Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 9 / Mantra 6

40 Mantra
9/6
Devata- अश्वो देवता Rishi- बृहस्पतिर्ऋषिः Chhand- भूरिक जगती, Swara- निषादः
Mantra with Swara
अ॒प्स्वन्तर॒मृत॑म॒प्सु भे॑ष॒जम॒पामु॒त प्रश॑स्ति॒ष्वश्वा॒ भव॑त वा॒जिनः॑। देवी॑रापो॒ यो व॑ऽऊ॒र्मिः प्रतू॑र्तिः क॒कुन्मा॑न् वाज॒सास्तेना॒यं वाज॑ꣳ सेत्॥६॥

अ॒प्स्वित्य॒प्ऽसु। अ॒न्तः। अ॒मृत॑म्। अ॒प्स्वित्य॒प्ऽसु। भे॒ष॒जम्। अ॒पाम्। उ॒त। प्रश॑स्ति॒ष्विति॒ प्रऽश॑स्तिषु। अश्वाः॑। भव॑त। वा॒जिनः॑। देवीः॑। आ॒पः॒। यः। वः॒। ऊ॒र्मिः। प्रतू॑र्त्तिरिति॒ प्रऽतू॑र्त्तिः। क॒कुन्मा॒निति॑ क॒कुत्ऽमा॑न्। वा॒ज॒सा इति॑ वाज॒ऽसाः। तेन॑। अ॒यम्। वाज॑म्। से॒त् ॥६॥

Mantra without Swara
अप्स्वन्तरमृतमप्सु भेषजमपामुत प्रशस्तिष्वश्वा भवत वाजिनः । देवीरापो यो वऽऊर्मिः प्रतूर्तिः ककुन्मान्वाजसास्तेनायं वाजँ सेत् ॥

अप्स्वित्यप्ऽसु। अन्तः। अमृतम्। अप्स्वित्यप्ऽसु। भेषजम्। अपाम्। उत। प्रशस्तिष्विति प्रऽशस्तिषु। अश्वाः। भवत। वाजिनः। देवीः। आपः। यः। वः। ऊर्मिः। प्रतूर्त्तिरिति प्रऽतूर्त्तिः। ककुन्मानिति ककुत्ऽमान्। वाजसा इति वाजऽसाः। तेन। अयम्। वाजम्। सेत्॥६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (राष्ट्रातील वीर स्त्री-पुरुषांना संबोधून एक विद्वान म्हणत आहे) हे (देवी:) दिव्यगुणसंपन्न आणि (आप:) अंतरिक्षात (विमान, मुहयातादीत बसून) उड्डाण करणार्‍या वी स्त्री-पुरुषांनो, (य:) हे (व) तुमच्यामध्ये जे (समुद्रस्य) समुद्राच्या (कुकुन्मान्) चंचलता (लहरीच्या रुपातील) गुण आहे तसेच (वाजसा:) युद्धात विजय मिळविण्यासाठी (प्रतूर्ति:) अत्यंत प्रबळ समुद्राच्या (अर्मि:) लाटा (भरतीच्या काळातील) शक्ती आहे, त्या पराक्रमरुप गुणाचे तुम्ही ग्रहण करा. जे जल (अण्सु) प्राणांसाठी (अमृतम्) मृत्युपासून दूर होण्याचे गुण देते आणि (आसु) जलांमध्ये अपमृत्यूपासून वाचविण्याचे जे गुण आहे आणि जे जल (भेषजम्) रोगनिवारक औषधीप्रमाणे परिणामकारक आहे, त्या गुणांचे ग्रहण करण्यासाठी (अयम्) तुमच्या सेनापती तुमच्यासाठी (वाजम्) योग्य व आवश्यक अन्नादी पदार्थांचा तसेच युद्ध-साहित्याचा प्रबंध करो. (तेन) त्याद्वारे (तुम्ही वीर-स्त्री व पुरुष) (अपाम्) जलाच्या आणि प्राण्यांच्या (पुत्रास्तिषु) अद्भुत शक्तीमुळे (वाजिन:) प्रशंसनीय शक्तीशाली आणि पराक्रमी होऊन (वाज:) कुलीन घोड्याप्रमाणे तीव्रगामी (भवत) व्हा ॥6॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. स्त्रियांनी कसे असावे? समुद्राप्रमाणे गंभीर, पाण्याप्रमाणे शीतल असावे तसेच वीरपुत्रांना जन्म देण्यासाठी औषधी-सेवन करावे आणि जल आदी पदार्थांच्या गुणांना जाणून त्यांपासून उचित लाभ घ्यावेत. त्याचप्रमाणे जे पुरुष वायू आणि जलाच्या गुणांना जाणणार्‍या (वैज्ञानिक, वैद्यकीय आदी) लोकांचा संगती करतात, ते सदा नीरोग राहून विजयी व यशस्वी होतात. ॥6॥
Subject
पुढील मंत्रात, स्त्रियांनी व पुरुषांनी कसे असावे, (गुणवान, कीर्तिमान व्हावे) याविषयी सांगितले आहे -