Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 8 / Mantra 7

63 Mantra
8/7
Devata- सविता गृहपतिर्देवता Rishi- भरद्वाज ऋषिः Chhand- विराट ब्राह्मी अनुष्टुप्, Swara- गान्धारः
Mantra with Swara
उ॒प॒या॒मगृ॑हीतोऽसि सावि॒त्रोऽसि चनो॒धाश्च॑नो॒धाऽअ॑सि॒ चनो॒ मयि॑ धेहि। जिन्व॑ य॒ज्ञं जिन्व॑ य॒ज्ञप॑तिं॒ भगा॑य दे॒वाय॑ त्वा सवि॒त्रे॥७॥

उ॒प॒या॒मगृही॑त॒ इत्यु॑पया॒मऽगृ॑हीतः। अ॒सि॒। सा॒वि॒त्रः। अ॒सि॒। च॒नो॒धा इति॑ चनः॒ऽधाः। च॒नो॒धा इति॑ चनः॒ऽधाः। अ॒सि॒। चनः॑। मयि॑। धे॒हि॒। जिन्व॑। य॒ज्ञम्। जिन्व॑। य॒ज्ञप॑ति॒मिति॑ य॒ज्ञऽप॑तिम्। भगा॑य। दे॒वाय॑। त्वा॒। स॒वि॒त्रे ॥७॥

Mantra without Swara
उपयामगृहीतो सि सावित्रो सि चनोधाश्चनोधा असि चनो मयि धेहि । जिन्व यज्ञञ्जिन्व यज्ञपतिं भगाय देवाय त्वा सवित्रे ॥

उपयामगृहीत इत्युपयामऽगृहीतः। असि। सावित्रः। असि। चनोधा इति चनःऽधाः। चनोधा इति चनःऽधाः। असि। चनः। मयि। धेहि। जिन्व। यज्ञम्। जिन्व। यज्ञपतिमिति यज्ञऽपतिम्। भगाय। देवाय। त्वा। सवित्रे॥७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे परिजात, ज्याप्रमाणे आपण मला (विवाहसंस्काराच्या वा गृहाश्रमाच्या) नियम-उपनियमांनी बांधून घेतले आहे, त्या प्रमाणे मी देखील आपणांस (उपयामगृहीत:) त्याच नियम-उपनियमांनी बद्ध केले आहे. ज्याप्रमाणे आपण (चनोधा:) (चनोधा:) प्रभूत अन्न-धान्याचे स्वामी (असि) आहात, आणि (सावित्र:) सविता म्हणजे सन्तानोत्पत्तीसाठी माझे इष्टदेव (असि) आहात, त्याचप्रमाणे आपणही माझ्याविषयी तसेच आहात. ज्याप्रमाणे आपण (यज्ञम्) दृढनिश्चयी पुरुषासारखे धार्मिक व्यवहार (जिन्व) करता वा प्राप्त होता, त्याप्रमाणे मीही व्हावे. तसेच ज्याप्रमाणे (सवित्रे) सन्तानोत्पत्ती-करिता आणि (भगाय) सेवनीय धन आदी (देवाय) दिव्य ऐश्वर्याकरिता (यज्ञयतिम्) गृहाश्रमरुप यज्ञाचे स्वामी अशा आपल्याला मी प्रसन्न ठेवते किंवा ठेवावे, तसेच आपणही मला (जिन्व) तृप्त करा, प्रसन्न ठेवा ॥7॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. विवाहित स्त्री-पुरुषांसाठी उचित आहे की, ज्या व्यवहारामुळे लाभ होईल, असे कर्म करीत एकमेकाच्या सहकार्याने ऐश्वर्यवृद्धी करावी आणि परस्परात प्रेमभाव ठेवून संतानोत्पत्तीसाठी योग्य आचरण करावे ॥7॥
Subject
पुढील मंत्रात देखील गृहाश्रमधर्माविषयीच सांगितले आहे -