Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 9 / Mantra 13

40 Mantra
9/13
Devata- सविता देवता Rishi- बृहस्पतिर्ऋषिः Chhand- निचृत् अति जगती, Swara- निषादः
Mantra with Swara
दे॒वस्या॒हꣳ स॑वि॒तुः स॒वे स॒त्यप्र॑सवसो॒ बृह॒स्पते॑र्वाज॒जितो॒ वाजं॑ जेषम्। वाजि॑नो वाज॒जि॒तोऽध्व॑न स्कभ्नु॒वन्तो॒ योज॑ना॒ मिमा॑नाः॒ काष्ठां॑ गच्छत॥१३॥

दे॒वस्य॑। अ॒हम्। स॒वि॒तुः। स॒वे। स॒त्यप्र॑सव॒ इति॑ स॒त्यऽप्र॑सवः। बृह॒स्पतेः॑। वा॒ज॒जित॒ इति॑ वाज॒ऽजितः॑। वाज॑म्। जे॒ष॒म्। वाजि॑नः। वा॒ज॒जित॒ इति॑ वाज॒ऽजितः॑। अध्व॑नः। स्क॒भ्नु॒वन्तः॑। योज॑नाः। मिमा॑नाः। काष्ठा॑म्। ग॒च्छ॒त॒ ॥१३॥

Mantra without Swara
देवस्याहँ सवितुः सवे सत्यप्रसवसो बृहस्पतेर्वाजजितो वाजञ्जेषम् । वाजिनो वाजजितो ध्वन स्कभ्नुवन्तो योजना मिमानाः काष्ठाङ्गच्छत ॥

देवस्य। अहम्। सवितुः। सवे। सत्यप्रसव इति सत्यऽप्रसवः। बृहस्पतेः। वाजजित इति वाजऽजितः। वाजम्। जेषम्। वाजिनः। वाजजित इति वाजऽजितः। अध्वनः। स्कभ्नुवन्तः। योजनाः। मिमानाः। काष्ठाम्। गच्छत॥१३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (सेनापती आपल्या वीर सैनिकांस म्हणत आहे) हे वीरजन हो, ज्याप्रमाणे (अहम्) शारीरिक आणि आत्मिक सामर्थ्याने परिपूर्ण मी तुमचा सेनापती (सत्यप्रसवस:) परमेश्वराने निर्मित ज्या जगात पदार्थ कारणरुपाने नित्य व सत्य आहेत, त्या (सनितु:) सर्व ऐश्वर्य प्रथाना (देवस्य) सर्वांचा प्रकाशक (वाजजित:) ज्ञानामुळे सर्वोत्कृष्ट आणि (बृहस्थते:) उत्तम वेदवाणीच्या पालक परमेश्वराद्वारे (सवे) निर्मित या जगातील ऐश्वर्य प्राप्तीत आणि (वाजम्) युद्धात (जेषम्) मी यश मिळवितो, माझ्याप्रमाणे तुम्हीही विजय मिळवा. विजयी व यशस्वी व्हा. तसेच तुम्ही, माझे वीर सैनिक, ज्याप्रमाणे (वाजिन:) विज्ञान रुप वेगाने (विज्ञानाद्वारे प्राप्त वेगवान वाहनांनी) (वाजजित) युद्ध जिंकणारे आहात आणि (योजना) कित्येक कोस (मैल) दूर असलेल्या शत्रूला (भिमाना:) पाहता (त्याच्या हालचालींवर नजर ठेवता), (अध्वन:) त्यांचे सर्व मार्ग रोखून धरता आणि (काष्ठाम्) वेगाने योग्य त्या दिशांना (गच्छात) पुढे जाता (आक्रमण करता) त्याप्रमाणे आम्ही सर्वांनी (सेनाधिकार्‍यांनी) देखील पुढे पुढे जावे ॥13॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. योद्धा सैनिक सेनाध्यक्षाच्या साहाय्याने आणि सुरक्षेद्वारे (त्यांने दिलेल्या आदेशांचे पालन केल्यानेच) शत्रूंना जिंकू शकतात आणि शत्रूचे आक्रमण-मार्ग अवरुद्ध करू शकतात. सेनाध्यक्ष आणि इतर राजपुरुषांचे कर्तव्य आहे की शत्रुगण ज्या दिशेने येतात किंवा ज्या प्रदेशात उपद्रव देतात, तेथे जाऊन शत्रूंना वशीभूत करावे ॥13॥
Subject
राजपुरुषांनी धर्मात्मा राजपुरुषांचे (अधिकार्‍यांनी नीतिमान सदाचारी अधिकार्‍यांचे) अनुकरण करावे, अन्य क्षुद्र वा तुच्छवृत्तीच्या लोकांचे कदापि नको, पुढील मंत्रात याविषयी कथन केले आहे -