Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 8 / Mantra 45

63 Mantra
8/45
Devata- ईश्वरसभेशौ राजानौ देवते Rishi- शास ऋषिः Chhand- भूरिक् आर्षी त्रिष्टुप्,विराट आर्षी अनुष्टुप्, Swara- धैवतः, गान्धारः
Mantra with Swara
वा॒चस्पतिं॑ वि॒श्वक॑र्माणमू॒तये॑ मनो॒जुवं॒ वाजे॑ऽअ॒द्या हु॑वेम। स नो॒ विश्वा॑नि॒ हव॑नानि जोषद् वि॒श्वश॑म्भू॒रव॑से सा॒धुक॑र्म्मा। उ॒प॒या॒मगृ॑हीतो॒ऽसीन्द्रा॑य त्वा वि॒श्वक॑र्मणऽए॒ष ते॒ योनि॒रिन्द्रा॑य त्वा वि॒श्वक॑र्मणे॥४५॥

वा॒चः। पति॑म्। वि॒श्वक॑र्म्माण॒मिति॑ वि॒श्वऽक॑र्म्माणम्। ऊ॒तये॑। म॒नो॒जुव॒मिति॑ मनः॒ऽजुव॑म्। वाजे॑। अ॒द्य। हु॒वे॒म॒। सः। नः॒। विश्वा॑नि। हव॑नानि। जो॒ष॒त्। वि॒श्वश॑म्भू॒रिति॑ वि॒श्वऽश॑म्भूः। अव॑से। सा॒धुक॒र्म्मेति॑ सा॒धुऽक॑र्म्मा। उ॒प॒या॒मगृ॑हीत॒ इत्यु॑पया॒मऽगृ॑हीतः। अ॒सि॒। इन्द्रा॑य। त्वा॒। वि॒श्वक॑र्म्मण॒ इति॑ वि॒श्वऽक॑र्म्मणे। ए॒षः। ते॒। योनिः॑। इन्द्रा॑य। त्वा॒। वि॒श्वक॑र्म्मण॒ इति॑ वि॒श्वऽक॑र्म्मणे ॥४५॥

Mantra without Swara
वाचस्पतिँविश्वकर्माणमूतये मनोजुवँ वाजे ऽअद्या हुवेम । स नो विश्वानि हवनानि जोषद्विश्वशम्भूरवसे साधुकर्मा । उपयामगृहीतो सीन्द्राय त्वा विश्वकर्मणे ऽएष ते योनिरिन्द्राय त्वा विश्वकर्मणे ॥

वाचः। पतिम्। विश्वकर्म्माणमिति विश्वऽकर्म्माणम्। ऊतये। मनोजुवमिति मनःऽजुवम्। वाजे। अद्य। हुवेम। सः। नः। विश्वानि। हवनानि। जोषत्। विश्वशम्भूरिति विश्वऽशम्भूः। अवसे। साधुकर्म्मेति साधुऽकर्म्मा। उपयामगृहीत इत्युपयामऽगृहीतः। असि। इन्द्राय। त्वा। विश्वकर्म्मण इति विश्वऽकर्म्मणे। एषः। ते। योनिः। इन्द्राय। त्वा। विश्वकर्म्मण इति विश्वऽकर्म्मणे॥४५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - ( या मंत्रात प्रजाजन ईश्वरास तसेच सभापतीस प्रार्थना करीत आहेत. त्यामुळे प्रत्येक शब्दाचे त्या त्या संदर्भात दोन अर्थ आहेत) आम्ही प्रजाजन (अद्य) आज किंवा आता (वाजे) विज्ञानप्राप्तीसाठी/युद्ध करण्यासाठी (वाच:) वेदवाणीचा स्वामीला आमच्या रक्षकाला (विश्वकर्माणय्) सर्व धर्मयुक्त कर्म करणार्‍या अशा (मनोजुनम्) मनाची गती जाणणार्‍या/आमच्या मनातली इच्छा ओळखणार्‍या परमेश्वराला/सभापतीला (हुवेम) अत्यंत प्रिय मानतो. (साधुकर्म्मा) श्रेष्ठ कर्म करणार्‍या आणि (विश्वशम्भू:) समस्त सुख उत्पन्न करणार्‍या जगदीश्वराने/सभापतीने (न:) आमच्या मनात त्यांच्याविषयी (अवसे) प्रेम भावाची वृद्धी करण्याकरिता (विश्वानि) (हवनानि) आम्ही करीत असलेल्या प्रार्थनेला/आम्ही दिलेल्या प्रार्थनापत्रांना (जोषत्) आत्मीयतेने प्रेमाने ऐकवो/ मान (ते) आपले (एष:) हे (प्रार्थना ऐकण्याचे) कर्म (योनि:) प्रेमाचे कारण आहे. (उपयामगृहीत:) आपण यम-नियमांद्वारे प्राप्तव्य आहांत बांधलेले (असि आहात. यामुळे (विश्वकर्म्मणे) संपूर्ण कार्यांच्या पूर्ततेसाठी आणि (इन्द्राय) ऐश्वर्यप्राप्तीसाठी आम्ही (त्वा) आपणांस (ईश्वरास) प्रार्थना करतो आणि (विश्वकर्म्मणे) समस्त कर्मांच्या सिद्धीकरिता व शिल्पक्रिया आदीच्या कौशल्याने ऐश्वर्यशाली झालेल्या अशा आपल्याकडे (सभापतीकडे) येतो ॥45॥
Essence
भावार्थ - या मंत्रात श्लेषालंकार आहे (शब्दाचे दोन अर्थ आहेत) परमेश्वर व न्यायाधीश सभापती आम्हां मनुष्यांच्या प्रजाजनांच्या केलेल्या कर्मांचे निरीक्षण/परीक्षण करीत आम्हांस त्याप्रकारे व्यवस्थेत/नियमात ठेवतो. तो कोणाला दुख देत नाही किंवा कोणाशी छळ-कपटाने वागत नाही. परमेश्वराच्या सहाय्याने मनुष्य मोक्षप्राप्ती करण्यास समर्थ होतो आणि सभापतीच्या सहाय्याने सांसारिक कार्य-व्यवहार पूर्ण करू शकतो आणि धर्मशील होतो. तो परमेश्वर परमार्थसिद्धीकरिता आणि तो सभापती लौकिक व्यवहारपूर्तीकरिता आमच्यासाठी सेवनीय आहे. (आम्ही त्यांच्या आश्रयास जावे व कार्यपूर्ती साधावी) ॥45॥
Subject
गृहस्थधर्माच्या संबंधाने राजा आणि ईश्वर यांच्या विषयी पुढील मंत्रात सांगितले आहे -