Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 9 / Mantra 17

40 Mantra
9/17
Devata- बृहस्पतिर्देवता Rishi- नाभानेदिष्ठ ऋषिः Chhand- जगती, Swara- निषादः
Mantra with Swara
ते नो॒ऽअर्व॑न्तो हवन॒श्रुतो॒ हवं॒ विश्वे॑ शृण्वन्तु वा॒जिनो॑ मि॒तद्र॑वः। स॒ह॒स्र॒सा मे॒धसा॑ता सनि॒ष्यवो॑ म॒हो ये धन॑ꣳ समि॒थेषु॑ जभ्रि॒रे॥१७॥

ते। नः॒। अर्व॑न्तः। ह॒व॒न॒श्रुत॒ इति॑ हवन॒ऽश्रुतः॑। हव॑म्। विश्वे॑ शृ॒ण्व॒न्तु॒। वा॒जि॑नः। मितद्र॑व॒ इति॑ मि॒तऽद्र॑वः। स॒ह॒स्र॒सा इति॑ स॒हस्र॒ऽसाः। मे॒धसा॒तेति॑ मे॒धऽसा॑ता। स॒नि॒ष्यवः॑। स॒हः। ये। धन॑म्। स॒मि॒थेष्विति॑ सम्ऽइ॒थेषु॒। ज॒भ्रि॒रे ॥१७॥

Mantra without Swara
ते नोऽअर्वन्तो हवनश्रुतो हवँविश्वे शृण्वन्तु वाजिनो मितद्रवः । सहस्रसा मेधसाता सनिष्यवो महो ये धनँ समिथेषु जभ्रिरे ॥

ते। नः। अर्वन्तः। हवनश्रुत इति हवनऽश्रुतः। हवम्। विश्वे शृण्वन्तु। वाजिनः। मितद्रव इति मितऽद्रवः। सहस्रसा इति सहस्रऽसाः। मेधसातेति मेधऽसाता। सनिष्यवः। सहः। ये। धनम्। समिथेष्विति सम्ऽइथेषु। जभ्रिरे॥१७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (प्रजाजनांची उक्ती) (ये) जे (अर्वन्त:) ज्ञानवान (हवनश्रुत:) वाचनीय, ग्रहणीय शास्त्र (श्रद्धेने) ऐकणारे (वाजित:) प्रशंसित बुद्धिमान आणि (मितद्रव:) शास्त्रोक्त विषयांप्रमाणे वागणारे राजपुरुष आहेत, याशिवाय तेच राजकर्मचारी (सहस्रसा:) असंख्य विद्यांचे ज्ञाता आहेत आणि (सनिष्यव:) आत्म्याच्या (आपल्या अंत:करणाच्या) निर्देशाप्रमाणे वागणारे आहेत. असे श्रेष्ठ गुणवान राजपुरुष (मेधसाता) समागमाच्या दानाने (तत्त्वनिर्णयासाठी सभा, विद्वत्समागम, गोष्टी आदीप्रसंगी प्रजेकडून घेतलेल्या कर रुप दानाने तसेच (समियेषु) युद्धामधे (न:) आमच्याकडून (युद्ध प्रसंगी प्रजेकडून घेतलेल्या कराच्या धनाने (धनम्) जे ऐश्वर्य वा धन (जभिरे) धारण करतात, (जो कर घेतात, ती सर्व धनराशी) त्या (विश्वे) सर्व विद्वान राजपुरुषांनी (आमच्या सुरक्षिततेसाठी वापरावी) आणि (हवम्) अध्ययन अध्यापनप्रसंगी होणार्‍या चर्चा, गोष्टीतून निष्पन्न ज्ञान ऐकावे तसेच (शंका, संदेह, मतभेद) आदी वाद उद्भवल्यास वादी व प्रतिवादीचे म्हणणे (श्रृण्वन्तु) ऐकावे (आणि उचित निर्णय द्यावा) (राजपुरुषांनी प्रजेचे रक्षण करण्याव्यतिरिक्त प्रजाजनांत निर्माण होणारे तंटे, वाद, आदी सामोपचाराने मिटवावेत) ॥17॥
Essence
भावार्थ - (प्रजाजन म्हणतात) राजपुरुष (शासकीय अधिकारी) आमच्याकडून हा जो कर घेतात, त्या धनाने त्यांनी आमच्या सुरक्षिततेची व्यवस्था करावी, अन्यथा आमच्याकडून कर घेऊ नये आणि त्या धनाचा योग्य उपयोग होत नसल्यास) आम्ही प्रजाजनांनी देखील कर देऊ नये. यावरून हे स्पष्ट होते की जनतेने शासनास कर द्यावा, तो प्रजेचे रक्षणाकरिता आणि दुष्ट, शत्रू आदीपासून युद्ध करण्यासाठीच द्यावा, अन्य कोणत्याही कारणासाठी प्रजेने राजपुरूषांना वा राज्यास कर देऊ नये, हे अगदी निश्चित समजावे ॥17॥
Subject
प्रजेने आपल्या सुरक्षिततेसाठी राज्यास कर द्यावा आणि राजपुरुषांनी याच उद्देश्याने हा कर घ्यावा, अन्य कोणत्याही हेतूने नको. पुढील मंत्रात याविषयी कथन केले आहे -