Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 9 / Mantra 36

40 Mantra
9/36
Devata- विश्वेदेवा देवताः Rishi- वरुण ऋषिः Chhand- विकृति Swara- मध्यमः
Mantra with Swara
ये दे॒वाऽअ॒ग्निने॑त्राः पुरः॒सद॒स्तेभ्यः॒ स्वाहा॒ ये दे॒वा य॒मने॑त्रा दक्षिणा॒सद॒स्तेभ्यः॒ स्वाहा॒ ये दे॒वा वि॒श्वदे॑वनेत्राः पश्चा॒त्सद॒स्तेभ्यः॒ स्वाहा॒ ये दे॒वा मि॒त्रावरु॑णनेत्रा वा म॒रुन्ने॑त्रा वोत्तरा॒सद॒स्तेभ्यः॒ स्वाहा॒ ये दे॒वाः सोम॑नेत्राऽउपरि॒सदो॒ दुव॑स्वन्त॒स्तेभ्यः॒ स्वाहा॑॥३६॥

ये। दे॒वाः। अग्निने॑त्रा॒ इत्य॑ग्निऽने॑त्राः। पु॒रः॒सद॒ इति॑ पु॒रः॒ऽसदः॑। तेभ्यः॑। स्वाहा॑। ये। दे॒वाः। य॒मने॑त्रा॒ इति॑ य॒मऽने॑त्राः। द॒क्षि॒णा॒सद॒ इति॑ दक्षिणा॒ऽसदः॑। तेभ्यः॑। स्वाहा॑। ये। दे॒वाः। वि॒श्वदे॑वनेत्रा॒ इति॑ वि॒श्वदे॑वऽनेत्राः। प॒श्चात्सद॒ इति॑ पश्चा॒त्ऽसदः॑। तेभ्यः॑। स्वाहा॑। ये। दे॒वाः। मि॒त्रावरु॑णनेत्रा॒ इति॑ मि॒त्रावरु॑णऽनेत्राः। वा॒। म॒रुन्ने॑त्रा॒ इति॑ म॒रुत्ऽने॑त्राः। वा॒। उ॒त्त॒रा॒सद॒ इत्यु॑त्तरा॒ऽसदः॑। तेभ्यः॑। स्वाहा॑। ये। दे॒वाः। सोम॑नेत्रा॒ इति सोम॑ऽनेत्राः। उ॒प॒रि॒सद॒ इत्यु॑परि॒ऽसदः॑। दुव॑स्वन्तः। तेभ्यः॑। स्वाहा॑ ॥३६॥

Mantra without Swara
ये देवाऽअग्निनेत्राः पुरःसदस्तेभ्यः स्वाहा ये देवा यमनेत्रा दक्षिणासदस्तेभ्यः स्वाहा ये देवा विश्वदेवनेत्राः पश्चात्सदस्तेभ्यः स्वाहा ये देवा मित्रावरुणनेत्रा वा मरुन्नेत्रा वोत्तरासदस्तेभ्यः स्वाहा ये देवाः सोमनेत्रा ऽउपरिसदो दुवस्वन्तस्तेभ्यः स्वाहा ॥

