Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 9 / Mantra 38

40 Mantra
9/38
Devata- रक्षोघ्नो देवता Rishi- देवावत ऋषिः Chhand- भूरिक ब्राह्मी बृहती, Swara- मध्यमः
Mantra with Swara
दे॒वस्य॑ त्वा सवि॒तुः प्र॑स॒वेऽश्विनो॑र्बा॒हुभ्यां॑ पू॒ष्णो हस्ता॑भ्याम्। उ॒पा॒शोर्वी॒र्येण जुहोमि ह॒तꣳ रक्षः॒ स्वाहा॒ रक्ष॑सां त्वा व॒धायाव॑धिष्म॒ रक्षोऽव॑धिष्मा॒मुम॒सौ ह॒तः॥३८॥

दे॒वस्य॑। त्वा॒। स॒वि॒तुः। प्र॒स॒व इति॑ प्रऽस॒वे। अ॒श्विनोः॑। बा॒हुभ्या॒मिति॑ बा॒हुऽभ्या॑म्। पू॒ष्णः। हस्ता॑भ्याम्। उ॒पा॒शोरित्यु॑पऽअ॒ꣳशोः। वी॒र्येण। जु॒हो॒मि॒। ह॒तम्। रक्षः॑। स्वाहा॑। रक्ष॑साम्। त्वा॒। व॒धाय॑। अव॑धिष्म। रक्षः॑। अव॑धिष्म। अ॒मुम्। अ॒सौ। ह॒तः ॥३८॥

Mantra without Swara
देवस्य त्वा सवितुः प्रसवे श्विनोर्बाहुभ्याम्पूष्णो हस्ताभ्याम् । उपाँशोर्वीर्येण जुहोमि हतँ रक्षः स्वाहा रक्षसान्त्वा वधायावधिष्म रक्षोवधिष्मामुमसौ हतः ॥

देवस्य। त्वा। सवितुः। प्रसव इति प्रऽसवे। अश्विनोः। बाहुभ्यामिति बाहुऽभ्याम्। पूष्णः। हस्ताभ्याम्। उपाशोरित्युपऽअꣳशोः। वीर्येण। जुहोमि। हतम्। रक्षः। स्वाहा। रक्षसाम्। त्वा। वधाय। अवधिष्म। रक्षः। अवधिष्म। अमुम्। असौ। हतः॥३८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (विद्वान प्रजाजन राजाप्रति) हे राजन्, मी (स्वाहा) सत्य आचरणाद्वारा (तुम्हांस आवाहन करीत आहे) आपणांस (सवितु:) ऐश्वर्योत्पादक (देवस्य) प्रशंकित न्यायकारी अशा आपल्या (प्रसवे) ऐश्वर्यासह, आणि (उपांशो:) समीपस्थ आपल्या सैन्याच्या (वीटर्पेण) पराक्रमासह आपणांस ग्रहण करीत आहे. तसेच (अश्विनो:) सूर्य आणि चंद्र यांच्याप्रमाणे गुणवान पराक्रमी सेनापतीच्या (बाहुभ्याम्) बाहूंमह आणि (पूष्ण:) पुष्टिकारक वैद्याच्या (हस्ताभ्याम्) गुणकारक (हस्ताभ्याम्) हातांसह (रक्ष:) राक्षसांच्या (दुष्टांच्या) (वधाय) विनाशासाठी मी (त्वा) आपणास (जुहोमि) ग्रहण करीत आहे (आपण आपल्या पराक्रमी सैन्याद्वारे दुष्टांचा संहार आणि वैद्यांच्या पुष्टिकारक औषधीद्वारे प्रजेचे पोषण करावे, यांसाठी आपणास आवाहन करीत आहे.) हे राजन्, ज्याप्रमाणे आपण (रक्ष:) दुष्टांचा (हतम्) वध केला आहे, त्याप्रमाणे आम्ही प्रजाजनांनी देखील (अवधिष्म) दुष्टांचा संहार करावा. (असौ) तो दुष्ट (हत:) मारला जावा, यासाठी आम्ही सर्वजणांनी त्याला (अवधिष्म) पूर्णपणे नष्ट करावे. (ज्यात दुर्जनांचा समूळ नाश व्हावा, असे यत्न करावेत.) ॥38॥
Essence
भावार्थ - प्रजाजनांनी स्वत:च्या संरक्षणासां आणि दुर्जनांच्या विनाशासाठी तसेच प्रजेत धर्माविषयी ओढ निर्माण होण्याकरिता सुखभावी, विद्या-धर्मप्रचारक, वीर, जितेंद्रिय, सत्यभाषी अशा मनुष्याला सभाध्यक्ष राजा म्हणून मान्य करावे. (याविरूद्ध असलेल्या मनुष्यास कदापि राजा वा सभापती करूं नये) ॥38॥
Subject
प्रजेने राज्यात कोणाला (कशा प्रकारच्या) व्यक्तीला सभाधीश म्हणून मान्यता घ्यावा? याविषयी: