Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 9 / Mantra 10

40 Mantra
9/10
Devata- इन्द्राबृहस्पती देवते Rishi- बृहस्पतिर्ऋषिः Chhand- विराट् उत्कृति, Swara- षड्जः
Mantra with Swara
दे॒वस्या॒हꣳ स॑वि॒तुः स॒वे स॒त्यस॑वसो॒ बृहस्पते॑रुत्त॒मं नाक॑ꣳ रुहेयम्। दे॒वस्या॒हꣳ स॑वि॒तुः स॒वे स॒त्यस॑वस॒ऽइन्द्र॑स्योत्त॒मं ना॑कꣳरुहेयम्। दे॒वस्या॒हꣳ स॑वि॒तुः स॒वे स॒त्यप्र॑सवसो॒ बृह॒स्पते॑रुत्त॒मं नाक॑मरुहम्। दे॒वस्या॒हꣳ स॑वि॒तुः स॒वे स॒त्यप्र॑सवस॒ऽइन्द्र॑स्योत्त॒मं नाक॑मरुहम्॥१०॥

दे॒वस्य॑। अ॒हम्। स॒वि॒तुः। स॒वे। स॒त्यस॑वस॒ इति॑ स॒त्यऽस॑वसः। बृह॒स्पतेः॑। उ॒त्त॒ममित्यु॑त्ऽत॒मम्। नाक॑म्। रु॒हे॒य॒म्। दे॒वस्य॑। अ॒हम्। स॒वि॒तुः। स॒वे। स॒त्यस॑वस॒ इति॑ स॒त्यऽसव॑सः। इन्द्र॑स्य। उ॒त्त॒ममित्यु॑त्ऽत॒मम्। नाक॑म्। रु॒हे॒य॒म्। दे॒वस्य॑। अ॒हम्। स॒वि॒तुः। स॒वे। स॒त्यप्र॑सवस॒ इति॑ स॒त्यऽप्र॑सवसः। बृह॒स्पतेः॑। उ॒त्त॒ममित्यु॑त्ऽत॒मम्। नाक॑म्। अ॒रु॒ह॒म्। दे॒वस्य॑। अ॒हम्। स॒वि॒तुः। स॒वे। स॒त्यप्र॑सवस॒ इति॑ स॒त्यऽप्र॑सवसः। इन्द्र॑स्य। उ॒त्त॒ममित्यु॑त्ऽत॒मम्। नाक॑म्। अ॒रु॒ह॒म् ॥१०॥

Mantra without Swara
देवस्याहँ सवितुः सवे सत्यसवसो बृहस्पतेरुत्तमन्नाकँ रुहेयम् । देवस्याहँ सवितुः सवे सत्यसवस इन्द्रस्योत्तमन्नाकँ रुहेयम् । देवस्याहँ सवितुः सवे सत्यप्रसवसो बृहस्पतेरुत्तमन्नाकमरुहम् । देवस्याहँ सवितुः सवे सत्यप्रसवस इन्द्रस्योत्तमन्नाकमरुहम् ॥