ये। देवाः। अग्निनेत्रा इत्यग्निऽनेत्राः। पुरःसद इति पुरःऽसदः। तेभ्यः। स्वाहा। ये। देवाः। यमनेत्रा इति यमऽनेत्राः। दक्षिणासद इति दक्षिणाऽसदः। तेभ्यः। स्वाहा। ये। देवाः। विश्वदेवनेत्रा इति विश्वदेवऽनेत्राः। पश्चात्सद इति पश्चात्ऽसदः। तेभ्यः। स्वाहा। ये। देवाः। मित्रावरुणनेत्रा इति मित्रावरुणऽनेत्राः। वा। मरुन्नेत्रा इति मरुत्ऽनेत्राः। वा। उत्तरासद इत्युत्तराऽसदः। तेभ्यः। स्वाहा। ये। देवाः। सोमनेत्रा इति सोमऽनेत्राः। उपरिसद इत्युपरिऽसदः। दुवस्वन्तः। तेभ्यः। स्वाहा॥३६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे सभाध्यक्ष राजा, (ये) जे (अग्निनेत्रा:) विद्युत आदी ऊर्जादायक पदार्थांच्या गुण आणि उपयोगांच्या ज्ञान असणारे (पुर:सद:) आपल्या राजसभेत वा देशात अथवा पूर्व दिशेत (देवा:) विद्वान (वैज्ञानिक) आहेत, (तेभ्य:) त्यांच्याकडून (स्वाहा) सत्यवाणी व सत्यज्ञान ग्रहण करा. (ये) जे (यमनेत्रा:) यम म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय आदी योगाच्या आठ अंगात निपुण असे (दक्षिणासद:) दक्षिण दिशेश स्थित (देवा:) योगी आणि न्यायाधीश आहेत, (तेभ्य:) त्यांच्याकडून (स्वाहा) सत्यव्यवहार ग्रहण करा. (ये) जे (पश्चात्सद:) पश्चिम दिशेत (विश्वेदेवनेत्रा:) पृथ्वी आदी सर्व पदार्थांचे ज्ञाता (देवा:) सर्व विद्यांचे ज्ञान असणारे विद्वान आहेत, (तेभ्य:) त्यांच्याकडून (स्वाहा) दंडनीतीने ज्ञान मिळवा. (ये) जे (उत्तरासद:) प्रश्नांचे उत्तर देऊन समाधान करणारे उत्तर दिशेत (वा) अथवा खाली आणि वर, (सर्वत्र) (मित्रावरूण नेत्रा:) प्राण आणि उदान वायूप्रमाणे सर्व धर्माविषयी सांगणारे (वा) अथवा (मरून्नेत्रा:) ब्रह्मांडाच्या वायु मंडळातील गुण नेत्राप्रमाणे प्रत्यक्ष पाहणारे (देवा:) विद्वान आहेत, (तेभ्य:) त्यांच्याकडून हे राजा, आपण (स्वाहा) सर्वांचे कल्याण करणार्‍या विद्या जाणून घ्या. तसेच (मे) जे (उपरिसद:) उच्च आसनावर बसणारे आणि उच्चश्रेष्ठ आचरण करणारे (दुवस्वन्त:) औषधींच्या अनेक प्रकारच्या गुणधर्मांचे ज्ञान असणारे (देवा:) आयुर्वेदाचे ज्ञाता वैद्य आहे (तेभ्य:) त्यांच्याकडून (स्वाहा) अमृतमय औषधींचे ज्ञान मिळवा वा (प्रकृतीत विकार आल्यास त्यांनी दिलेल्या आषधींचे सेवन करा) (राजासाठी हे हितकर आहे की त्याने सत्यभाषण, सत्याचरण शिकावे, राष्ट्राच्या सर्व दिशेत राहणार्‍या विद्वान, वैज्ञानिक, वैद्य आदी गुणवान लोकांकडून उपयोगी ज्ञान मिळवावे. आणि त्या ज्ञानाची वृद्धी करण्यासाठी यत्न करावेत) ॥36॥
Essence
भावार्थ - हे राजा आदी मनुष्यांनो (राजपुरुष सैनिक, राजकर्मचारी गण) तुम्ही जेव्हां स्वत: धार्मिक, सुशील आणि विद्यावान होऊन सर्व दिशेत विचरण करून तेथील सर्वविद्या पारंगत आप्त विद्वानांचा शोध घ्याल, त्यांचा योग्य तो आदर-सम्मान कराल आणि त्यांच्याकडून ज्ञान संपादित करून विद्यावान व्हाल, तेव्हां ते देखील तुमच्याजवळ देऊन तुमच्या संगतीत राहून धर्म अर्थ, काम आणि मोक्ष यांची तुम्हाला प्राप्ती करवितील. जे मनुष्य (विविध विषयांचे ज्ञान व विज्ञान कला, विद्या शिकण्यासाठी) देश-विदेशात जातात, द्वीप-द्वीपांतरामध्ये वास्तव्य करून विद्या, विनय, सुशिक्षा आणि क्रिया-कौशल्य ग्रहण करतात (इतर देशांकडून उपयोगी ज्ञान ग्रहण करतात) ते स्वत:सुखी होऊन इतरांनाही सुखी करतात. ॥36॥
Subject
मनुष्यांनी सर्वत्र विचरण करून ज्ञान व विद्येचे संपादन करावे, याविषयी -