत: देखील आनदी व श्रीमान व्हा. ॥8॥
Subject
विद्वज्जनांनी राजाला काय उपदेश करावा, पुढील मंत्रात याविषयी कथन केले आहे-