Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 8 / Mantra 58

63 Mantra
8/58
Devata- विश्वेदेवा देवताः Rishi- वसिष्ठ ऋषिः Chhand- भूरिक् आर्षी जगती, Swara- निषादः
Mantra with Swara
विश्वे॑ दे॒वाश्च॑म॒सेषून्नी॒तोऽसु॒र्होमा॒योद्य॑तो रु॒द्रो हू॒यमा॑नो॒ वातो॒ऽभ्यावृ॑तो नृ॒चक्षाः॒ प्रति॑ख्यातो भ॒क्षो भक्ष्यमा॑णः पि॒तरो॑ नाराश॒ꣳसाः॥५८॥

विश्वे॑। दे॒वाः। च॒म॒सेषु॑ उन्नी॑त॒ इत्युत्ऽनी॑तः। असुः॑। होमा॑य। उद्य॑त॒ इत्युत्ऽय॑तः। रु॒द्रः। हू॒यमा॑नः। वातः॑। अभ्यावृ॑त॒ इत्य॑भि॒ऽआवृ॑तः। नृ॒चक्षा॒ इति॑ नृ॒ऽचक्षाः॑। प्रति॑ख्यात॒ इति॒ प्रति॑ऽख्यातः। भ॒क्षः। भ॒क्ष्यमा॑णः। पि॒तरः॑। ना॒रा॒श॒ꣳसाः ॥५८॥

Mantra without Swara
विश्वे देवा श्चमसेषून्नीतोसुर्हामायोद्यतो रुद्रो हूयमानो वातो भ्यावृत्तो नृचक्षाः प्रतिख्यातो भक्षो भक्ष्यमाणः पितरो नाराशँसाः सन्नः सिन्धु॥

विश्वे। देवाः। चमसेषु उन्नीत इत्युत्ऽनीतः। असुः। होमाय। उद्यत इत्युत्ऽयतः। रुद्रः। हूयमानः। वातः। अभ्यावृत इत्यभिऽआवृतः। नृचक्षा इति नृऽचक्षाः। प्रतिख्यात इति प्रतिऽख्यातः। भक्षः। भक्ष्यमाणः। पितरः। नाराशꣳसाः॥५८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - ज्या विद्वानांनी यज्ञाचे आयोजन करून (चमसेषु) मेघांमधे सुवासिक (औषधयुक्त होम सामुग्री धृत आदी) पदार्थ (उन्नीत:) वर आकाशात पाठविले आणि (असु:) आपले जीवन (उद्यत:) उद्यम आणि उत्तम यत्न करीत व्यतीत केले, तसेच (रुद्र:) आपल्या जीवास (जीवनाम) पवित्र करण्यासाठी हे विद्वद्व्रत (हूयमान:) स्वीकारले आणि (नृचक्ष:) मनुष्यांना आनंदित करणारे तत्त्वज्ञान (प्रतिख्यात:) वादानुवाद, चर्चाद्वारे प्रकट केले, (वात:) स्वत: (ग्राम व नगराच्या) बाहेरच्या निवांत स्थानी, मुक्त हवेत वायुमय प्रदेशात निवास करून (भक्ष्यमाण:) खाण्याकरिता (भक्ष:) वनातील शुद्ध स्वच्छ फळांचे सेवन केले, अशा प्रशंसनीय, (सर्वत्यागी, तपस्वी) हितोपदेशक (विश्वेदेवा:) सर्व विद्वानांना (पित्य:) महान् लोकापकारक व ज्ञानी मानले पाहिजे. ( सर्व मनुष्यांवर त्या विद्वानांचे अनंत उपकार आहेत) ॥58॥
Essence
भावार्थ - जे विद्वद्गण परोपकार भावनेने विद्येचा विस्तार करतात, सुगंधियुक्त, पुष्टिकारक, मधुर आणि रोगनाशक पदार्थांचे यथोचित सम्मिश्रण करून यज्ञाग्रीमध्ये त्या पदार्थांची आहुती देतात व परिणामीं वायुला शुद्धकरून शुद्ध वृष्टिजल व औषधींचे सेवन करून (स्वत:च्या व सर्वांच्या शरीरास नीरोग करतात, ते विद्वद्गण या जगात अत्यंत प्रशंसनीय होतात ॥58॥
Subject
पुन्हा वेगळ्या रुपाने विद्वानांविषयीच कथन केले आहे -