देवस्य। अहम्। सवितुः। सवे। सत्यसवस इति सत्यऽसवसः। बृहस्पतेः। उत्तममित्युत्ऽतमम्। नाकम्। रुहेयम्। देवस्य। अहम्। सवितुः। सवे। सत्यसवस इति सत्यऽसवसः। इन्द्रस्य। उत्तममित्युत्ऽतमम्। नाकम्। रुहेयम्। देवस्य। अहम्। सवितुः। सवे। सत्यप्रसवस इति सत्यऽप्रसवसः। बृहस्पतेः। उत्तममित्युत्ऽतमम्। नाकम्। अरुहम्। देवस्य। अहम्। सवितुः। सवे। सत्यप्रसवस इति सत्यऽप्रसवसः। इन्द्रस्य। उत्तममित्युत्ऽतमम्। नाकम्। अरुहम्॥१०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (या मंत्रात चार वक्ता अनुक्रमे चार व्यक्तीनां उद्देशून सांगत आहेत) (1) हे राज पुरुषहो आणि हे प्रजाजन हो, ज्याप्रमाणे (अहम्) मी-सभाध्यक्ष राजा-(सत्यसवस:) ज्या ईश्वराचे ऐश्वर्य सत्य आहे आणि जो एकमेव जगाचे कारण आहे, (देवस्य) जो प्रकाशमान (बृहस्पते:) महान् प्रकृती आदी पदार्थांचा रक्षक आहे आणि (सवितु:) जो सर्वजगदुत्पादक आहे, त्या परमेश्वराने (सवे) उत्पन्न केलेल्या जगामध्ये (उत्तमम्) सर्वोत्तम असलेल्या (नाक्म्) सर्व दु:खापासून रहित अशा सच्चिदानंद स्वरूपाला मी (रुहेयम्) आरूढ होतो (परमेश्वराचे ध्यान व उपासना करतो, त्याप्रमाणे तुम्हीही करा.) (2) हे राजाच्या सभासदजनहो, ज्याप्रमाणे (अहम्) मी - एक परोपकारी मनुष्य, (सत्यसवस:) सत्य आणि न्यायकारी (देवस्य) सर्वांना आनंद देणार्‍या आणि (सवितु:) ऐश्वर्याची वृद्धी करणार्‍या चक्रवर्ती राजाच्या (सवे) ऐश्वर्यामधे (उत्तमम्) प्रशंसनीय अशा (नाकम्) दु:खरहित भोगांना प्राप्त करून (सहेयम्) सुखांवर आरुढ होतो, (आनंदित होतो, त्याप्रमाणे तुम्ही देखील व्हा) (3) हे अध्ययन-अध्यापनात रममाण होणार्‍या विद्याप्रिय जनहो, ज्याप्रमाणे (अहम्) मी- विद्या शिकण्यास इच्छुक असणारा एक मनुष्य (सत्यप्रसव स:) अविनाशी बोध देणार्‍या (देवस्य) संपूर्ण विद्या, गुण कर्म आणि स्वभावाने संपन्न अशा (सवितु:) विद्या-ज्ञानाचे उत्पत्तिकर्ता (बृहस्पते:) उत्तम वेदवाणीचे रक्षण करणार्‍या आणि वेद, वेदांग, वेदोपांग यांचे पारदर्शी विद्वानांने (सवे) शोधलेल्या ज्ञान-विज्ञानाद्वारे (उत्तमम्) सर्वोत्तम (नाकम्) दु:खरहित आनंदाला (असहम्) आरूढ झालो आहे. (विद्वानांनी सांगितलेल्या वेदज्ञानाच्या अर्थ आणि भाष्याला समजून घेऊन आनंदित होत आहे, त्याप्रमाणे तुम्ही देखील व्हा) (4) हे विजय इच्छिणार्‍या लोकांनो, ज्याप्रमाणे (अहम्) मी एक योद्धा, (सत्यप्रवस:) सत्य, न्याय, विनय, विजय आदी गुणांनी संपन्न असणार्‍या (देवस्य) धनुर्वेदाचे जाणकार, (सवितु) युद्धात शत्रूवर विजय मिळवून देणार्‍या (इन्द्रस्य) विनाशक शत्रूंना छिन्न-विच्छिन्न करणार्‍या शूर सेनानीच्या (सवे) प्रेरणा आणि प्रोत्साहनामुळे (उत्तमम्) विजयरुप उत्तम अशा (नारुभ्) सर्वसुखकारी युद्धावर (अरुहम्) आरुढ झालो आहे (युद्धात प्रवीण आणि विजयासाठी सिद्ध झालो आहे) त्याप्रमाणे तुम्ही सर्वजण देखील तत्पर आणि सिद्ध व्हा ॥10॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. (तसेच देवस्य, बृहस्पते: सत्यप्रसवस:, सचितु: इन्द्रस्य, या पदांचे एकाहून अधिक अर्थ निघत आहेत, त्यामुळे या मंत्रात श्लेष-शब्दश्लेष, अलंकारदेखील आहे) राजा, राजपुरुष, प्रजाजन या सर्वांकरिता उचित कर्म आहे की त्यांनी आपसातील विरोध, द्वेषादींचा त्याग करून ईश्वराची उपासना करून चक्रवर्ती राज्याचा आश्रय घेऊन आणि समग्र विद्यांची प्राप्ती करून स्वत: उत्तमसुख मिळवावेत आणि इतरांना प्राप्त करून द्यावेत ॥10॥
Subject
मनुष्यांसाठी उचित आहेकी त्यांनी विद्वानांचे अनुकरण करावे, मुर्खांचे नको. पुढील मंत्रात याविषयी सांगितले आहे -