Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 9 / Mantra 30

40 Mantra
9/30
Devata- इन्द्रो देवता Rishi- बृहस्पतिर्ऋषिः Chhand- जगती, Swara- निषादः
Mantra with Swara
दे॒वस्य॑ त्वा सवि॒तुः प्र॑स॒वेऽश्विनो॑र्बा॒हुभ्यां॑ पू॒ष्णो हस्ता॑भ्याम्। सर॑स्वत्यै वा॒चो य॒न्तुर्य॒न्त्रिये॑ दधामि॒ बृह॒स्पते॑ष्ट्वा॒ साम्रा॑ज्येना॒भिषि॑ञ्चाम्यसौ॥३०॥

दे॒वस्य॑। त्वा॒। स॒वि॒तुः। प्र॒स॒व इति॑ प्रऽस॒वे। अ॒श्विनोः॑। बा॒हुभ्या॒मिति॑ बा॒हुऽभ्याम्। पू॒ष्णः। हस्ता॑भ्याम्। सर॑स्वत्यै। वा॒चः। य॒न्तुः। य॒न्त्रिये॑। द॒धा॒मि॒। बृह॒स्पतेः॑। त्वा॒। साम्रा॑ज्ये॒नेति॒ साम्ऽरा॑ज्येन। अ॒भि। सि॒ञ्चा॒मि॒। अ॒सौ॒ ॥३०॥

Mantra without Swara
देवस्य त्वा सवितुः प्रसवे श्विनोर्बाहुभ्याम्पूष्णो हस्ताभ्याम् । सरस्वत्यै वाचो यन्तुर्यन्त्रिये दधामि बृहस्पतेष्ट्वा साम्राज्येनाभि षिञ्चाम्यसौ ॥

देवस्य। त्वा। सवितुः। प्रसव इति प्रऽसवे। अश्विनोः। बाहुभ्यामिति बाहुऽभ्याम्। पूष्णः। हस्ताभ्याम्। सरस्वत्यै। वाचः। यन्तुः। यन्त्रिये। दधामि। बृहस्पतेः। त्वा। साम्राज्येनेति साम्ऽराज्येन। अभि। सिञ्चामि। असौ॥३०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - सर्व सद्गुण, सत्कर्म आणि सत्स्वभावयुक्त हे विद्वान, (असौ) तो मी (राज्याभिषेक करणारा एक पुरोहित अथा पंडित) आपणाला (सवि तु:) सर्वजगदुत्पादक (देवस्य) प्रकाशमान, वंदनीय परमेश्वराने (प्रसेव) उत्पन्न केलेल्या या संसारामध्ये राजपदासाठी धारण करीत आहे (सरस्वत्यै) सद्विद्या आणि सद्शिल्पमय या जगामधे (वाच:) वेदवाणीसह (वेदमंत्राच्या पावनघोषात) (अश्विनो:) सूर्य आणि चंद्र यांच्या बल आणि आकर्षण (बाहुभ्याम्) बाहुप्रमाणे असलेल्या या शक्तींनी तसेच (पूष्णो:) पोषक वायूच्या धारण आणि पोषण (हस्ताभ्याम्) हाताप्रमाणे असलेल्या या शक्तींनी (त्वा) आपणाला धारण करीत आहे (हे राजा, मी पुरोहित, राष्ट्ररक्षणाकरिता बळ, आकर्षण, आणि प्रजेचे धारण व पोषण या कार्यासाठी आपणांस नियुक्त करीत आहे.) (बृहस्पते:) मोठमोठे विज्ञान वैज्ञानिक) असलेल्या (यंत्रिये) यंत्रविद्या शिल्पविद्यायुक्त अशा राज्यात (साम्राज्येन) चक्रवर्ती राजासाठी आवश्यक अशा सर्व गुणांनी (त्वा) आपले (अभि) सर्वत: (सिंघानि) सुवासिक रसांद्वारे मार्जन वा सिंचन करीत आहे (राज्याभिषेकाच्या वेळी सुगंधित जल, द्रव्यादींनी आपणांला अभिषिक्त करीत आहे) ॥30॥
Essence
भावार्थ - मनुष्यांसाठी (राज्यातील जनतेसाठी) हे उचित आहे की त्यांनी अशा सुपरीक्षित, समर्थ विद्वान व्यक्तीस सभाध्यक्षपदी निवडावे की जो ईश्वराविषयी श्रद्धा-प्रेम असणारा आहे, जो शक्तीपराक्रमयुक्त आणि पुष्ट प्रकृतीचा आहे, चतुर, सत्यवादी, जितेंद्रिय, धर्माला आणि प्रजापालनकार्यात समर्थ आहे. चांगल्याप्रकारे परीक्षा करून अशा मनुष्याचा अभिषेक करावा आणि उत्तमप्रकारे राजधर्माची उन्नती करीत रहावे ॥30॥
Subject
पुनश्च, कुठे व कोणत्या प्रकारच्या मनुष्याला राजा करावे, पुढील मंत्रात या विषयी उपदेश केला आहे -
Footnote
(टीप : मूळ हिंदी भाष्यामधे या मंत्रातील ‘पूष्णो’ ‘बाहुभ्याम्’ हे दोन शब्द आणि त्यांचा अर्थ मुद्रणदोषामुळे किंवा अन्य कारणामुळे देण्यात आला नाही. तो संस्कृत भाष्याच्या आधारे मराठी अनुवादात चिन्हांकित ठिकाणी दिला आहे - अनुवादक)