Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 9 / Mantra 23

40 Mantra
9/23
Devata- प्रजापतिर्देवता Rishi- वसिष्ठ ऋषिः Chhand- स्वराट त्रिष्टुप्, Swara- धैवतः
Mantra with Swara
वाज॑स्ये॒मं प्र॑स॒वः सु॑षु॒वेऽग्रे॒ सोम॒ꣳ राजा॑न॒मोष॑धीष्व॒प्सु। ताऽअ॒स्मभ्यं॒ मधु॑मतीर्भवन्तु व॒यꣳ रा॒ष्ट्रे जा॑गृयाम पु॒रोहि॑ताः॒ स्वाहा॑॥२३॥

वाज॑स्यः। इ॒मम्। प्र॒स॒व इति॑ प्रऽस॒वः। सु॒षु॒वे। सु॒सु॒व॒ इति सुसुवे। अग्रे॑। सोम॑म्। राजा॑नम्। ओष॑धीषु। अ॒प्स्वित्य॒प्ऽसु। ताः। अ॒स्मभ्य॑म्। मधु॑मती॒रिति॒ मधु॑ऽमतीः। भ॒व॒न्तु॒। व॒यम्। रा॒ष्ट्रे। जा॒गृ॒या॒म॒। पु॒रोहि॑ता॒ इति॑ पु॒रःऽहि॑ताः। स्वाहा॑ ॥२३॥

Mantra without Swara
वाजस्येमम्प्रसवः सुषुवे ग्रे सोमँ राजानमोषधीष्वप्सु । ताऽअस्मभ्यं मधुमतीर्भवन्तु वयँ राष्टे जागृयाम पुरोहिताः स्वाहा ॥

वाजस्यः। इमम्। प्रसव इति प्रऽसवः। सुषुवे। सुसुव इति सुसुवे। अग्रे। सोमम्। राजानम्। ओषधीषु। अप्स्वित्यप्ऽसु। ताः। अस्मभ्यम्। मधुमतीरिति मधुऽमतीः। भवन्तु। वयम्। राष्ट्रे। जागृयाम। पुरोहिता इति पुरःऽहिताः। स्वाहा॥२३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (राजवैद्याचे वचन प्रजाजनांप्रति) हे मनुष्यांनो, (राष्ट्राचे नागरिकहो), मी (एक राजवैद्य) (अग्रे) सर्वप्रथम (प्रसव:) ऐश्वर्यसंपन्न होऊन (वाजस्य) वैद्यकशास्त्रासंबंधी ज्ञानाचा लाभ (इमम्) या (सोमम्) चंद्राप्रमाणे दु:खनाशक (राजानम्) विद्या, न्याय, विनय आदी गुणांनी संपन्न अशा या राजाला (सुसुवे) ऐश्वर्ययुक्त करतो आणि त्यांच्या सुरक्षेकरिता, (उत्तम आरोग्याकरिता) (औषधी षु) पृथ्वीवर उत्पन्न होणार्‍या यव आदी औषधींद्वारे आणि (अप्सु) जलात विद्यमान औषधींद्वारे आणि (अप्सु) जलात विद्यमान औषधींद्वारे (राजाला नीरोग ठेवतो) त्याप्रमाणे (ता:) त्या औषधी (अस्मभ्यम्) आमच्याकरिता, (सर्व नागरिकांकरिता) (मधुमती:) प्रभावशाली मधुर वुणवती (भवन्तु) व्हाव्यात. अशा प्रकारे नीरोग व शक्तिसंपन्न होऊन आम्ही (स्वाहा) सत्य व प्रामाणिकपणे आचरण करीत (पुरोहिता:) सर्वांचे हितकारी होऊन (राष्ट्रे) आमच्या राज्यात निरंतर (जागृयाम) आलस्य त्यागून सदैव सावध राहून जागत आहोत, तसेच तुम्ही इतर सर्व नागरिकांनी देखील राष्ट्ररक्षेत सदैव जागृत रहावे, (आमच्याप्रमाणे सदैव सावध असावे) ॥23॥
Essence
भावार्थ - सभ्य, विवेकी मनुष्यांसाठी उचित आहे की त्यांनी सर्व विद्याविशारद, नीरोग आणि सद्गुणांनी शोभायमान अशा मनुष्याला राज्याधिकार द्यावा. त्या राजाच्या प्रकृतीची काळजी घेणार्‍या वैद्याने असे यत्न करावेत की ज्यायोगे राजाची शरीर, बुद्धी आणि आत्म्यात रोग वा औदासीन्य येऊ नये. याचप्रकारे राजा आणि वैद्य यांनी सर्व मंत्री, सेवक आणि प्रजाजन, यांना रोगरहित करावे की ज्यामुळे हे सर्व जण राज्यातील सज्जनांच्या पालन कार्यात आणि दुर्जनांना दंडित करण्यात सतत प्रयत्नशील राहतील. राजा, आणि प्रजाजन यांचे नाते पिता-पुत्रांप्रमाणे असावे (राजाने प्रजेस पुत्रा प्रमाणे व प्रजेने राजाला पित्याप्रमाणे मानावे) ॥23॥
Subject
पुनश्च, मनुष्यांनी कसे असावे, कसे वागावे, याविषयी पुढील मंत्रात उपदेश केला आहे -