Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 8 / Mantra 23

63 Mantra
8/23
Devata- गृहपतयो देवताः Rishi- अत्रिर्ऋषिः । ऊरुमित्यस्य शुनः शेप ऋषिः Chhand- याजुषी उष्णिक्,निचृत् आर्षी त्रिष्टुप्,आसुरी गायत्री Swara- ऋषभः, षड्जः
Mantra with Swara
माहि॑र्भू॒र्मा पृदा॑कुः। उ॒रुꣳ हि राजा॒ व॑रुणश्च॒कार॒ सूर्या॑य॒ पन्था॒मन्वे॑त॒वाऽउ॑। अ॒पदे॒ पादा॒ प्रति॑धातवेऽकरु॒ताप॑व॒क्ता हृ॑दया॒विध॑श्चित्। नमो॒ वरु॑णाया॒भिष्ठि॑तो॒ वरु॑णस्य॒ पाशः॑॥२३॥

मा। अहिः॑। भूः॒। मा। पृदा॑कुः। उ॒रुम्। हि। राजा॑। वरु॑णः। च॒कार॑। सूर्य्या॑य। पन्था॑म्। अन्वे॑त॒वा इत्युनु॑ऽएत॒वै। ऊँऽइत्यूँ॑। अ॒पदे॑। पादा॑। प्रति॑धातव॒ इति॒ प्रति॑ऽधातवे। अ॒कः॒। उ॒त। अपव॒क्तेत्य॑पऽवक्ता। हृ॒द॒या॒विधः॑। हृ॒द॒य॒विध॒ इति॑ हृदय॒ऽविधः॑। चि॒त्। नमः॑। वरु॑णाय। अ॒भिष्ठि॑तः। अ॒भिस्थि॑त॒ इत्य॒भिऽस्थि॑तः। वरु॑णस्य। पाशः॑ ॥२३॥

Mantra without Swara
माहिर्भूर्मा पृदाकुः । उरुँ हि राजा वरुणश्चकार सूर्याय पन्थामन्वेतवा ऽउ । अपदे पादा प्रतिधातवेकरुतापवक्ता हृदयाविधश्चित् । नमो वरुणायाभिष्ठितो वरुणस्य पाशः ॥

मा। अहिः। भूः। मा। पृदाकुः। उरुम्। हि। राजा। वरुणः। चकार। सूर्य्याय। पन्थाम्। अन्वेतवा इत्युनुऽएतवै। ऊँऽइत्यूँ। अपदे। पादा। प्रतिधातव इति प्रतिऽधातवे। अकः। उत। अपवक्तेत्यपऽवक्ता। हृदयाविधः। हृदयविध इति हृदयऽविधः। चित्। नमः। वरुणाय। अभिष्ठितः। अभिस्थित इत्यभिऽस्थितः। वरुणस्य। पाशः॥२३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे सभापती राजा, आपण (वरूणाय) उत्तम ऐश्वर्याच्या प्राप्तीसाठी (उत्तम) प्रभूत गुणांनी युक्त अशा न्यायपद्धतीचा (अक:) अवलंब करा (योग्य न्याय करीत जा), (सूर्य्याय) तसेच चराचर जगाचा जो आत्मा, त्या परमात्म्याचे ज्ञान होण्याकरिता अथवा प्रजाजनांना यथोचित धर्माप्रमाणे गतिमान होण्यासाठी (पंथाम्) न्याय्य मार्ग (चकार) दाखवीत जा. (उठ) आणखी असे की कधीही (अपवक्ता) असत्यभाषी (हृदयविध:) धर्मात्माजनांचे हृदय पीडित करणार्‍या (चित्र) माणसाप्रमाणे (पृदाकु:) असत्यभाषण (मा) करूं नका. तसेच आपण कधीही (अहि:) सापाप्रमाणे क्रोधरुप विष धारण करणारे (मा) (भू:) होऊ नका. (वरुणस्य) आपल्या अंगी जे वीरत्वगुण आहे, ते गुण सदा (अभिष्ठित:) प्रसिद्ध होत राहो. आपले (नम:) वज्ररुप दंड आणि (पाश:) बांधणारी साधनें (कारागृह, दंड, रज्जुबंधन आदी) सदैव जागृत असू द्या. (आपल्या वीरत्व व प्रतापाची तसेच दंडविधानाची जरब सर्व दुष्ट-दुर्जनांवर बसावी) ॥23॥
Essence
भावार्थ - प्रजेने अशाच सत्पुरुषाला सभापती म्हणून निवडावे की जो विद्वान आहे, जितेंद्रिय आणि धर्मात्मा आहे, तसेच जो प्रजेचे अशा रीतीने की पिता जसे पुत्राचे, त्याप्रमाणे पालन करण्यामध्ये पूर्ण दत्तचित्त असेल व सर्वांकरिता सुखकर असेल. राजा आणि प्रजा दोघांनी कोणतेही अधार्मिक कार्य करू नये. जर यदा कदाचित कोणी दुष्कर्म केले, तर प्रजेने राजाला आणि राजाने प्रजेला दंडित करावे. अपराधी माणसाला कदापि दंड दिल्याशिवाय सोडूं नये, पण कोणाही निर्दोष व्यक्तीस निष्कारण त्रास वा दंड देऊ नये. अशा प्रकारे राजा आणि प्रजाजन दोघांनी न्यायपूर्ण मार्गाने धर्मानुसरण करीत आपापल्या कर्तव्यांमध्ये मन रमवावे की ज्यामुळे त्यांच्या मित्रांची संख्या वाढेल, प्रीतीभाव असणारे वाढतील आणि शत्रू निर्माण होणार नाहीत. अशाप्रकारे विद्या आणि धर्माचा प्रसार करीत ईश्वराच्या भक्तीमध्ये मन रमवीत सर्वजण सदा सुखी राहतील. ॥23॥
Subject
पुल मंत्रात राजासाठी उपदेश केला आहे -