Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 8 / Mantra 26

63 Mantra
8/26
Devata- गृहपतयो देवताः Rishi- अत्रिर्ऋषिः Chhand- स्वराट आर्षी बृहती, Swara- मध्यमः
Mantra with Swara
देवी॑रापऽए॒ष वो॒ गर्भ॒स्तꣳ सुप्री॑त॒ꣳ सुभृ॑तं बिभृत। देव॑ सोमै॒ष ते॑ लो॒कस्तस्मि॒ञ्छञ्च॒ वक्ष्व॒ परि॑ च वक्ष्व॥२६॥

देवीः॑। आ॒पः॒। ए॒षः। वः॒। गर्भः॑। तम्। सुप्री॑त॒मिति॒ सुऽप्री॑तम्। सुभृ॑त॒मिति॒ सुऽभृ॑तम्। बि॒भृ॒त॒। देव॑ सो॒म॒। ए॒षः। ते॒। लो॒कः। तस्मि॑न्। शम्। च॒। वक्ष्व॑। परि॑। च॒। व॒क्ष्व॒ ॥२६॥

Mantra without Swara
देवीरापऽएष वो गर्भस्तँ सुप्रीतँ सुभृतम्बिभृत । देव सोमैष ते लोकस्तस्मिञ्छञ्च वक्ष्व परि च वक्ष्व ॥

देवीः। आपः। एषः। वः। गर्भः। तम्। सुप्रीतमिति सुऽप्रीतम्। सुभृतमिति सुऽभृतम्। बिभृत। देव सोम। एषः। ते। लोकः। तस्मिन्। शम्। च। वक्ष्व। परि। च। वक्ष्व॥२६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (मंत्राचा पहिला अर्धा भाग पत्नीसाठी आणि शेवटचा पतिकरिता आहे.) हे (आप:) शुभ गुण, कर्म आणि विद्यांनी व्याप्त असलेल्या सुशीला - सुविद्य) (देवी:) अतिशोभायुक्त जीवन (वा पत्नी) तुम्हा सर्वांचा (य:) जो (एष:) हा (गर्भ:) गर्म (किंवा गर्भाशय) आहे, तो (लोक:) पुत्र, पती आदींसह सुखकारी आहे (सुपुत्रांना जन्म देणारा आणि पतीसाठी वंशवृद्धीचे कारण आहे, म्हणून सुखदायी आहे) (तम्) त्याचे (सुप्रीतम्) अत्यंत प्रेमाने आणि (सुभृतम्) रक्षण करण्याच्या पूर्ण सामर्थ्याने (विभृत) रक्षण करा (काळजी घ्या) (आता पतीला वा पुरुषांना उद्देशून विद्वानांचे वचन) हे (देव) दिव्यगुणांमुळे सुंदर आणि (सोम) ऐश्वर्यायुक्त पुरुष वा पती, (ते) तुमचा हा जो (लोक:) दर्शनीय पुत्र, स्त्री, भृत्य आदी सह मिळते गृहाश्रम आहे (तस्मित्) त्यासाठी (शम्) सर्वप्रकारे सुख(च) आणि शिक्षणाची (वक्ष्व) व्यवस्था करा (च) आणि सर्व प्रयत्नाने या गृहाश्रमाचे (परिवक्ष्व) रक्षण करा. (घरातील सर्वांना सुखी आनंदी ठेवा). ॥26॥
Essence
भावार्थ - सुशिक्षित स्त्रियांनी यथोक्त विवाह-विधीद्वारे विद्यावान पती करावा आणि त्यास सदा आनंदित करून आपसात प्रीतीभाव ठेऊन गर्भ धारण करावा. त्याचप्रमाणे पतीनेदेखील आपल्या पत्नीचे रक्षण करून तिला प्रसन्न ठेवण्यासाठी नित्य उत्साहित असावे. ॥26॥
Subject
आता विवाहित स्त्रियांसाठी कर्तव्य-कर्मांचा उपदेश पुढच्या मंत्रात केला आहे -