Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 8 / Mantra 52

63 Mantra
8/52
Devata- प्रजापतिर्देवता Rishi- देवा ऋषयः Chhand- निचृत् आर्षी बृहती Swara- मध्यमः
Mantra with Swara
स॒त्रस्य॒ऽऋद्धि॑र॒स्यग॑न्म॒ ज्योति॑र॒मृता॑ऽअभूम। दिवं॑ पृथि॒व्याऽअध्या॑रुहा॒मावि॑दाम दे॒वान्त्स्व॒र्ज्योतिः॑॥५२॥

स॒त्रस्य॑। ऋद्धिः॑। अ॒सि॒। अग॑न्म। ज्योतिः॑। अ॒मृ॑ताः। अ॒भू॒म॒। दिव॑म्। पृ॒थि॒व्याः। अधि। आ। अ॒रु॒हा॒म॒। अवि॑दाम। दे॒वान्। स्वः॑। ज्योतिः॑ ॥५२॥

Mantra without Swara
सत्रस्य ऽऋद्धिरस्यगन्म ज्योतिरमृता ऽअभूम दिवम्पृथिव्या ऽअध्यारुहामाविदाम देवान्त्स्वर्ज्यातिः ॥

सत्रस्य। ऋद्धिः। असि। अगन्म। ज्योतिः। अमृताः। अभूम। दिवम्। पृथिव्याः। अधि। आ। अरुहाम। अविदाम। देवान्। स्वः। ज्योतिः॥५२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (विद्वान)- विद्वान महोदय, आपण (सत्रस्य) राजा-प्रजा यांमध्ये संबंधरुप यज्ञाचे (ऋद्धि:) सर्वोत्कृष्ट समृद्धी (असि) आहात. आपल्या संग-संगतीमुळे आम्ही (गृहस्थजन) (ज्योति:) ज्ञान-विज्ञान (अगन्म) प्राप्त करू शकू आणि आम्ही (अमृता:) मोक्ष मिळण्यास पात्र (अभूम) होऊ शकू असे करा. तसेच आम्ही (दिव:) सूर्य (पृथिव्या:) पृथ्वी आदी लोकां (अधि) मध्ये (अरुहाम) पूर्ण उत्कर्षास प्राप्त करू (तुमच्या मार्गदर्शनाने भूमी व इतर लोकांविषयीचे ज्ञान पूर्णपणे प्राप्त करू) (देवान्) याप्रकारे (देवान्) विद्वज्जन भोगत असलेल्या दिव्य भोगांचा आणि (ज्योति:) विद्वानांच्या विज्ञानाचा व (स्व:) आत्यंतिक सुखाचा (अविदाम) आम्ही उपभोग घेऊ शकू, असे करा ॥52॥
Essence
भावार्थ - जोपर्यंत राज्यात सर्वांचे रक्षण करणारा धार्मिक राजा आणि आप्त (विश्वसनीय व सुपात्र) विद्वान असणार नाही, तोपर्यंत कोणीही माणूस विद्याप्राप्ती आणि मोक्षप्राप्तीची साधने निर्विघपणे मिळवू शकणार नाही. मोक्षसुखापेक्षा श्रेष्ठ असे कोणतेही सुख नाही. (हे सर्वांनी लक्षात घ्यावे) ॥52॥
Subject
पुढील मंत्रात गृहस्थांकरिता विशेष उपदेश केला आहे -