Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 9 / Mantra 14

40 Mantra
9/14
Devata- बृहस्पतिर्देवता Rishi- दधिक्रावा ऋषिः Chhand- जगती, Swara- निषादः
Mantra with Swara
ए॒ष स्य वा॒ज क्षि॑प॒णिं तु॑रण्यति ग्री॒वायां॑ ब॒द्धोऽअ॑पिक॒क्षऽआ॒सनि॑। क्रतुं॑ दधि॒क्राऽअनु॑ स॒ꣳसनि॑ष्यदत् प॒थामङ्का॒स्यन्वा॒पनी॑फण॒त् स्वाहा॑॥१४॥

ए॒षः। स्यः। वा॒जी। क्षि॒प॒णिम्। तु॒र॒ण्य॒ति॒। ग्री॒वाया॑म्। ब॒द्धः। अ॒पि॒क॒क्ष इत्य॑पिऽक॒क्षे। आ॒सनि॑। क्रतु॑म्। द॒धि॒क्रा इति॑ दधि॒ऽक्राः। अनु॑। स॒ꣳसनि॑ष्यदत्। स॒ꣳसनि॑स्यद॒दिति॑ स॒म्ऽसनि॑स्यदत्। प॒थाम्। अङ्का॑सि। अनु॑। आ॒पनी॑फण॒दित्या॒ऽपनी॑फणत्। स्वाहा॑ ॥१४॥

Mantra without Swara
एष स्य वाजी क्षिपणिन्तुरण्यति ग्रीवायाम्बद्धो अपिकक्षऽआसनि । क्रतुन्दधिक्राऽअनु सँसनिष्यदत्पथामङ्गाँस्यन्वापनीपणत्स्वाहा ॥

एषः। स्यः। वाजी। क्षिपणिम्। तुरण्यति। ग्रीवायाम्। बद्धः। अपिकक्ष इत्यपिऽकक्षे। आसनि। क्रतुम्। दधिक्रा इति दधिऽक्राः। अनु। सꣳसनिष्यदत्। सꣳसनिस्यददिति सम्ऽसनिस्यदत। पथाम्। अङ्कासि। अनु। आपनीफणदित्याऽपनीफणत्। स्वाहा॥१४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - ज्याप्रमाणे (स्य:) तो (एष:) आणि पाहा (वाजी) वेगवान घोडा (आसनि) मुखावर आणि (ग्रीवायाम्) मानेवर (बद्ध:) (लगाम, पट्टे, खोगीर आदी साधनांनी) बद्ध आहे आणि (क्रतुम्) आपल्या गतीरुप कार्याला (संसनिष्यदत्) पूर्ण करतो, (पथाम्) मार्गातील (अंकांसि) खुणांच्या (अनु) मागे वा चिन्हानुसार (अपनीफणत्) चांगल्याप्रकारे चालतो, असा (दधिक्रा:) पाठीवर स्वार असलेल्या अश्वारोही सैनिकाला नेणारा हा घोडा (क्षिपणिम्) सेनेत किंवा सेनेसह जातो, त्याप्रमाणे (अपिकक्षे) (सेनापतीदेखील) आपल्या सैन्यातील विविध विभागांना (स्वाहा) आपल्या योग्य त्या वाणीने (आदेशाने) (तुरण्यति) वेगवान करतो (त्वरित गती करून शत्रूला चारी बाजूंनी घेरतो) ॥14॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. सेनापतीच्या कुशल नेतृत्वाखाली त्याच्या आदेशाप्रमाणे वागणारे सुरक्षाप्राप्त अश्वारोही सैनिक जेव्हा वेगवान घोड्यावर बसून शत्रूवर झपाट्याने आक्रमण करतात, तेव्हांच ते शत्रूला ठार करू शकतात. तसेच जो सेनापती उत्तम कर्म करणार्‍या सुप्रशिक्षित वीर सैनिकांना सोबत घेऊन शत्रूशी युद्ध करतो, तो प्रशंसित होऊन विजयी होतो. या विरूद्ध केल्यास त्याचा पराजय होतो ॥14॥
Subject
जेव्हा सैनिक आणि सेनापती चांगल्याप्रकारे प्रशिक्षित असून एकमेकांविषयी प्रीती असणारे असतात, तेव्हांच विजयी होतात, पुढील मंत्रात हा विषय प्रतिपादित आहे -