Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 8 / Mantra 4

63 Mantra
8/4
Devata- आदित्यो गृहपतिर्देवताः Rishi- कुत्स ऋषिः Chhand- निचृत् जगती Swara- निषादः
Mantra with Swara
य॒ज्ञो दे॒वानां॒ प्रत्ये॑ति सु॒म्नमादि॑त्यासो॒ भव॑ता मृड॒यन्तः॑। आ वो॒ऽर्वाची॑ सुम॒तिर्व॑वृत्याद॒ꣳहोश्चि॒द्या व॑रिवो॒वित्त॒रास॑दादि॒त्येभ्य॑स्त्वा॥४॥

य॒ज्ञः। दे॒वाना॑म्। प्रति॑। ए॒ति॒। सु॒म्नम्। आदि॑त्यासः। भव॑त। मृ॒ड॒यन्तः॑। आ। वः॒। अ॒र्वाची॑। सु॒म॒तिरिति॑ सुऽम॒तिः। व॒वृ॒त्या॒त्। अ॒होः। चि॒त्। या। व॒रि॒वो॒वित्त॒रेति॑ वरिवो॒वित्ऽत॑रा। अस॑त्। आ॒दि॒त्येभ्यः। त्वा॒ ॥४॥

Mantra without Swara
यज्ञो देवानाम्प्रत्येति सुम्नमादित्यासो भवता मृडयन्तः । आ वोर्वाची सुमतिर्ववृत्यादँहोश्चिद्या वरिवोवित्तरासदादित्येभ्यस्त्वा ॥

यज्ञः। देवानाम्। प्रति। एति। सुम्नम्। आदित्यासः। भवत। मृडयन्तः। आ। वः। अर्वाची। सुमतिरिति सुऽमतिः। ववृत्यात्। अहोः। चित्। या। वरिवोवित्तरेति वरिवोवित्ऽतरा। असत्। आदित्येभ्यः। त्वा॥४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (पति-पत्नी म्हणत आहेत) हे (आदिव्यास:) सूर्याप्रमाणे विद्या आदी शुभगुणांनी प्रकाशमान असलेले आपण सर्व (देवानाम्) विद्वज्जन, (व:) आपण करीत असलेला हा (यज्ञ:) गृहस्थाश्रमाच्या कर्तव्यांचे पालनरुप यज्ञ सर्व स्त्री-पुरुषांसाठी आदर्श व अनुकरणीय आहे आणि (सुम्नम्) सर्वांना निश्चयाने सुखाकडे (एति) नेतो. तसेच (अंहो:) ग्रहाश्रमाला सुखदायी करणारी (अर्वाची) उत्तम ज्ञान देणारी व विद्या, विज्ञान-प्राप्तीचे कारण असलेली आणि (वदिवोभित्तरा) सत्याचरण शिकविणारी व सन्मार्गावर नेणारी आपली (या) जी (सुमति:) श्रेष्ठबुद्धी आहे ती सदा निरंतर श्रेष्ठ मार्गावर (आ) (ववृत्यात्) चालत राहो. (अदित्यंभ्य:) आप्त विद्वानांकडून (त्वा) आपणांस (यापुढीही) विद्या-ज्ञान (असत्) मिळत राहो (त्यामुळे आपण ज्या श्रेष्ठ मार्गावर चालत आहात, गृहाश्रमात आम्ही देखील आपले अनुकरण करीत राहणार) (चित्) आपल्या त्या श्रेष्ठबुद्धीने आपण आम्हा पति-पत्नीला (मृडयन्त:) सदा सुख देत रहा. ॥4॥
Essence
भावार्थ - सर्व स्त्री-पुरुषांसाठी हे उचित आहे की विवाह केल्यानंतर ज्या ज्या कार्य-व्यवहारादीमुळे विद्या, उत्तम ज्ञान, बुद्धी, धन, सौहार्द्र आणि परोपकारवृत्ती वाढेल, ते ते कर्म अवश्य आचरावेत. ॥4॥
Subject
पुढील मंत्रात देखील गृहाश्रमाविषयी कथन केले आहे -