Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 8 / Mantra 27

63 Mantra
8/27
Devata- दम्पती देवते Rishi- अत्रिर्ऋषिः Chhand- भूरिक् प्राजापत्या अनुष्टुप्,स्वराट आर्षी बृहती, Swara- मध्यमः, गान्धारः
Mantra with Swara
अव॑भृथ निचुम्पुण निचे॒रुर॑सि निचुम्पु॒णः। अव॑ दे॒वैर्दे॒वकृ॑त॒मेनो॑ऽयासिष॒मव॒ मर्त्यै॒र्मर्त्य॑कृतं पु॒रु॒राव्णो॑ देव रि॒षस्पा॑हि। दे॒वाना॑ स॒मिद॑सि॥२७॥

अव॑भृ॒थेत्यव॑ऽभृथ। नि॒चु॒म्पु॒णेति॑ निऽचुम्पुण। नि॒चे॒रुरिति॑ निऽचे॒रुः। अ॒सि॒। नि॒चु॒म्पु॒ण इति॑ निऽचुम्पु॒णः। अव॑। दे॒वैः। दे॒वकृ॑त॒मिति॑ दे॒वऽकृ॑तम्। ए॑नः। अ॒या॒सि॒ष॒म्। अव॑। मर्त्यैः॑। मर्त्य॑कृत॒मिति॒ मर्त्य॑कृतम्। पु॒रु॒राव्ण॒ इति॑ पुरु॒ऽराव्णः॑। दे॒व॒। रि॒षः। पा॒हि॒। दे॒वाना॑म्। स॒मिदिति॑ स॒म्ऽइत्। अ॒सि॒ ॥२७॥

Mantra without Swara
अवभृथ निचुम्पुण निचेरुरसि निचुम्पुणः । अव देवैर्देवकृतमेनो यासिषमव मर्त्यैर्मर्त्यकृतम्पुरुराव्णो देव रिषस्पाहि । देवानाँ समिदसि ॥

अवभृथेत्यवऽभृथ। निचुम्पुणेति निऽचुम्पुण। निचेरुरिति निऽचेरुः। असि। निचुम्पुण इति निऽचुम्पुणः। अव। देवैः। देवकृतमिति देवऽकृतम्। एनः। अयासिषम्। अव। मर्त्यैः। मर्त्यकृतमिति मर्त्यकृतम्। पुरुराव्ण इति पुरुऽराव्णः। देव। रिषः। पाहि। देवानाम्। समिदिति सम्ऽइत्। असि॥२७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (पत्नी म्हणत आहे) हे (अवभृय) मी गर्भ धारण करून (गर्भवती झाल्यावर) त्याचे रक्षण करणारे आणि (निचुश्रुण) मंद संथ गतीने चालणारे हे पतिदेव, आपण (निचुम्पुण:) रुप मनोहर आणि (निचेरु:) नित्य धर्म मार्गाने द्रव्याचा संचय करणारे (असि) आहात. तसेच (देवानाम्) विद्वज्जनांच्या सभेत (समित्) तेजाने तळपणारे (असि) आहात (देव) सर्वांहून विजयाची अधिक कामना करणारे हे विजिगीषु पतिदेव, (दैवै:) विद्वज्जनांसह तसेच (मर्त्यै:) सामान्य मनुष्यांसह देखील कार्य करणार्‍या (आपणांस मी म्हणत आहे की) (देवकृतम्) कोणा कामी पुरुषाने किंवा (मर्त्यकृतम्) साधारण मनुष्याने केलेल्या (एन:) पापाचा वा अपराधाचा जर मी (अयासिषम्) प्राप्ती होणार असेन दुर्दैवाने शिकार होणार असेल तर अशा संकटकाळी) (पुरुराग्ण:) त्या घोर अपराधीजनांपासून (आणि (रिष:) धर्म मार्गाहून विचलित करणार्‍या विचारापासून वा कर्मापासून आपण मला (पाहि) दूर ठेवां. (गर्भवती असतांना मी कोणा कामी पुरुषाच्या, द़ृष्टाच्या तावडीत सापडू नये. अशा आपत्काळी आपण माझे रक्षक व्हा) ॥27॥
Essence
भावार्थ - पत्नीने आपल्या पतीस नित्य प्रार्थना करावी की ज्याप्रमाणे मी आपली सेवा करून आपणास आनंदीत करते व केवळ आपणांस चाहते, त्याप्रमाणे आपणही माझ्यावर प्रेम करा आणि आपल्या पुरुषार्थ पराक्रमाने माझे रक्षण करा. आपण माझे रक्षणकर्ता असल्यावर मी कोणा दुराचारी माणसाच्या दुष्कृत्याची भगिनी होणार नाही. ॥27॥
Subject
पुन्हा गृहस्थधर्मात स्त्रीचा सहभाग या विषयी पुढील मंत्रात कथन केले आहे -