Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 8 / Mantra 47

63 Mantra
8/47
Devata- विश्वकर्म्मेन्द्रो देवता Rishi- शास ऋषिः Chhand- विराट ब्राह्मी बृहती, Swara- मध्यमः
Mantra with Swara
उ॒प॒या॒मगृ॑हीतो॒ऽस्य॒ग्नये॑ त्वा गाय॒त्रछ॑न्दसं गृह्णा॒मीन्द्रा॑य त्वा त्रि॒ष्टुप्छ॑न्दसं गृह्णामि॒ विश्वे॑भ्यस्त्वा दे॒वेभ्यो॒ जग॑च्छन्दसं गृह्णाम्यनु॒ष्टुप्ते॑ऽभिग॒रः॥४७॥

उ॒प॒या॒मगृ॑हीत॒ इत्यु॑पया॒मऽगृ॑हीतः। अ॒सि॒। अ॒ग्नये॑। त्वा॒। गा॒य॒त्रछ॑न्दस॒मिति॑ गाय॒त्रऽछन्द॑सम्। गृ॒ह्णा॒मि॒। इन्द्रा॑य। त्वा॒। त्रि॒ष्टुप्छ॑न्दसम्। त्रि॒स्तुप्छ॑न्दस॒मिति॑ त्रि॒स्तुप्ऽछ॑न्दसम्। गृ॒ह्णा॒मि॒। विश्वे॑भ्यः। त्वा॒। दे॒वेभ्यः॑। जग॑च्छन्दस॒मि॑ति॒ जग॑त्ऽछन्दसम्। गृ॒ह्णा॒मि॒। अ॒नु॒ष्टुप्। अ॒नु॒स्तुबित्य॑नु॒ऽस्तुप्। ते॒। अ॒भि॒ग॒र। इत्य॑भिऽग॒रः ॥४७॥

Mantra without Swara
उपयामगृहीतो स्यग्नये त्वा गायत्रच्छन्दसङ्गृह्णामीइन्द्राय त्वा त्रिष्टुप्छन्दसङ्गृह्णामि विश्वेभ्यस्त्वा देवेभ्यो जगच्छन्दसङ्गृह्णाम्यनुष्टुप्ते भिगरः ॥

उपयामगृहीत इत्युपयामऽगृहीतः। असि। अग्नये। त्वा। गायत्रछन्दसमिति गायत्रऽछन्दसम्। गृह्णामि। इन्द्राय। त्वा। त्रिष्टुप्छन्दसम्। त्रिस्तुप्छन्दसमिति त्रिस्तुप्ऽछन्दसम्। गृह्णाामि। विश्वेभ्यः। त्वा। देवेभ्यः। जगच्छन्दसमिति जगत्ऽछन्दसम्। गृह्णाामि। अनुष्टुप्। अनुस्तुबित्यनुऽस्तुप्। ते। अभिगर। इत्यभिऽगरः॥४७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (विश्वकर्मन्) समस्त सत्कर्म करणारे विद्वान, महोदय, (ते) आपले (अनुष्टुप्) अज्ञानाचा नाश करणारे (अभिगर:) सर्वदृष्ट्या प्रशंसनीय आणि प्रसिद्ध जी वचने आहेत, त्या वचनांचा/वाक्यांचा मी स्वीकार करीत आहे. अग्नी आदी पदार्थांचे गुण प्रकट करण्यासाठी व वेदाच्या गायत्री छंदातील मंत्राचा अर्थ जागणारे असे आपण, मी (त्वा) आपला (अग्निये) अग्नी आदी पदार्थांचे गुण जाणून घेण्यासाठी (गृह्वामि) स्वीकार करीत आहे. तसेच (त्रिष्टुप् छन्दसम्) परमैश्वर्यदायी त्रिष्टुप् छंदातील वेदमंत्रांचा अर्थ सांगणारे आपण, मी (त्वा) आपला (इन्द्राय) परमैश्वर्यप्राप्तीसाठी (गृह्णामि) स्वीकार करीत आहे. तसेच (जगच्छंदसम्) समस्त जगाच्या दिव्य गुण, कर्म आणि स्वभावाचा बोध करविणार्‍या वेदमंत्रांच्या अर्थाचे विज्ञान सांगणारे आपण, मी (त्वा) आपला (विश्वेभ्य:) समस्त (देवभ्य:) सद्गुण, सत्कर्म आणि सत्स्वभावाच्या प्राप्तीसाठी (गृह्णामि) स्वीकार करीत आहे (उपयामगृहीत:) वरील सर्व कार्यांच्या पूर्ततेसाठी, मी (सामान्यजन सर्वप्रकारे आपला स्वीकार केलेला (असि) आहे. (वेदातील विविध छंदांत सांगितलेला उपदेश आपण सत्कर्मशील विद्वानाने मला-सामान्यजनाला सांगावा व त्याचा लाभ मिळवून देण्यास आमचे मार्गदर्शक व्हावे, मी यासाठी आपणांस शिक्षक म्हणून स्वीकारले आहे) ॥47॥
Essence
भावार्थ - या मंत्रात मागील मंत्र (क्र. 46) पासून संबोधूनच हा मंत्र म्हटलेला आहे) मनुष्यांसाठी आवश्यक आहे की अग्नी आदी पदार्थांचा पदार्थ विद्येद्वारे (भौतिकशास्त्र) ज्ञान सांगणार्‍या ज्या क्रिया (प्रयोग व उपयोग) आहेत व त्यांचा बोध करविणारे जे गायत्री आदी छंदातील ऋग्वेद आदी वेदातील मंत्र आहेत, त्या मंत्रांचे ज्ञान होण्यासाठी एखाद्या योग्य व उत्तम शिक्षकांची निवड करावी. कारण की उत्तम अध्यापकाशिवाय कोणीही विद्या प्राप्त करू शकत नाही. ॥47॥
Subject
पुनश्च किंचित वेगवेगळ्या रुपात त्याच विषयाचे कथन केले आहे -