Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 8 / Mantra 30

63 Mantra
8/30
Devata- दम्पती देवते Rishi- अत्रिर्ऋषिः Chhand- आर्षी जगती Swara- मध्यमः
Mantra with Swara
पु॒रु॒द॒स्मो विषु॑रूप॒ऽइन्दु॑र॒न्तर्म॑हि॒मान॑मानञ्ज॒ धीरः॑। एक॑पदीं द्वि॒पदीं॑ त्रि॒पदीं॒ चतु॑ष्पदीम॒ष्टाप॑दीं॒ भुव॒नानु॑ प्रथन्ता॒ स्वाहा॑॥३०॥

पु॒रु॒द॒स्म इति॑ पुरुऽद॒स्मः। वि॑षुरूप॒ इति॒ विषु॑ऽरूपः। इन्दुः॑। अ॒न्तः। म॒हि॒मान॑म्। आ॒न॒ञ्ज॒। धीरः॑। एक॑पदी॒मित्येक॑ऽपदीम्। द्वि॒पदी॒मिति॑ द्वि॒ऽपदीम्॑। त्रि॒पदी॒मिति॒ त्रि॒ऽपदी॑म्। चतु॑ष्पदीम्। चतुः॑पदी॒मिति॒ चतुः॑ऽपदीम्। अ॒ष्टाप॑दी॒मित्य॒ष्टाऽप॑दीम्। भुव॑ना। अनु॒। प्र॒थ॒न्ता॒म्। स्वाहा॑ ॥३०॥

Mantra without Swara
पुरुदस्मो विषुरूप ऽइन्दुरन्तर्महिमानमानञ्ज धीरः । एकपदीन्द्विपदीन्त्रिपदीञ्चतुष्पदीमष्टापदीम्भुवनानु प्रथन्ताँ स्वाहा ॥

पुरुदस्म इति पुरुऽदस्मः। विषुरूप इति विषुऽरूपः। इन्दुः। अन्तः। महिमानम्। आनञ्ज। धीरः। एकपदीमित्येकऽपदीम्। द्विपदीमिति द्विऽपदीम्। त्रिपदीमिति त्रिऽपदीम्। चतुष्पदीम्। चतुःपदीमिति चतुःऽपदीम्। अष्टापदीमित्यष्टाऽपदीम्। भुवना। अनु। प्रथन्ताम्। स्वाहा॥३०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (पुरुदस्म:) ज्या मनुष्याच्या गुणांमुळे अनेक दु:खांचा नाश होतो (विषुरूप:) ज्यानें अनेक जन्मात क्रमाने अनेक रुपे धारण करीत अनेक विद्या-विषयात नैपुण्य मिळविले आहे. (इन्दु:) जो परमऐश्वर्याची सिद्धी करणारा आहे (धीर:) समस्त कार्यात लक्ष देणारा आहे, व अशाच पुरुषाने आपल्या विवाहिता पत्नीच्या (अन्त:) गर्भामधे (महिमानम्) ब्रह्मचर्य आणि जितेंद्रियता आदी शुभकर्मांनी प्राप्त होणार्‍या शुभ गर्भाची (संतानाची) (आनज्ज) कामना करावी. (अशाच गुणवंत पुरुषास श्रेष्ठ संतान होते) गृहस्थजनांनी अशाप्रकारच्या श्रेष्ठ गृहाश्रमाची निर्मिती करून विद्यायुक्त वेदवाणीचे ज्ञान मिळवावे. (ती विद्यायुक्त वाणी अशी आहे की) त्यामध्ये (एकपदीम्) एक ओम् पद आहे (द्विपदीम्) ज्यात दोन पद म्हणजे संसारसुख आणि मोक्षसुख आहे (त्रिपदीम्) ज्यामध्ये तीन म्हणजे वाणी, मन आणि शरीर यांचे आनंद वर्णित आहे (चतुष्पदीम्) ज्यात धर्म, अर्थ काम आणि मोक्ष या चार साधनांचा समावेश आहे (अष्टापदीम्) ज्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे चार वर्ण आणि ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि सन्यास हे चार आश्रय, असे एकूण आठ व्यवस्था वर्णित आहेत, अशा वेदवाणीचा उपयोग करीत. (गृहस्थजनांनी भुकननि) निवासयोग्य घरांमध्ये राहून त्या घरांना (प्रथन्ताम्) प्रशंसित करावे आणि त्या वेदवाणी व श्रेष्ठगृहांनी सर्व मनुष्यांना (अनु) आपलेसे करावे ॥30॥
Essence
भावार्थ - विवाहित स्त्री-पुरुषांकरिता आवश्यक आहे की त्यांनी गृहस्थाश्रम-विद्या चांगल्याप्रकारे जाणून घ्यावी आणि त्याप्रमाणे संतानोत्पत्ती करून त्या संतानांस ब्रह्मचर्यादी नियमांबरोबरच सर्व विद्या सांगोपांगसहित शिकवावी आणि संतानास व स्वत:स सुखी व आनंदित करावे. ॥30॥
Subject
पुनश्च, पुढील मंत्रात गर्भाविषयीच सांगितले आहे -