Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 9 / Mantra 11

40 Mantra
9/11
Devata- इन्द्राबृहस्पती देवते Rishi- बृहस्पतिर्ऋषिः Chhand- जगती, Swara- निषादः
Mantra with Swara
बृह॑स्पते॒ वाजं॑ जय॒ बृह॒स्पत॑ये॒ वाचं॑ वदत॒ बृह॒स्पतिं॒ वाजं॑ जापयत। इन्द्र॒ वाजं॑ ज॒येन्द्रा॑य॒ वाचं॑ वद॒तेन्द्रं॒ वाजं॑ जापयत॥११॥

बृह॑स्पते। वाज॑म्। ज॒य॒। बृह॒स्पत॑ये। वाच॑म्। व॒द॒त॒। बृह॒स्पति॑म्। वाज॑म्। जा॒प॒य॒त॒। इन्द्र॑। वाज॑म्। ज॒य॒। इन्द्रा॑य। वाच॑म्। व॒द॒त॒। इन्द्र॑म्। वाज॑म्। जा॒प॒य॒त॒ ॥११॥

Mantra without Swara
बृहस्पते वाजं जय बृहस्पतये वाचं वदत बृहस्पतिं वाजं जापयत । इन्द्र वाजं जयेन्द्राय वाचं वदतेन्द्रं वाजं जापयत ॥

बृहस्पते। वाजम्। जय। बृहस्पतये। वाचम्। वदत। बृहस्पतिम्। वाजम्। जापयत। इन्द्र। वाजम्। जय। इन्द्राय। वाचम्। वदत। इन्द्रम्। वाजम्। जापयत॥११॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (बृहस्पते) समस्त विद्यांचा प्रसार करणार्‍या आणि त्या विद्यांचा उपदेश देणार्‍या हे राजपुरुष, तुम्ही हा (वाजम्) संग्राम (जय) जिंका अथवा ज्ञान मिळवा. हे विद्वज्जनहो, तुम्ही (बृहस्पतये) या राजपुरुषाला (विचम्) वेदोवत विद्येप्रमाणे प्रशंसिय वापी (वदत) बोला व बोलण्यास शिकवा. वेदवाणीचा यास उपदेश करा. तसेच (बृहस्पतिम्) या राजाला/सर्वोत्तम अध्यापकाला (वानम्) युद्धकला/विद्याज्ञान/शिकवून त्यांना (जापयत) वृद्धींगत करा (अधिक उन्नत व निष्णांत करा) (इन्द्र) विद्यारुप ऐश्वर्याचा प्रकाश देणार्‍या अथवा शत्रूंना विवर्ण करणारे हे राजपुरुष, तुम्ही (वाजम्) ऐश्वर्यप्राप्ती अथवा विजयरुप युद्धात (जय) यशस्वी व्हा. युद्ध कलेत प्रवीण असे हे विद्वज्जनहो, तुम्ही या (इन्द्राय) ऐश्वर्यप्राप्तीसाठी प्रयत्न करणार्‍या या राजपुरुषाला (वाचम्) राजधर्म सांगणारी शिकविणारी वाणी (वदत) शिकवा (या राजपुरुषास युद्ध आणि राज्यशासन कार्यात निपुण होण्यास मार्गदर्शन करा) या (इन्द्रम) राजपुरुषाला (वाजम्) युद्धात (जयत) विजयी करा. (राजपुरुष, शासकीय अधिकारी, सेनापती, विद्वान, अध्यापक, या सर्वांनी राष्ट्रोन्नतीसाठी आपले ज्ञान वा नैपुण्य इतरांना सांगावे/शिकवावे) ॥11॥
Essence
भावार्थ - या मंत्रात श्लेष (शब्दश्लेष) अलंकार आहे. राजाने असे यत्न करावेत मी ज्यायोगे वेदविद्याचा प्रसार होईल, शत्रूंवर सहजणे विजय मिळविता येईल. व त्याचप्रमाणे उपदेशक (अध्यापक) आणि सैनिकांनी असे प्रयत्न करावेत की ज्यामुळे राज्यात वेदाशास्त्राच्या अध्ययन-अध्यापनाची प्रवृत्ती वाढेल आणि आपला राजा विजयरुप आभूषणांनी अलंकृत होईल अशा प्रयत्नांमुळे अधर्माचा नाश आणि धर्माची वृद्धी होऊन धर्म स्वामी होऊ शकेल ॥11॥
Subject
पुढील मंत्रात उपदेश देणार्‍या आणि तो उपदेश घेणार्‍याव्यक्तींविषयी कथन केले आहे -