Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 8 / Mantra 37

63 Mantra
8/37
Devata- सम्राड्माण्डलिकौ राजानौ देवते Rishi- विवस्वान् ऋषिः Chhand- साम्नी त्रिष्टुप्,विराट आर्ची त्रिष्टुप्, Swara- धैवतः
Mantra with Swara
इन्द्र॑श्च स॒म्राड् वरु॑णश्च॒ राजा॒ तौ ते॑ भ॒क्षं च॑क्रतु॒रग्र॑ऽए॒तम्। तयो॑र॒हमनु॑ भ॒क्षं भ॑क्षयामि॒ वाग्दे॒वी जु॑षा॒णा सोम॑स्य तृप्यतु स॒ह प्रा॒णेन॒ स्वाहा॑॥३७॥

इन्द्रः॑। च॒। स॒म्राडिति॑ स॒म्ऽराट्। वरु॑णः। च॒। राजा॑। तौ। ते॒। भ॒क्षम्। च॒क्र॒तुः। अग्रे॑। ए॒तम्। तयोः॑। अ॒हम्। अनु॑। भ॒क्षम्। भ॒क्ष॒या॒मि॒। वाक्। दे॒वी। जु॒षा॒णा। सोम॑स्य। तृ॒प्य॒तु॒। स॒ह। प्रा॒णेन॑। स्वाहा॑ ॥३७॥

Mantra without Swara
इन्द्रश्च सम्राड्वरुणश्च राजा तौ ते भक्षञ्चक्रतुरग्रेतम् । तयोरहमनु भक्षम्भक्षयामि वाग्देवी जुषाणा सोमस्य तृप्यतु सह प्राणेन स्वाहा ॥

इन्द्रः। च। सम्राडिति सम्ऽराट्। वरुणः। च। राजा। तौ। ते। भक्षम्। चक्रतुः। अग्रे। एतम्। तयोः। अहम्। अनु। भक्षम्। भक्षयामि। वाक्। देवी। जुषाणा। सोमस्य। तृप्यतु। सह। प्राणेन। स्वाहा॥३७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (एका प्रजाजनास उद्देशून विद्वानांचे वचन)- हे प्रजाजन, (इन्द्र:) परमैश्वर्ययुक्त (च) आणि राज्याच्या (शासनासाठी आवश्यक अंग, उपांग-सेना, अधिकारी आदी) अंग-उपांगंसह (सम्राट) सर्व दिशांपर्यंत एकचक्र राज्य करणारा एक राजा आहे आणि (दुसरा) (वरूण:) अत्युत्तम (च) आणि (राजा) न्यायादी गुणांमुळे कीर्तिमान मांडलिक सेनापती आहे. (तौ) त्या दोघांनी (अग्रे) प्रथम (ते) तुझे नानाप्रकारे (भक्ष्ण्) रक्षण करावे आणि (अनु) तद्नंतर (अहम्) मी (विद्वानाने) मी (तयो:) त्यांनी दिलेल्या (भक्षम्) सेवनीय पदार्थांचा (भक्षयामि) उपभोग करावा आणि इतरांना उपभोग करवावा अशा प्रकारे आम्ही तुम्ही सर्वजणांनी (सोमस्य) विद्यारुप ऐश्वर्य देणार्‍या (जुषाणा) प्रीती उत्पन्न करणार्‍या (देवी) सर्व विद्यांनी प्रकाशिका अशा (वाक्) वेदवाणीद्वारे (स्वाहा) सर्व मनुष्यांनी (तृत्यतु) तृप्त व्हावे. (वेदाध्ययन करीत सर्वांनी संतुष्ट रहावे) ॥37॥
Essence
भावार्थ - प्रजेसाठी दोन प्रकारचे राजा असतात. प्रत्येकाची वेगळी सभा असते. एक राजा तो की जो चक्रवर्ती म्हणजे एकचक्र, एकछत्र राज्य करणारा आणि दुसरा मांडलिक राजा की जो मंडलाचा (संस्थानिक) स्वामी व शासक असतो. या दोघा राजांनी उत्तमोत्तम न्यायदान करीत, आपल्या नम्रत्व, सुशीलत्व आणि वीरत्व आदी गुणांनी चांगल्याप्रकारे आधी प्रजेचे रक्षण करावे. नंतर राज्यासाठी प्रजाजनांकडून यथोचित कर घ्यावा आणि सर्वा कार्य-नियमादीमध्ये विद्या आणि सत्याप्रमाणे आचरण करावे. याप्रकारे धर्म, अर्थ आणि काम यांद्वारे प्रजाजनांना संतुष्ट करून स्वत: संतुष्ट असावे. आपत्काळी राजाने प्रजेची व प्रजेने राजाची रक्षा करावी आणि अशाप्रकारे दोघांनी आनंदित असावे ॥37॥
Subject
गृहाश्रमाकरिता उपयोगी अशा राजविषयी पुढील मंत्रात कथन केले आहे -