Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 8 / Mantra 63

63 Mantra
8/63
Devata- यज्ञो देवता Rishi- कश्यप ऋषिः Chhand- स्वराट आर्षी गायत्री, Swara- षड्जः
Mantra with Swara
आ प॑वस्व॒ हिर॑ण्यव॒दश्वव॑वत् सोम वी॒रव॑त्। वाजं॒ गोम॑न्त॒माभ॑र॒ स्वाहा॑॥६३॥

आ। प॒व॒स्व॒। हिर॑ण्यव॒दिति॒ हिर॑ण्यऽवत्। अश्व॑व॒दित्यश्व॑ऽवत्। सो॒म॒। वी॒रव॒दिति॑ वी॒रऽव॑त्। वाज॑म्। गोम॑न्त॒मिति॒ गोऽम॑न्तम्। आ। भ॒र॒। स्वाहा॑ ॥६३॥

Mantra without Swara
आपवस्व हिरण्यवदश्ववत्सोम वीरवत् । वाजङ्गोमन्तमाभर स्वाहा ॥

आ। पवस्व। हिरण्यवदिति हिरण्यऽवत्। अश्ववदित्यश्वऽवत्। सोम। वीरवदिति वीरऽवत्। वाजम्। गोमन्तमिति गोऽमन्तम्। आ। भर। स्वाहा॥६३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - ऐश्वर्यकामी हे गृहस्था, तू (स्वाहा) सत्यवाणीने आणि सत्यव्यवहाराने (हिरण्यवत्) सुवर्ण आदी पदार्थांप्रमाणे शुद्ध व कीर्तियंत (अश्ववत्) अश्व आदी उत्तम पशूप्रमाणे प्रगतिशील व समर्थ (वीरवत्) प्रशंसित वीरांप्रमाणे उद्यमी व पराक्रमी होऊन (गोमन्तम्) इंदियांना शुद्ध करणार्‍या आणि (वाजम्) अन्नादीने समृद्ध या यज्ञाचा (आभर) आश्रय घे (यज्ञामुळे जीवनात निर्मळपणा, सामर्थ्य आणि वीरत्व अंगी येऊ दे) आणि अशा प्रकारे (आ) जीवनास सर्वदृष्ट्या (पवस्व) पवित्र करून घे ॥63॥
Essence
भावार्थ - मनुष्यांनी स्वपुरुषार्थ व परिश्रमाद्वारे स्वर्ण आदी धन-संपदा मिळवावी आणि त्यापासून घोडे आदी उत्तम उपयोगी पशूंचे पालन करावे. त्यानंतर वीरांना आपल्या आश्रयाखाली ठेवावे (संपत्तीच्या रक्षणासाठी काही वीर रक्षक नेमावेत) जोपर्यंत हे सर्व साहित्य घरी असत नाही, तोपर्यंत गृहाश्रमरूप यज्ञ पूर्ण करता येत नाही. याकरिता गृहस्थजनांनी सदैव पुरुषार्थ करीत गृहाश्रमाची उन्नती करीत रहावे ॥63॥
Subject
मनुष्याने कशाप्रकारे यज्ञाचे सेवन करावे पुढील मंत्रात याविषयी कथन केले आहे -
Footnote
या आठव्या अध्यायात गृहस्थधर्मासाठी ब्रह्मचारिणी कन्येद्वारे, ब्रम्हचारी युवकाचा स्वीकार, गृहस्थधर्माचे वर्णन, तसेच राजा, प्रजा आणि सभापती आदींच्या कर्तव्याविषयी सांगितले आहे. या अध्यायात सांगितलेल्या अर्थाची पूर्वीच्या सातव्या अध्यायात सांगितलेल्या अर्थाशी संगती जाणावी. ॥^येथे महर्षी दयानंद कृत हिंदी वेदभाषाच्या मराठी अनुवादाचा आठवा अध्याय समाप्त होत आहे.