Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 9 / Mantra 26

40 Mantra
9/26
Devata- सोमाग्न्यादित्यविष्णुसूर्य्यबृहस्पतयो देवताः Rishi- तापस ऋषिः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
सोम॒ꣳ राजा॑न॒मव॑से॒ऽग्निम॒न्वार॑भामहे। आ॒दि॒त्यान् विष्णु॒ꣳ सूर्य्यं॑ ब्र॒ह्माणं॑ च॒ बृह॒स्पति॒ꣳ स्वाहा॑॥२६॥

सोम॑म्। राजा॑नम्। अव॑से। अ॒ग्निम्। अ॒न्वार॑भामह॒ इत्य॑नु॒ऽआर॑भामहे। आ॒दि॒त्यान्। विष्णु॑म्। सूर्य॑म्। ब्र॒ह्मा॑णम्। च॒। बृह॒स्पति॑म्। स्वाहा॑ ॥२६॥

Mantra without Swara
सोमँ राजानमवसेग्निमन्वारभामहे । आदित्यान्विष्णुँ सूर्यम्ब्रह्माणञ्च बृहस्पतिँ स्वाहा ॥

सोमम्। राजानम्। अवसे। अग्निम्। अन्वारभामह इत्यनुऽआरभामहे। आदित्यान्। विष्णुम्। सूर्यम्। ब्रह्माणम्। च। बृहस्पतिम्। स्वाहा॥२६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (विद्वज्जन म्हणत आहेत) हे मनुष्यांने (सामान्य नागरिकजनहो) ज्याप्रमाणे आम्ही (विद्वज्जन) (स्वाहा) सत्य वाणीचा अवलंब करीत (अवसे) आपल्या रक्षणासाठी (विष्णुम्) त्या सर्वव्यापी ईश्वराचा (स्वीकार करीत आहोत) आणि (सूर्य्यम्) विद्वानांमधे सूर्याप्रमाणे जो तेजस्वी विद्वान आहे, जो (ब्रह्माणम्) चार वेदांचे सांगोपांग अध्ययन करणारा, (बृहस्पतिम्) श्रेष्ठजनांना रक्षक (अग्निम्) अग्नीप्रमाणे शत्रूंना भस्म करणारा आणि (सोहम्) चंद्राप्रमाणे शांतगुणसंपन्न आहे, अशा (राजानम्) धर्मानुचारी प्रशंसनीय राजाला स्वीकार करीत आहोत, तसेच (आदित्यान्) विद्यार्जनासाठी अठ्ठेचाळीस वर्षापर्यंत ब्रह्मचर्य धारण करून, पूर्ण विद्या अवगत करून आम्ही ज्याप्रमाणे सूर्याप्रमाणे प्रकाशमान आणि विद्वानांच्या संगतीमुळे विद्यावान होऊन गृहाश्रमाचा (आरभामहे) स्वीकार करीत आहोत वा केलेला आहे, त्याप्रमाणे तुम्ही देखील करा. (आमचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्याप्रमाणे आचरण करा) ॥26॥
Essence
भावार्थ - ईश्वराची अशी आज्ञा आहे की सर्व मनुष्यांनी आपल्या सुरक्षेकरिता अशा मनुष्यास राजा म्हणून स्वीकारावे की ज्याने ब्रह्मचर्यव्रत धारण करणार्‍या विद्यापारंगत विद्वानांमध्ये राहून अठ्ठेचाळीस वर्ष ब्रह्मचर्यव्रत धारण केले असेल. अशा राजाच्या अधीन राहून सर्व जणांनी सत्यनीतीचा अवलंब व वृद्धी करावी. ॥26॥
Subject
पुनश्च, प्रजेने कशाप्रकारच्या राजास स्वीकार करावे (राजा कोणत्या गुण, पात्रता आदींनी संपन्न असावा) याविषयी पुढील मंत्रात उपदेश केला आहे -