Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 9 / Mantra 16

40 Mantra
9/16
Devata- बृहस्पतिर्देवता Rishi- वसिष्ठ ऋषिः Chhand- भूरिक पङ्क्ति, Swara- पञ्चमः
Mantra with Swara
शन्नो॑ भवन्तु वा॒जिनो॒ हवे॑षु दे॒वता॑ता मि॒तद्र॑वः स्व॒र्काः। ज॒म्भय॒न्तोऽहिं॒ वृक॒ꣳ रक्षा॑सि॒ सने॑म्य॒स्मद्यु॑यव॒न्नमी॑वाः॥१६॥

शम्। नः॒। भ॒व॒न्तु॒। वा॒जिनः॑। हवे॑षु। दे॒वता॒तेति॑ दे॒वऽताता॑। मि॒तद्र॑व॒ इति॑ मि॒तऽद्र॑वः। स्व॒र्का इति॑ सुऽअ॒र्काः। ज॒म्भय॑न्तः। अहि॑म्। वृक॑म्। रक्षा॑सि। सने॑मि। अ॒स्मत्। यु॒य॒व॒न्। अमी॑वाः ॥१६॥

Mantra without Swara
शन्नो भवन्तु वाजिनो हवेषु देवताता मितद्रवः स्वर्काः । जम्भयन्तो हिँ वृकँ रक्षाँसि सनेम्यस्मद्युयवन्नमीवाः ॥

शम्। नः। भवन्तु। वाजिनः। हवेषु। देवतातेति देवऽताता। मितद्रव इति मितऽद्रवः। स्वर्का इति सुऽअर्काः। जम्भयन्तः। अहिम्। वृकम्। रक्षासि। सनेमि। अस्मत्। युयवन्। अमीवाः॥१६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (विद्वज्जन आणि प्रजाजनांची वीर सैनिकांप्रति प्रार्थना) (मितद्रव:) नियमबद्धरीतीने संचलन करणारे (स्वर्का:) पौष्टिक स्वादिष्ट अन्न खाणारे आणि सत्कार करण्यास पात्र असे जे वीर योद्धा आहेत, ते (अहिम्) ढगाप्रमाणे कर्म करीत व पुढे पुढे जात (गडगडाटाप्रमाणे वीर घोषणा करीत व पुढे जात) (वृकम्) उद्दण्ड चोरांचे आणि (रक्षांसि) क्लेशकारक लुटारू-दरोडेखोरांचे (जम्भयन्ट:) हात-पाय तोडतात. तसेच ते (वाजिन:) युद्धकलाप्रवीण वीर सैनिक (व:) आम्हा (देवताता) विद्वज्जनांच्या सत्कर्मासाठी प्राप्त व्हावेत. (अशी आम्ही कामना करतो) आणि (हवेषु) संग्रामामध्ये (सनेमि) सनातन (राम्) सुखाच्या प्राप्तीसाठी (आम्हांस नित्य सुखी ठेवण्यासाठी आम्हांस) प्राप्त व्हावेत. (अस्मत्) त्या वीर सैनिकांनी (अस्मत्) आम्हा प्रजाजनांपासून (अमीवा) रोगाप्रमाणे दुखदायक शत्रूंना (युयवन्) दूर ठेवावे (आम्हास निर्भय करावे ॥16॥
Essence
भावार्थ - श्रेष्ठ प्रजाजनांच्या पालन-रक्षणकार्यात तत्पर असलेल्या आणि रोगांचा नाश करतात, त्याप्रमाणे शत्रूंचा विनाश करणारे जे राजपुरुष असतात, तेच सर्वांना आनंदी व समाधान देऊ शकतात, अन्य जन नाही. ॥16॥
Subject
प्रजापालन आणि शत्रुविनाश या कामात कोण कोण लोक यशस्वी होतात, पुढील मंत्रात याविषयी कथन केले आहे -