Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 9 / Mantra 27

40 Mantra
9/27
Devata- अर्य्यमादिमन्त्रोक्ता देवताः Rishi- तापस ऋषिः Chhand- स्वराट अनुष्टुप्, Swara- गान्धारः
Mantra with Swara
अ॒र्य॒मणं॒ बृह॒स्पति॒मिन्द्रं॒ दाना॑य चोदय। वाचं॒ विष्णु॒ꣳ सर॑स्वती सवि॒तारं॑ च वा॒जिन॒ꣳ स्वाहा॑॥२७॥

अ॒र्य्य॒मण॑म्। बृह॒स्पति॑म्। इन्द्र॑म्। दाना॑य। चो॒द॒य॒। वाच॑म्। विष्णु॑म्। सर॑स्वतीम्। स॒वि॒तार॑म्। च॒। वा॒जिन॑म्। स्वाहा॑ ॥२७॥

Mantra without Swara
अर्यमणम्बृहस्पतिमिन्द्रन्दानाय चोदय । वाचँ विष्णुँ सरस्वतीँ सवितारंञ्च वाजिनँ स्वाहा ॥

अर्य्यमणम्। बृहस्पतिम्। इन्द्रम्। दानाय। चोदय। वाचम्। विष्णुम्। सरस्वतीम्। सवितारम्। च। वाजिनम्। स्वाहा॥२७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (ईश्वराची आज्ञा राजप्रति) हे राजा, तू (स्वाहा) सत्यनीतीने वागत (दानाय) विद्या आदींचे दान देण्याकरिता (अर्यमणम्) निष्पक्षपाती न्यायी (बृहस्पत्रिम्) सर्व विद्या शिकविणार्‍या (इन्द्रम्) ऐश्वर्यशाली (वाघम्) वेदवाणीच्या विद्वानाला सत्कर्मासाठी प्रेरणाकर तसेच (विष्णुम्) सर्वांचा अधिष्ठाता असलेल्या (सवितारम्) वेद विद्यापारंगत आणि ऐश्वर्योत्पादक (वाजिनम्) बल-वेगादीनी युक्त अशा शूरवीराला सत्कर्म करण्यासाठी प्रेरणा कर. तसेच (सरस्वतीम्) वेदादीशास्त्र शिकविणार्‍या विदुषी स्त्रीला चांगले कर्म करण्यासाठी (चोदय) सदा प्रेरणा देत रहा. (राजाने वेदज्ञ विद्वान, शूरवीर सेनापती आणि वेद विदुषी स्त्रीला उत्तम कर्म करण्यासाठी प्रेरित करीत रहावे) ॥27॥
Essence
भावार्थ - या मंत्राद्वारे ईश्वर सर्वांना सांगत आहे की राजाने स्वत: धर्माला आणि विद्वान व्हावे सर्व न्यायकारी मनुष्यांनी विद्या आणि धर्माची वृद्धी करण्यासाठी सतत प्रेरित करीत रहावे, कारण यामुळेच राज्यात विद्या-धर्माची वृद्धी होईल आणि अधर्माची हानी होईल. ॥27॥
Subject
राजाने कोणाकोणाला कोणकोणते कार्य करण्यासाठी प्रेरणा द्यावी, पुढील मंत्रात या विषयी उपदेश केला आहे -