Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 9 / Mantra 37

40 Mantra
9/37
Devata- अग्निर्देवता Rishi- देवावत ऋषिः Chhand- निचृत् अनुष्टुप्, Swara- गान्धारः
Mantra with Swara
अग्ने॒ सह॑स्व॒ पृ॑तनाऽअ॒भिमा॑ती॒रपा॑स्य। दु॒ष्टर॒स्तर॒न्नरा॑ती॒र्वर्चो॑ धा य॒ज्ञवा॑हसि॥३७॥

अग्ने॑। सह॑स्व। पृत॑नाः। अ॒भिमा॑ती॒रित्य॒भिऽमा॑तीः। अप॑। अ॒स्य॒। दु॒ष्टरः॑। दु॒ष्तर॒ इति॑ दुः॒ऽतरः॑। तर॒न्। अरा॑तीः। वर्चः॑। धाः॒। य॒ज्ञवा॑ह॒सीति॑ य॒ज्ञऽवा॑हसि ॥३७॥

Mantra without Swara
अग्ने सहस्व पृतनाऽअभिमातीरपास्य । दुस्टरस्तरन्नरातीर्वर्चाधा यज्ञवाहसि ॥

अग्ने। सहस्व। पृतनाः। अभिमातीरित्यभिऽमातीः। अप। अस्य। दुष्टरः। दुष्तर इति दुःऽतरः। तरन्। अरातीः। वर्चः। धाः। यज्ञवाहसीति यज्ञऽवाहसि॥३७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (प्रजाजन राजाला संबोधून म्हणत आहेत) हे राजा, सर्व विद्या जाणणारे आपण (दुष्टर:) अतिशय कष्टाने व प्रयत्नाने ज्यांना जिंकता येते अशा (करन) शत्रुसैन्याला (आपल्या रणनीती व युद्धकौशल्याने) सहजपणे जिंकत (यज्ञवाहसी) राजधर्मरुप यज्ञात मग्न आहात (अभिमाती:) अत्यंत स्वाभिमानी व उल्हासयुक्त (पृतना:) शक्ती संपन्न आणि उत्तमप्रकारे प्रशिक्षित अशा आपल्या वीरसेने (सहस्व) सह व आपण सकुशल रहा (आपण व आपल्या सैन्याने सदा विजय संपादित करावा) (अराती:) दु:ख देणार्‍या शत्रूंना (अपास्य) दूर घालवून द्या आणि (वर्च:) आपल्या अंगीं विद्या, बल आणि न्यायवृत्ती (धा:) धारण करा ॥37॥
Essence
भावार्थ - राजा आणि राजपुरुषांनी, सैन्याधिकारी आदी जणांनी स्वत: विद्या आणि सुशिल संपन्न व्हावे व आपल्या सेनेलादेखील ज्ञानवान व प्रशिक्षित करावे. अशाप्रकारे स्वत: अजेय राहून शत्रूंना पराभूत करून भूमीवर सदा आपल्या कीर्तीचा विस्तार करीत राहावे ॥37॥
Subject
पुनश्च, राजा आदी राजपुरुषांनी कसे आचारण करावे, याविषयी -