Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 8 / Mantra 34

63 Mantra
8/34
Devata- गृहपतिर्देवता Rishi- मधुच्छन्दा ऋषिः Chhand- विराट आर्षी अनुष्टुप्, Swara- गान्धारः
Mantra with Swara
यु॒क्ष्वा हि के॒शिना॒ हरी॒ वृष॑णा कक्ष्य॒प्रा। अथा॑ नऽइन्द्र सोमपा गि॒रामुप॑श्रुतिं॑ चर। उ॒प॒या॒मगृ॑हीतो॒ऽसीन्द्रा॑य त्वा षोड॒शिन॑ऽए॒ष ते॒ योनि॒रिन्द्रा॑य त्वा षोड॒शिने॑॥३४॥

यु॒क्ष्व। हि। के॒शिना॑। हरी॒ऽइति॒ हरी॑। वृष॑णा। क॒क्ष्य॒प्रेति॑ कक्ष्य॒ऽप्रा। अथ॑। नः॒। इ॒न्द्र॒। सो॒मपा॒ इति॑ सोमऽपाः। गि॒राम्। उप॑श्रुति॒मित्युप॑ऽश्रुतिम्। च॒र॒। उ॒प॒या॒मगृ॑हीत॒ इत्यु॑पया॒मऽगृ॑हीतः। अ॒सि॒। इन्द्रा॑य। त्वा॒। षो॒ड॒शिने॑। ए॒षः। ते॒। योनिः॑। इन्द्रा॑य। त्वा॒। षो॒ड॒शिने॑ ॥३४॥

Mantra without Swara
युक्ष्वा हि केशिना हरी वृषणा कक्ष्यप्रा । अथा न इन्द्र सोमपा गिरामुपश्रुतिञ्चर । उपयामगृहीतोसीन्द्राय त्वा षोडशिने ऽएष ते योनिरिन्द्राय त्वा षोडशिने ॥

युक्ष्व। हि। केशिना। हरीऽइति हरी। वृषणा। कक्ष्यप्रेति कक्ष्यऽप्रा। अथ। नः। इन्द्र। सोमपा इति सोमऽपाः। गिराम्। उपश्रुतिमित्युपऽश्रुतिम्। चर। उपयामगृहीत इत्युपयामऽगृहीतः। असि। इन्द्राय। त्वा। षोडशिने। एषः। ते। योनिः। इन्द्राय। त्वा। षोडशिने॥३४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (गृहस्थजन राजाला प्रार्थना करीत आहेत) (सोमपा:) ऐश्वर्याचे रक्षक हे (इन्द्र) शत्रुविनाशक राजा, आपण (केशिना) लांब मोठे कंश असलेल्या आणि (वृषणा) बैलाप्रमाणे बलवान असलेल्या (कक्षप्रा:) अभीष्ट स्थानापर्यंत नेणार्‍या (हरी) घोड्यांना (रथे) रथात (युक्ष्य) जुंपा. (अथ) त्यानंतर (न:) आम्हा प्रजाजन/गृहस्थांची (गिराम्) तक्रार, म्हणणे वा आमच्या विनयपत्रात केलेल्या (उपश्रुतिम्) प्रार्थनेला (हि) लक्ष देऊन (चर) ऐका व समजून घ्या. आपण (उपयामगृहीत:) गृहाश्रमासाठी आवश्यक साहित्य-सामग्रीचा संग्रह केलेला (असि) आहे. (आमच्यासाठी गृहाकरिता आवश्यक धान्यादी वस्तूंची व्यवस्था करा) (प्रजाननांपैकी एक गृहस्थ राजास म्हणत आहे)-(पोडशिने) सोळा कलांनी परिपूर्ण (इन्द्राय) परम ऐश्वर्य प्राप्तीसाठी (त्वा) आपणाला मी उपदेश करीत आहे. (स्प:) हे (ते) आपले (योनि:) जे घर आहे, त्याला (षोडशिने) अशा प्रकारे सोळा कलांनी परिपूर्ण ठेवण्यासाठी आणि (इन्द्राय) परमैश्वर्यदायी गृहाश्रमाचे पालन-रक्षण करण्यासाठी मी (त्वा) आपणाला आदेश देत आहे. ॥34॥
Essence
भावार्थ - या मंत्रात ‘रथे’ हा शब्द (अर्थाच्या आकांक्षेमुळे) मागील मंत्रातून घेतला आहे. (त्याची अनुवृत्ती केली आहे) प्रजा, सेना आणि सभाजन या सर्वांनी सभाध्यक्षास असे म्हणावे की आपण शत्रूंच्या विनाशाकरिता आणि संपूर्ण राज्यात न्यायव्यवस्था ठेवण्यासाठी अश्वसेना आदी सैन्याच्या विविध अंगांना चांगल्याप्रकारे प्रशिक्षित करून त्या सैन्याला प्रसन्न आणि शक्तीशाली ठेवले पाहिजे. त्यानंतर आम्हा प्रजाजनांचे प्रार्थनापत्र वाचून/एकून राज्याची रक्षा केली पाहिजे ॥34॥
Subject
आता राजाविषयी सांगत गृहश्रर्माविषयी पुढील मंत्रात कथन केले आहे -