Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 8 / Mantra 29

63 Mantra
8/29
Devata- दम्पती देवते Rishi- अत्रिर्ऋषिः Chhand- भूरिक् आर्षी अनुष्टुप्, Swara- गान्धारः
Mantra with Swara
यस्यै॑ ते य॒ज्ञियो॒ गर्भो॒ यस्यै॒ योनि॑र्हिर॒ण्ययी॑। अङ्गा॒न्यह्रु॑ता॒ यस्य॒ तं मा॒त्रा सम॑जीगम॒ꣳ स्वाहा॑॥२९॥

यस्यै॑। ते॒। य॒ज्ञियः॑। गर्भः॑। यस्यै॑। योनिः॑। हि॑र॒ण्ययी॑। अङ्गा॑नि। अह्रु॑ता। यस्य॑। तम्। मा॒त्रा। सम्। अ॒जी॒ग॒म॒म्। स्वाहा॑ ॥२९॥

Mantra without Swara
यस्यै ते यज्ञियो गर्भा यस्यै योनिर्हिरण्यी । अङ्गान्यह्रुता यस्य तम्मात्रा समजीगमँ स्वाहा ॥

यस्यै। ते। यज्ञियः। गर्भः। यस्यै। योनिः। हिरण्ययी। अङ्गानि। अह्रुता। यस्य। तम्। मात्रा। सम्। अजीगमम्। स्वाहा॥२९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (पति म्हणतो) हे विहिते सौभाग्यवती स्त्रिये, (माझी पत्नी) मी तुझा स्वामी (सांगत आहे की) (यस्यै) जो (ते) तुझा (हिरण्ययी) रोगरहित शुद्ध (योनि:) गर्भाशय आहे, (यस्यै) त्यामधे तुझे (यज्ञिय:) याज्ञिक असे (गर्भ:) गर्भ (संतान) व्हावे की (यस्य) ज्या गर्भाची (अद्भुत) सुंदर सुव्यवस्थित (अंगानि) अंगें आहेत (तम्) अशा गर्भाची ( त्व संतानाची) (मात्रा) कामना करणारी तू आहेस. तुझ्यासह समागम करून मी (स्वाहा) धर्मयुक्त आचरणाने अशा संतानास (एम्) (अजीगमन्) चांगल्याप्रकारे प्राप्त करीन, (अशी मी इच्छा करतो) ॥29॥
Essence
भावार्थ - पुरुषाने गृहाश्रमात जितेंद्रिय रहावे (संतानोत्पत्तीसाठी स्त्रीसंग करावा) आणि शरीरात वीर्याची वृद्धी व शुद्धी होण्यासाठी यत्न करावा. स्त्रीने देखील याच नियमांचे पालन करावे. पतीकडून गर्भ राहिल्यास गर्भाची स्थिती, वृद्धी आणि योनी आदी अंगाचे आरोग्य यांकडे लक्ष द्यावे. अशाप्रकारे त्यांना जे संतान होईल, ते रुप, गुण, कर्म, स्वभाव आणि शक्तीच्या दृष्टीने प्रशंसनीय असेल, असे निश्चयाने जाणावे ॥29॥
Subject
पुढील मंत्रातही गर्भाविषयी सांगितले आहे -