Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 8 / Mantra 55

63 Mantra
8/55
Devata- इन्द्रादयो देवताः Rishi- वसिष्ठ ऋषिः Chhand- आर्षी पङ्क्तिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
इन्द्र॑श्च म॒रुत॑श्च क्र॒यायो॒पोत्थि॒तोऽसु॑रः प॒ण्यमा॑नो मि॒त्रः क्री॒तो विष्णुः॑ शिपिवि॒ष्टऽऊ॒रावास॑न्नो॒ विष्णु॑र्न॒रन्धि॑षः॥५५॥

इन्द्रः॑। च॒। म॒रुतः॑। च॒। क्र॒पाय॑। उ॒पोत्थि॑त॒ इत्यु॑प॒ऽउत्थि॑तः। असु॑रः। प॒ण्यमा॑नः। मि॒त्रः। क्री॒तः। विष्णुः॑। शि॒पि॒वि॒ष्ट इति॑ शिपिऽवि॒ष्टः। ऊ॒रौ। आस॑न्न॒ इत्याऽस॑न्नः। विष्णुः॑। न॒रन्धि॑षः ॥५५॥

Mantra without Swara
इन्द्रश्च मरुतश्च क्रयायोपोत्थितोसुरः पण्यमानः मित्रः क्रीतः विष्णुः शिपिविष्टऽऊरावासन्नो विष्णुर्नरन्धिषः प्रोह्यमाणः सोम॥

इन्द्रः। च। मरुतः। च। क्रयाय। उपोत्थित इत्युपऽउत्थितः। असुरः। पण्यमानः। मित्रः। क्रीतः। विष्णुः। शिपिविष्ट इति शिपिऽविष्टः। ऊरौ। आसन्न इत्याऽसन्नः। विष्णुः। नरन्धिषः॥५५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, विद्वानांनी (वैज्ञानिकांनी) (क्रपाय) लौकिक व्यवहारांच्या पूर्ततेसाठी (इन्द्र:) विद्युत (मरूत:) वायु आणि (असुर:) मेघ यांच्या (पण्यमान:) उपयुक्त गुणांना जाणले आहे. तसेच (मित्र:) मित्राप्रमाणे असलेला (शिपिनिष्ट:) समस्त पदार्थांत व्याप्त असा (विष्णु:) सर्व शरीरात व्याप्त असलेला धनंजय नावाचा वायू यासही जाणले आहे. (त्यांच्याप्रमाणे तुम्ही देखील यातील प्रत्येक पदार्थास जाणा व त्यापासून लाभ घ्या) तसेच (नरंधिष:) मनुष्यांच्या आत्म्यात जो साक्षीरुप (विष्णु:) हिरण्यगर्भ ईश्वर आहे, त्यास जाणून घ्या. आणि (ऊरौ) आच्छादन आदी क्रियांमध्ये जो पदार्थ (आसभ:) जवळ अथवा (उपोत्थित:) समीपस्थ असलेल्या प्रकाशाप्रमाणे वाटतो (जगात अनेक ज्या वस्तूंचे गुण गुप्तरुपात आहेत, जवळ असूनही ज्या पदार्थांना मनुष्य ओळखत नाहीत) त्या (क्रीत:) दैनंदिन व्यवहारात येणार्‍या पदार्थांचे ज्ञानदेखील तुम्ही मिळवा. (त्या वस्तूंपासून लाभान्वित व्हा) ॥55॥
Essence
भावार्थ - मनुष्यांसाठी हे हितकर आणि उचित कर्म आहे की ईश्वराने अग्नी आदी ज्या पदार्थांचे दान त्यांना दिले आहे, आपल्या क्रिया-कौशल्याद्वारे (परीक्षण, अविष्करण, प्रयोग आदीद्वारे) त्यांचा उपयोग करून आपले गृहकार्य वा गाईस्थ्य व्यवहार पूर्ण करावेत ॥55॥
Subject
पुढील मंत्रात देखील तोच विषय सांगितला आहे -