Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 8 / Mantra 9

63 Mantra
8/9
Devata- गृहपतयो विश्वेदेवा देवताः Rishi- भरद्वाज ऋषिः Chhand- प्राजापत्या गायत्री,आर्षी उष्णिक्,स्वराट आर्षी पङ्क्ति, Swara- पञ्चमः
Mantra with Swara
उ॒प॒या॒मगृ॑हीतोऽसि॒ बृह॒स्पति॑सुतस्य देव सोम त॒ऽइन्दो॑रिन्द्रि॒याव॑तः॒ पत्नी॑वतो॒ ग्रहाँ॑२ऽऋध्यासम्। अ॒हं प॒रस्ता॑द॒हम॒वस्ताद् यद॒न्तरि॑क्षं॒ तदु॑ मे पि॒ताभू॑त्। अ॒हꣳ सूर्य॑मुभ॒यतो॑ ददर्शा॒हं दे॒वानां॑ पर॒मं गुहा॒ यत्॥९॥

उ॒प॒या॒मगृ॑हीत॒ इत्यु॑पया॒मगृ॑हीतः। अ॒सि॒। बृह॒स्पति॑सुत॒स्येति॒ बृह॒स्पति॑ऽसुतस्य। दे॒व॒। सो॒म॒। ते॒। इन्दोः॑। इ॒न्द्रि॒याव॑तः। इ॒न्द्रि॒यव॑त॒ इती॑न्द्रि॒यऽव॑तः। पत्नी॑वत॒ इति॒ पत्नी॑ऽवतः। ग्रहा॑न्। ऋ॒ध्या॒स॒म्। अ॒हम्। प॒रस्ता॑त्। अ॒हम्। अ॒वस्ता॑त्। यत्। अ॒न्तरिक्ष॑म्। तत्। ऊँ॒ऽइत्यूँ॑। मे॒। पि॒ता। अ॒भू॒त्। अ॒हम्। सू॑र्य्यम्। उ॒भ॒यतः॑। द॒द॒र्श॒। अ॒हम्। दे॒वाना॑म्। प॒र॒मम्। गुहा॑। यत् ॥९॥

Mantra without Swara
उपयामगृहीतो सि बृहस्पतिसुतस्य देव सोम त इन्दोरिन्द्रियावतं पत्नीवतो ग्रहाँ ऋध्यासम् । अहम्परस्तादहमवस्ताद्यदन्तरिक्षन्तदु मे पिताभूत् । अहँ सूर्यमुभयतो ददर्शाहन्देवानां परमङ्गुहा यत् ॥

उपयामगृहीत इत्युपयामगृहीतः। असि। बृहस्पतिसुतस्येति बृहस्पतिऽसुतस्य। देव। सोम। ते। इन्दोः। इन्द्रियावतः। इन्द्रियवत इतीन्द्रियऽवतः। पत्नीवत इति पत्नीऽवतः। ग्रहान्। ऋध्यासम्। अहम्। परस्तात्। अहम्। अवस्तात्। यत्। अन्तरिक्षम्। तत्। ऊँऽइत्यूँ। मे। पिता। अभूत्। अहम्। सूर्य्यम्। उभयतः। ददर्श। अहम्। देवानाम्। परमम्। गुहा। यत्॥९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (सोम) ऐश्वर्यसंपन्न (देव) अति-मनोहर पतिदेव, मी कुमारी असतांना (उपयामगृहीत:) विवाहाच्या विधि-नियमानुसार आपणांस स्वीकार केले (असि) आहे (इन्दो:) सोमगुणसंपन्न (इन्द्रियावल:) धनसंपन्न आणि (पत्नीव्रत:) यज्ञाद्वारे प्रशंसनीय पत्नीचे ग्रहण करणारे आपण (बृहस्पतिसुतस्य) थोर वेदाविज्ञ विद्वानाचे पुत्र आहात. यज्ञाद्वारे मी अशा गुणसंपन्न (ते) आपणास, आपल्या गृहास व घरातील संबंधीजनास प्राप्त झाले आहे. (आता या गृहात) (परस्तात्) आयुष्याच्या पुढील काळात आणि (उरवस्तात्) होऊन गेलेल्या काळातील सत्कर्माने मी (ऋध्यासम्) ने प्रगती करीत राहावे, अशी कामना करीत आहे. इथे (यत्) ज्या (देवानाम्) विद्वज्जनांच्या (गुहा) बुद्धी, (मार्गदर्शन आणि सत्संग) यामध्ये राहून मी (अंतरिक्षम्) सत्य ज्ञानास (एमि) प्राप्ती करीत आहे. अशा सत्संगास आपणही प्राप्त करा. आणि ते विद्वज्जन (मे) माझे (पिता) पितासमान पालन करणारे (अभूत्) व्हावेत (अहम्) मी (उभयत:) त्यांच्या भागातील-पुढील दिलेल्या-मिळालेल्या शिक्षण-संस्कारादीद्वारे ज्या (सूर्य्यम्) चराचर-आत्मा रुप परमेश्वराला (ददर्श) पाहीन (त्यांचे ज्ञान व अनुभव प्राप्त करीन) आपणही त्याच परमेश्वराला पहा-त्याची (उपासना करा) ॥9॥
Essence
भावार्थ - स्त्रीने आणि पुरुषाने विवाह करण्यापूर्वी आपल्या अनुरुप पती व पत्नीची निवड एकमेकाची परीक्षा करून करावी म्हणजे गुण, कर्म, स्वभाव, रुप, बल, आरोग्य, पुरुषार्थ आणि विद्या या सर्वदृष्टींनी अनुकूल असल्याची खात्री करावी आणि नंतर स्वयंवर विधीने विवाह करावा. कारण की यामुळेच त्यांना धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष सिद्ध होतील. ज्या संतानाचे आई-वडील विद्वान नसतील, त्यांची संततीदेखील उत्तम होणार नाही. यासाठी सर्वांनी उत्तम शिक्षण आणि पूर्ण विद्या प्राप्त करूनच गृहस्थाश्रमात प्रवेश करावा, त्याच्यापूर्वी मुळीच नको. ॥9॥
Subject
पुन्शच गृहस्थधर्माविषयी सांगितले आहे -