Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 9 / Mantra 7

40 Mantra
9/7
Devata- सेनापतिर्देवता Rishi- बृहस्पतिर्ऋषिः Chhand- उष्णिक् Swara- ऋषभः
Mantra with Swara
वातो॑ वा॒ मनो॑ वा गन्ध॒र्वाः स॒प्तवि॑ꣳशतिः। तेऽअग्रेऽश्व॑मयुञ्जँ॒स्तेऽअ॑स्मिन् ज॒वमाद॑धुः॥७॥

वातः॑। वा॒। मनः॑। वा॒। ग॒न्ध॒र्वाः। स॒प्तवि॑ꣳशति॒रिति॑ स॒प्तऽवि॑ꣳशतिः। ते। अग्रे॑। अश्व॑म्। अ॒यु॒ञ्ज॒न्। ते। अ॒स्मि॒न्। ज॒वम्। आ। अ॒द॒धुः॒ ॥७॥

Mantra without Swara
वातो वा मनो वा गन्धर्वाः सप्तविँशतिः । ते अग्रे श्वमयुञ्जँस्ते ऽअस्मिञ्जवमादधुः ॥

वातः। वा। मनः। वा। गन्धर्वाः। सप्तविꣳशतिरिति सप्तऽविꣳशतिः। ते। अग्रे। अश्वम्। अयुञ्जन्। ते। अस्मिन्। जवम्। आ। अदधुः॥७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - जे विद्यावान जन (वायु:) वायूच्या (वा) गतीप्रमाणे आणि (मन:) मनाच्या गतीप्रमाणे वेगवान (सप्तविंशति:) सत्तावीस (गन्धर्वा:) गंधर्व म्हणजे वायू, इंद्रियें आणि प्राणांचे धारण करणारे असे सत्तावीस (गंधर्व) आहेत त्यांच्याशक्ष (अस्मिन्) या संसारात (अग्रे) सर्वप्रथम (अश्वम्) व्यापत्व आदी गुणांशी (अयुंजन्) ज्यांनी संबंध ठेवला. (त्यावर नियंत्रण, संयम ठेऊन त्यांच्यापासून लाभ घेतला आहे) (ते) ती माणसेच (जवय्) अतितीव्र वेग (आद धु:) धारण करतात. (जे लोक त्वरित कार्यप्रवृत्त होतात, झटपट कामें पूर्ण करतात, तेच उन्नती व प्रगती करतात) ॥7॥
Essence
भावार्थ - ईश्वराने या सत्तावीस पदार्थांची रचना केली आहेत समष्टि वायु अर्थात प्राण, अपान, व्यान, उदान, समान, नाग, कर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय. दहा वायू याशिवाय बारावे मन आणि त्याबरोबर दहा इंद्रिये आणि पाच सुक्ष्मभूत-अशा सत्तावीस पदार्थांची रचना परमेश्वराने या जागत प्रथम केली आहे. जे लोक या पदार्थांच्या गुण, कर्म, स्वभाव (क्रिया व परिणाम) यांचे योग्यप्रकारे ज्ञान मिळवून त्यांना यथोचित कार्यात उपयोगात आणतात, आणि केवळ स्व पत्नीशी रतिमान होतात, ते संपूर्ण ऐश्वर्य प्राप्त करतात आणि राज्यासाठी योग्य (नागरिक सिद्ध होतात ॥7॥
Subject
मनुष्यांनी कोणत्या उपायाने वेगगामी होणे शिकावे, पुढील मंत्रात याविषयी वर्णन केले आहे -