Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 8 / Mantra 46

63 Mantra
8/46
Devata- विश्वकर्मेन्द्रो देवता Rishi- शास ऋषिः Chhand- निचृत् आर्षी त्रिष्टुप्,विराट आर्षी अनुष्टुप्, Swara- धैवतः, गान्धारः
Mantra with Swara
विश्व॑कर्मन् ह॒विषा॒ वर्ध॑नेन त्रा॒तार॒मिन्द्र॑मकृणोरव॒ध्यम्। तस्मै॒ विशः॒ सम॑नमन्त पू॒र्वीर॒यमुग्रो वि॒हव्यो॒ यथास॑त्। उ॒प॒या॒मगृ॑हीतो॒ऽसीन्द्रा॑य त्वा विश्व॒क॑र्मणऽए॒ष ते॒ योनि॒रिन्द्रा॑य त्वा वि॒श्वक॑र्मणे॥४६॥

विश्व॑कर्म॒न्निति॒ विश्व॑ऽकर्मन्। ह॒विषा॑। वर्द्ध॑नेन। त्रा॒तार॑म्। इन्द्र॑म्। अ॒कृ॒णोः॒। अ॒व॒ध्यम्। तस्मै॑। विशः॑। सम्। अ॒न॒म॒न्त॒। पू॒र्वीः। अ॒यम्। उ॒ग्रः। वि॒हव्य॒ इति॑ वि॒ऽहव्यः॑। यथा॑। अस॑त्। उ॒प॒या॒मगृ॑हीत॒ इत्यु॑पया॒मऽगृ॑हीतः। अ॒सि॒। इन्द्रा॑य। त्वा॒। वि॒श्वक॑र्मण॒ इति॑ वि॒श्वऽक॑र्मणे। ए॒षः। ते॒। योनिः॑। इन्द्रा॑य। त्वा॒। वि॒श्वक॑र्मण॒ इति॑ वि॒श्वऽक॑र्मणे ॥४६॥

Mantra without Swara
विश्वकर्मन्हविषा वर्धनेन त्रातारमिन्द्रमकृणोरवध्यम् । तस्मै विशः समनमन्त पूर्वीरयमुग्रो विहव्यो यथासत् । उपयामगृहीतो सीन्द्राय त्वा विश्वकर्मणे ऽएष ते योनिरिन्द्राय त्वा विश्वकर्मणे ॥

विश्वकर्मन्निति विश्वऽकर्मन्। हविषा। वर्द्धनेन। त्रातारम्। इन्द्रम्। अकृणोः। अवध्यम्। तस्मै। विशः। सम्। अनमन्त। पूर्वीः। अयम्। उग्रः। विहव्य इति विऽहव्यः। यथा। असत्। उपयामगृहीत इत्युपयामऽगृहीतः। असि। इन्द्राय। त्वा। विश्वकर्मण इति विश्वऽकर्मणे। एषः। ते। योनिः। इन्द्राय। त्वा। विश्वकर्मण इति विश्वऽकर्मणे॥४६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (विश्वकर्म्मन्) समस्त सत्कर्म करणारे विद्वान, या सभापतीला आपण (वर्द्धनेन) वृद्धी व उन्नत्तीसाठी (हविषा) ग्रहणीय ज्ञान-विज्ञानाद्वारे (अवध्यम्) वाईट व्यसनांपासून आणि अधर्मापासून रहित करा, दूर ठेवा (इन्द्रम्) परम ऐश्वर्य देणार्‍या आणि (त्रातारम्) प्रजाजनांची रक्षा करणार्‍या या सभापतीना (सन्मार्गावर राहून तो व्यसन आणि अधर्मापासून दूर राहील, असे (अकृणो:) करा (प्रजेने राजावर नियंत्रण ठेवावे व त्यास अधर्माचरण करण्यापासून परावृत्त करावे) (तस्मै) त्या सभापतीला (पूर्वी:) पूर्वीच्या प्रजाजनांनी ज्या प्रजेस उत्तम शिक्षण व संस्कार दिले आहेत, अशा जागरुक (विश:) प्रजाजनांनी (समनमन्त) चांगल्या प्रकारे मान द्यावा (त्याच्या आदेशांचे पालन करावे) (अयम्) हा सभापती (उग्र:) दृष्टांना दंडित करण्यात निपुण आहे. (विहव्य:) तो अनेक प्रकारची साधनें म्हणजे अस्त्र-शस्त्रादी धारण करणारा (असत्) होवो (त्यामुळे तो शत्रूपासून आमचे रक्षण करू शकेल.) याचप्रमाणे (सहकार्य) प्रजाजनांनी देखील सभापतीशी अशाच प्रकारे आचरण (सहकार्य) करावे. (हे विद्वज्जन) आपण अशाप्रकारचे आयोजन करा. (उपयामगृहीत:) येथून पुढच्या भागाच्या मंत्राचा अर्थ मागील मंत्रात (क्र. 45) सांगितल्याप्रमाणेच आहे. ॥46॥
Essence
भावार्थ - मनुष्यांनी या संसारामधे सर्वांचे रक्षण करणार्‍या परमेश्वराला आणि राज्याच्या सभापतीला कदापि विसरूं नये. एवढेच नव्हे, तर सर्वांनी त्यांच्याशी अनुकुल अशीच आपली वर्तणूक ठेवावी. प्रजा जर विरोधी असेल, तर कोणीही राजा उत्कृष्ट समृद्धी प्राप्त करू शकत नाही. आणि प्रजाजनदेखील ईश्वराविना आणि राजाविना धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांची सिद्धी प्राप्त करून देणारे कार्य करू शकत नाहीत. यामुळे प्रजाजनांनी राजा व ईश्वराच्या आश्रयात (कृपेत) राहून सगळ्यांनी एकमेकांवर उपकार करीत व उपकार स्वीकारीत धर्मानुकूल आचरण करावे ॥46॥
Subject
पुढील मंत्रात राजधर्माविषयी उपदेश केला आहे -