Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 8 / Mantra 35

63 Mantra
8/35
Devata- गृहपतिर्देवता Rishi- मधुच्छन्दा ऋषिः Chhand- आर्षी उष्णिक् Swara- गान्धारः
Mantra with Swara
इन्द्र॒मिद्धरी॑ वह॒तोऽप्र॑तिधृष्टशवसम्। ऋषी॑णां च स्तु॒तीरुप॑ य॒ज्ञं च॒ मानु॑षाणाम्। उ॒प॒या॒मगृ॑हीतो॒ऽसीन्द्रा॑य त्वा षोड॒शिन॑ऽए॒ष ते॒ योनि॒रिन्द्रा॑य त्वा षोड॒शिने॑॥३५॥

इन्द्र॑म्। इत्। हरी॒ऽइति॒ हरी॑। व॒ह॒तः॒। अप्र॑तिधृष्टशवस॒मिति॒ अप्र॑तिऽधृष्टशवसम्। ऋषी॑णाम्। च॒। स्तु॒तीः। उप॑। य॒ज्ञम्। च॒। मानु॑षाणाम्। उपयामेत्यारभ्य पूर्ववत् ॥३५॥

Mantra without Swara
इन्द्रमिद्धरी वहतोप्रतिधृष्टशवसम् । ऋषीणाञ्च स्तुतीरुप यज्ञञ्च मानुषाणाम् । उपयामगृहीतोसीन्द्राय त्वा षोडशिने ऽएष ते योनिरिन्द्राय त्वा षोडशिने ॥

इन्द्रम्। इत्। हरीऽइति हरी। वहतः। अप्रतिधृष्टशवसमिति अप्रतिऽधृष्टशवसम्। ऋषीणाम्। च। स्तुतीः। उप। यज्ञम्। च। मानुषाणाम्। उपयामेत्यारभ्य पूर्ववत्॥३५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (सोमपा:) ऐश्वर्याचे रक्षक (इन्द्र) हे शत्रुविनाशक सभाध्यक्ष, आपण (हरी) बळ आणि आकर्षणरुप घोड्यांनी (अप्रतिधृष्ट शवसम्) प्रभूत बलवृद्धी केलेल्या शक्तिसंपन्न असलेल्या (इन्द्रम्) ऐश्वर्यवर्धक विशाल सेनेला (वहत:) धारण करीत आहात (आपणांकडे बलशाली विशाल सैन्य आहे) (ऋषीणाम्) वेदद्रष्टा विद्वानांचे (च) आणि वीरांचे (स्तुति:) गुणवर्णन करीत, उत्साह वाढवीत आणि (मानुषाणाम्) सामान्यजनांच्या (यज्ञम्) संगठित रुपयाने खर्च करणार्‍या व्यवहारांचे (चर) (च) आणि त्या लोकांचे आपण रक्षण व पालन करा. (उप) त्या सामान्यजनांच्या जवळ जा. यामुळे (ते) आपला (एष:) हा (योनि:) राजधर्म पूर्ण होईल. आपण (उपयामगृहीत:) सर्व साहित्यसामग्रीने संपन्न आहात. (पोषशिने) सोळा कलायुक्त (त्वा) अशा आपला (इन्द्राय) उत्तम ऐश्वर्य प्राप्तीसाठी प्रजाजनांनी आणि सेनाजनांनी अवश्य आपला आश्रम घ्यावा आणि आम्ही देखील आपल्या आश्रयास येतो ॥35॥ (टीप : या मंत्रामधील शेवटच्या शब्दांचा (इन्द्राय) (त्वा) (षोडशिने) अर्थ मूळ हिंदी भाष्यात दिलेला नाही. कारण की तोच शब्द भाग पूर्वीच्या मंत्रात आला आहे. मराठी अर्थ तिथे पहावा.
Essence
भावार्थ - या मंत्रात मागील मंत्रातील (इन्द्र) सोमपा:) (चर) या तीन पदांची योजना या मंत्रासाठी केली आहे. राज, राज्याधिकारी आणि प्रजाजन या सर्वांसाठी उचित आहे की त्यांनी प्रशंसनीय योग्य विद्वानांकडून विद्या व उपदेश ग्रहण करावा, अशा प्रकारे स्वत: कल्याण करावे आणि इतरांना तो उपदेश सांगून त्यांच्यावर उपकार करावा. ॥35॥
Subject
पुढील मंत्रात तोच विषय सांगितला आहे -
Footnote
(टीप : - या मंत्रात मागील मंत्रातून तीन शब्द (इन्द्र) सोमपा:) आणि ‘चर’ घेतले आहेत, असे म्हटले आहे, पण (चर) अर्थ लिहिताना हा शब्द कुठे वापरलेला नाही. अर्थाच्या पूर्ततेसाठी तो शब्द ‘यज्ञम्’ च्या नंतर क्रियापद म्हणून लिहिला पाहिजे)