Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 9 / Mantra 18

40 Mantra
9/18
Devata- बृहस्पतिर्देवता Rishi- वसिष्ठ ऋषिः Chhand- निचृत् त्रिष्टुप्, Swara- निषादः
Mantra with Swara
वाजे॑वाजेऽवत वाजिनो नो॒ धने॑षु विप्राऽअमृताऽऋतज्ञाः। अ॒स्य मध्वः॑ पिबत मा॒दय॑ध्वं तृ॒प्ता या॑त प॒थिभि॑र्देव॒यानैः॑॥१८॥

वाजे॑वाज॒ इति॒ वाजे॑ऽवाजे। अ॒व॒त॒। वा॒जि॒नः। नः॒। धने॑षु। वि॒प्राः॒। अ॒मृ॒ताः॒। ऋ॒त॒ज्ञा॒ इत्यृ॑तऽज्ञाः। अ॒स्य। मध्वः॑। पि॒ब॒त॒। मा॒दय॑ध्वम्। तृ॒प्ताः। या॒त॒। प॒थिभि॒रिति॑ प॒थिऽभिः॑। दे॒व॒यानै॒रिति॑ देव॒यानैः॑ ॥१८॥

Mantra without Swara
वाजेवाजे वत वाजिनो नो धनेषु विप्रा अमृता ऋतज्ञाः । अस्य मध्वः पिबत मादयध्वन्तृप्ता यात पथिभिर्देवयानैः ॥

वाजेवाज इति वाजेऽवाजे। अवत। वाजिनः। नः। धनेषु। विप्राः। अमृताः। ऋतज्ञा इत्यृतऽज्ञाः। अस्य। मध्वः। पिबत। मादयध्वम्। तृप्ताः। यात। पथिभिरिति पथिऽभिः। देवयानैरिति देवयानैः॥१८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (प्रजाजनांची उक्ती)- हे (ऋतज्ञा:) सत्यविद्येचा ज्ञाता (अमृता:) स्वरूपाने (आत्मारूपाने) अमर असलेले वा जीवंतपणी मोक्षमुख अनुभवणारे (वाजिन:) वेगवान, गतीशील, (विप्रा:) विद्या, उत्तम ज्ञान यांनी विद्यावान झालेले हे राजपुरुष हो, तुम्ही (वाजेवाजे) युद्ध, संघर्ष आदीप्रसंगी (न:) आमचे (अवत) रक्षण करा. (तुमच्या स्वागत वा सत्कारासाठी आम्ही देत आहोत (अस्थ) तो (मध्व:) मधुर रस (पिवत) प्या. तसेच आम्ही सादर केलेल्या धनाने (तृप्ता:) तृप्त होऊन (माद्यध्वम्) आनंदित व्हा आणि (देवयानै:) ज्या मार्गांवर (आजपर्यंत विद्वज्जन चालत आहेत, त्या (पथिभि:) मार्गांनी नेहमी (यात) जा (त्यांचे अनुकरण करा.) ॥18॥
Essence
भावार्थ - राजपुरुषांसाठी उचित आहे की त्यांनी वेदादी शास्त्र वाचावेत आणि त्यातील श्रेष्ठ ज्ञानाने प्रकाशित होऊन सदा धर्मात्मा विद्वानांच्या मार्गाने (वा त्यांनी दाखविलेल्या मार्गाने) चालावे, अन्य मार्गाने चालू नये. तसेच शरीर आणि आत्म्याची शक्ती वाढविण्याकरिता वैद्यशास्त्रात सांगितल्याप्रमाणे पवन व शुद्ध अन्न, रस आदींचे सेवन करीत प्रजेने रक्षण करावे आणि त्याच कार्यात आनंद मानावा. तसेच प्रजाजनांचेही कर्तव्य आहे की त्यांनी राजपुरुषांचा नेहमी प्रसन्न ठेवावे (दोघांत प्रमळ नाते असावे) ॥18॥
Subject
आता राजा आणि राजपुरुषांनी परस्परात कसे आचरण ठेवावे, पुढील मंत्रात हा विषय प्रतिपादि आहे -