Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 8 / Mantra 3

63 Mantra
8/3
Devata- आदित्यो गृहपतिर्देवताः Rishi- आङ्गिरस ऋषिः Chhand- निचृत् आर्षी पङ्क्ति Swara- पञ्चमः
Mantra with Swara
क॒दा च॒न प्रयु॑च्छस्यु॒भे निपा॑सि॒ जन्म॑नी। तुरी॑यादित्य॒ सव॑नं तऽइन्द्रि॒यमात॑स्थाव॒मृतं॑ दि॒व्यादि॒त्येभ्य॑स्त्वा॥३॥

क॒दा। च॒न। प्र। यु॒च्छ॒सि॒। उ॒भेऽइत्यु॒भे। नि। पा॒सि॒। जन्म॑नि॒ऽइति॒ जन्म॑नी॒। तु॒री॑य। आ॒दि॒त्य॒। सव॑नम्। ते॒। इ॒न्द्रि॒यम्। आ। त॒स्थौ॒। अ॒मृत॑म्। दि॒वि। आ॒दि॒त्येभ्यः॑। त्वा॒ ॥३॥

Mantra without Swara
कदा चन प्रयुच्छस्युभे निपासि जन्मनी । तुरीयादित्य सवनन्तऽइन्द्रियमातस्थावमृतन्दिव्या दित्येभ्यस्त्वा ॥

कदा। चन। प्र। युच्छसि। उभेऽइत्युभे। नि। पासि। जन्मनिऽइति जन्मनी। तुरीय। आदित्य। सवनम्। ते। इन्द्रियम्। आ। तस्थौ। अमृतम्। दिवि। आदित्येभ्यः। त्वा॥३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - या मंत्रात आकांक्षा असल्यामुळे नकाराचा अध्याहार केला आहे. (विशेष वक्तव्य-अध्याहार म्हणजे वाक्यात एखादा शब्द वा काही शब्द सुटलेले आहेत, पण वाक्यात त्यांची आकांक्षा म्हणजे गरज आहे, अशा उल्लेख राहून गेलेल्या शब्दाला अर्थपूर्तीसाठी समाविष्ट करणे म्हणजे अध्याहार. या मंत्रात निशेधार्थक न अक्षर नसल्यामुळे अर्थपूर्तीसाठी त्याचा अध्याहार केला आहे) (पत्नी म्हणत आहे) हे परिराज, आपण (कदा) (चन) कधीही (प्र) (युच्छसि) प्रमाद करीत नाहींत (सतत उद्योगशील आहात) अशा रीतीने आपण स्वत:च्या (जन्मनी) हा जन्म व परजन्म (उभे) दोन्ही जन्मांचे (पासि) पालन ना रक्षण केले आहे/करीत आहात. (आदित्य) हे विद्या व गुणांमधे यूर्याप्रमाणे ते जोमय असलेले आपण (ते) आपल्या (सवजम्) उत्पत्ती आणि धर्मकार्य यांमध्ये (इन्द्रियम्) मन आदी इंद्रियांना वश करू शकला, तर आपण (आ) (तस्थौ) (दिवि) सर्व स्पष्ट व प्रकाशित कार्यांमध्ये (अमृतम्) अविनाशी सुख प्राप्त करू शकाल. हे (तुरीय) चतुर्थाश्रमास पूर्ण करण्याचा निश्चय केलेल्या आपणास (वृद्धत्व वा सन्यासाश्रमापर्यंत दीर्घजीवी होण्यासाठी निर्धार केलेले) (आदिव्यभ्य:) प्रतिमास सुखप्राप्तीसाठी मी (त्वा) आपला स्वीकार करीत आहे. ॥3॥
Essence
भावार्थ - जो प्रमादी पुरुष आपल्या पत्नीला सोडून (आपल्या विवाहिता पत्नीशी प्रामाणिक न राहून) परस्त्रीशी संबंध ठेवतो, तो या लोकात व परलोकात (परजन्मीं) अभागी होतो. याउलट जो पुरुष संयमी व पत्नीरत असून कधीही परस्त्रीच्या कामना करीत नाही, तो दोन्ही लोकात परमसुखी होतो. असे का होऊ नये? (ते साहजिकच आहे) याचप्रकारे सर्व स्त्रियांकरिता देखी, उचित आहे की त्यांनी जितेंद्रिय पतीशी संबंध ठेवावा, अन्यांशी मुळीच नको ॥3॥
Subject
पुढील मंत्रात देखील गृहस्थधर्माविषयी कथन केले आहे -