Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 9 / Mantra 28

40 Mantra
9/28
Devata- अग्निर्देवता Rishi- तापस ऋषिः Chhand- भूरिक अनुष्टुप्, Swara- गान्धारः
Mantra with Swara
अग्ने॒ऽअच्छा॑ वदे॒ह नः॒ प्रति॑ नः सु॒मना॑ भव। प्र नो॑ यच्छ सहस्रजि॒त् त्वꣳ हि ध॑न॒दाऽअसि॒ स्वाहा॑॥२८॥

अग्ने॑। अच्छ॑। व॒द॒। इ॒ह। नः॒। प्रति॑। नः॒। सु॒मना॒ इति॑ सु॒ऽमनाः॑। भ॒व॒। प्र। नः॒। य॒च्छ॒। स॒ह॒स्र॒जि॒दिति॑ सहस्रऽजित्। त्वम्। हि। ध॒न॒दा॒ इति॑ धन॒ऽदाः। असि॒। स्वाहा॑ ॥२८॥

Mantra without Swara
अग्ने ऽअच्छा वदेह नः प्रति नः सुमना भव । प्र नो यच्छ सहस्रजित्त्वँ हि धनदा ऽअसि स्वाहा ॥

अग्ने। अच्छ। वद। इह। नः। प्रति। नः। सुमना इति सुऽमनाः। भव। प्र। नः। यच्छ। सहस्रजिदिति सहस्रऽजित्। त्वम्। हि। धनदा इति धनऽदाः। असि। स्वाहा॥२८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (अग्ने) विद्वान, आपण (इह) या वेळीं (स्वाहा) सत्यभाषण करीत (न:) आम्हाला (अच्छ) चांगल्याप्रकारे (वद) उपदेश करा. (न:) आमच्याशी (सुमना:) मैत्रीपूर्ण मनाचे (भव) असा (हि) निश्चयाने आपण (सहस्रजित्) कोणाच्या साहाय्याविना हजार वीरांना (वा विद्वानांना वादविवादात) जिंकणारे आणि (धनदा:) ऐश्वर्य देणारे (असि) आहात-(कृपाकरून) (न:) आम्हाला देखील (उपदेश, ज्ञान आणि ऐश्वर्य)(प्रयच्छ) द्या. ॥28॥
Essence
भावार्थ - या मंत्रात ईश्वराने उपदेश केला आहे की राजाने, प्रजेशी आणि सैनिकांशी नेहमी सत्य व प्रियवचनें बोलावींत, त्यांना धन द्यावे व त्यांच्याकडून घ्यावे, तसेच त्यांचे शारीरिक व आत्मिक बळ वाढवून आणि त्यांच्या साहाय्याने शत्रूंना जिंकून धर्माप्रमाणे प्रजेचे पालन करावे. ॥28॥
Subject
पुनश्च, राजाच्या कर्तव्य कर्मांविषयी पुढील मंत्रात प्रतिपादन केले आहे -