Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 8 / Mantra 36

63 Mantra
8/36
Devata- परमेश्वरो देवता Rishi- विवस्वान् ऋषिः Chhand- भूरिक् आर्षी त्रिष्टुप्, Swara- धैवतः
Mantra with Swara
यस्मा॒न्न जा॒तः परो॑ऽअ॒न्योऽअस्ति॒ यऽआ॑वि॒वेश॒ भुव॑नानि॒ विश्वा॑। प्र॒जाप॑तिः प्र॒जया॑ सꣳररा॒णस्त्रीणि॒ ज्योती॑षि सचते॒ स षो॑ड॒शी॥३६॥

यस्मा॑त्। न। जा॒तः। परः॑। अ॒न्यः। अस्ति॑। यः। आ॒वि॒वेशेत्या॑ऽवि॒वेश॑। भुव॑नानि। विश्वा॑। प्र॒जाप॑ति॒रिति॑ प्र॒जाऽप॑तिः। प्र॒जयेति॑ प्र॒ऽजया॑। स॒र॒रा॒ण इति॑ सम्ऽर॒रा॒णः। त्रीणि॑। ज्योति॑षि। स॒च॒ते॒। सः। षो॒ड॒शी ॥३६॥

Mantra without Swara
यस्मन्न जातः परोऽअन्योऽअस्ति यऽआविवेश भुवनानि विश्वा । प्रजापतिः प्रजया सँरराणस्त्रीणि ज्योतीँषि सचते स षोडशी ॥

यस्मात्। न। जातः। परः। अन्यः। अस्ति। यः। आविवेशेत्याऽविवेश। भुवनानि। विश्वा। प्रजापतिरिति प्रजाऽपतिः। प्रजयेति प्रऽजया। सरराण इति सम्ऽरराणः। त्रीणि। ज्योतिषि। सचते। सः। षोडशी॥३६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (यस्मात्) ज्या परमेश्वराहून (पर:) उत्तम (अन्य:) अन्य कोणी (न) नाही, (जात:) झाला नाही आणि (य:) जो परमात्मा (विश्वा) समस्त (भुवनानि) लोकांमध्ये (अविवेश) व्यापून राहिला आहे. (ए:) तो (प्रजया) सार्‍या जगापेक्षां (जगातील सर्वांपेक्षा) (संसराण:) उत्तम दाता आहे आणि (षोडशी) इच्छा, प्राण, श्रद्धा, पृथिवी, जन, अग्नी, वायु, आकाश, दश इंद्रिये, मन, अन्न, वीर्य, तप, मंत्र, लोक आणि नाम, या सोळा कलांचा स्वामी आहे. तोच (प्रजापति:) सर्व जगाचा स्वामी परमेश्वर (त्रीणि) तीन (ज्योतींषि ज्योतींची अर्थात सूर्य, विद्युत आणि अग्नी यांची (सचते) सर्व पदार्थांमध्ये स्थापना करतो. ॥36॥
Essence
भावार्थ - आपला गृहाश्रम सुख समाधानाने परिपूर्ण असावा, अशी ज्या गृहाश्रमीजनांची इच्छा असेल, त्यांनी सर्वशक्तीमान परमात्म्याची उपासना करावी. तो परमेश्वर सर्वत्र व्यापक आहे, सर्व लोक रचयिता, धारणकर्ता, दाता आणि न्यायकारी आहे. तोच सनातन म्हणजे सदा एकसारखा असतो, तो सत्, अविनाशी, चैतन्य, आनंदमय, नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त स्वभाव आणि सर्व पदार्थांत असूनही सर्वांपेक्षा वेगळा आहे. तो लहानाहून लहान, (सुक्ष्माहून सूक्ष्म) आणि महानाहून महान आहे. अशा सर्वशक्तिमान परमात्म्याची गृहस्थांनी उपासना करावी, कारण की कोणताही पदार्थ त्याच्यापेक्षा उत्तम नाही किंवा त्या समान ही नाही. ॥36॥
Subject
ज्यांना गृहाश्रम सुखमय होण्याची इच्छा असेल, त्यांनी ईश्वराची उपासना अवश्य केली पाहिजे, पुढील मंत्रात ह्या विषयीं उपदेश केला आहे -